LIC New Jeevan Shanti Policy: प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या उत्पनातून थोडी रक्कम बाजूला काढून वाचवतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवतो कि जेणेकरून वृद्धापकाळात त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये. तसेच त्याला कायम नियमित उत्पन्न मिळत राहावे.
तरुण वयामध्ये तुम्ही कोणतीही बचत केली नाही तर तुम्हाला वृद्धापकाळात इतरांवर अवलंबून राहावे लागेल. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, मार्केट मध्ये विविध गुंतवणूक योजना आहेत पण सर्वात विश्वासार्ह म्हणजे LIC द्वारे चालवलेल्या अनेक पेन्शन विमा योजना, या पेन्शन योजमध्ये गुंतवणूक केल्या मुळे आपणास निश्चित पेन्शन मिळते. Kanyadan LIC Policy Details In Marathi: सर्वोत्तम कन्यादान योजना, महिना भरा रु. 6006/- 18 वर्षांसाठी आणि 26,85,800/- रु घ्या.
आज या लेखामध्ये आम्ही एलआयसीच्या नवीन लाइफ पेंशन प्लॅन ची सविस्तर माहिती सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकाल.आणि वृद्धपकाळाचे आयुष्य विना काळजी जगू शकाल. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा, समजून घ्या आणि इतरांना या योजनेसंबंधित माहिती द्या.
ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी चांगली असू शकते, ज्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक करायची आहे, जेणेकरून त्यांचे भविष्य निवृत्तीनंतर सुरक्षित होईल.
Jeevan Utsav Yojana 2024: 1 लाख भरा 15 वर्षासाठी आणि मुलांना द्या 7 कोटी रु. संपूर्ण माहिती इथे पहा!
LIC New Jeevan Shanti Policy:
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कडे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी फक्त एकच नाही तर अनेक उत्तम योजना आहेत. LIC च्या पेन्शन योजना खूपच लोकप्रिय आहेत, ज्या विशेषत: लोकांच्या निवृत्तीनंतर त्यांचे आर्थिक नियोजन परिपूर्ण करण्यासाठी आणि त्यानाच आर्थिक फायदा होण्यास्तही सादर केल्या गेल्या आहेत.
LIC नवीन जीवन शांती प्लॅन हि अशीच एक सिंगल प्रीमियम योजना आहे आणि एकदा तुम्ही गुंतवणूक केली की, निवृत्तीनंतर तुम्हाला नियमित पेन्शनची हमी देते. तुम्हाला दरवर्षी १,००,००० रुपये पेन्शन मिळू शकते, तेही आयुष्यभर.
LIC नवीन जीवन शांती योजना ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करताना तुमच्या पेन्शनची रक्कम निश्चित केली जाईल. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला पेन्शनची सुविधा मिळेल. आता पॉलिसीधारकांना या योजनेअंतर्गत अधिक पेन्शन मिळू शकते, कारण LIC ने नवीन जीवन शांती योजनेचे व्याजदर बदलले आहेत. या बदलांतर्गत ५ जानेवारीपासून या योजनेत गुंतवणूक सुरू करणाऱ्या नवीन पॉलिसीधारकांना आता जास्त व्याजाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये गुंतवणूक करून केवळ पॉलिसीधारकच नाही तर त्याच्या कुटुंबालाही योजनेचा लाभ दिला जातो.
सिंगल लाइफ आणि जॉईंट लाइफ योजना
LIC New Jeevan Shanti Policy योजना मध्ये दोन गुंतवणुकीचे पर्याय दिले आहेत, पहिला सिंगल लाइफ आणि दुसरा जॉईंट लाइफ. यापैकी कोणत्याही एका पर्यायायने तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवू शकता.
या योजनेत जर तुम्ही ‘डेफर्ड ॲन्युइटी फॉर सिंगल लाइफ’ या पर्यायायने गुंतवणूक केली तर तुम्हाला घेतलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर पेन्शन म्हणून निश्चित रक्कम मिळते आणि योजनाधारकाच्या मृत्यूनंतर गुंतवलेली रक्कम नॉमिनीला परत केले जातात.
वयोमर्यादा किती असावी?
हि LIC New Jeevan Shanti Policy योजना सुरु करण्यासाठी योजनाधारकाचे वय किमान ३० आणि कमल ७९ वर्षे असावे. या वयोगटातील कोणतीही स्त्री किंवा पुरुष हि योजना घेऊ शकतात. अशा पद्धतीच्या पेन्शन योजनेमध्ये कोणतेही जोखीम संरक्षण म्हणजे लाइफ कव्हर नसते. तरीही हि योजना यामध्ये असलेल्या फायद्यांमुळे लोकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे.
अशा प्रकारे तुम्हाला दरवर्षी 1 लाख रुपये पेन्शन मिळू शकते
तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी या योजनेत १५ लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला वार्षिक १,०१,२५० रुपये पेन्शन मिळेल. जर तुम्ही ५, १०, १५ किंवा २० वर्षांनंतर पेन्शन सुरू करण्याचा पर्याय घेतला पेंशनची रक्कम अजून वाढेल. हीच पेन्शन तुम्ही मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शन घेऊ शकता.
यासोबतच LIC ने या योजनेसाठी खरेदी किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, पॉलिसीधारकाला आता १००० रुपयांच्या खरेदी किमतीवर रुपये ९. ७ ते रुपये ९. ७५ रुपयांपर्यंतचे व्याज मिळू शकते. तथापि, पॉलिसीधारकांना हे व्याज त्यांची खरेदी किंमत आणि योजनेच्या कालावधीच्या आधारावर ठरवले जाईल.
पेन्शनसह इतर फायदे
LIC New Jeevan Shanti Policy योजनेमध्ये गॅरेंटेड पेन्शन आणि इतर लाभांसह लाईफ कव्हर समाविष्ट आहे. म्हणजेच या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते.
या प्लॅनची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही काही कारणाने हा प्लान कधीही सरेंडर करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्ही किमान १.५ लाख रुपयापासून गुंतवणूक सुरु करू शकता, तर यासाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.
यो योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळच्या LIC शाखा कार्यालयाशी संपर्क साधा किंवा तुमचा LIC विमा प्रतिनिधीशी या बाबाबत चर्चा करा, किंवा LIC INDIA website www.licindia.in ला भेट द्या