"छावा" हा हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे तर या चित्रपटाची निर्मिती दीनश विझन यांचे मदॉक फिल्म्स या बॅनर अंतर्गत केली आहे.

या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची मध्यवर्ती भूमिका विकी कौशल यांनी केली असून, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

चित्रपटातील संगीत प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी दिले आहे, तर कवी इर्शाद कामिल आणि क्षितीज पाटवर्धन यांनी गीतलेखन केले आहे.

चित्रपटातील छायांकन फारच उत्कृष्ट आहे, ज्यामध्ये मराठा साम्राज्याची भव्यता आणि ऐतिहासिक लढायांचा अद्वितीय दृष्यांद्वारे छायांकन केले आहे

चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, विशेषत: विकी कौशल यांच्या अभिनयाचे आणि चित्रपटातील ॲक्शन सिक्वेन्सेसचे कौतुक झाले आहे.

"छावा" चित्रपट भारताबरोबरच अनेक देशामध्ये एकाच वेळी प्रदर्शित झाला असल्याने , या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय प्रक्षेपण झाले आहे.