Health Insurance Policy Claim: हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यावर आपण निश्चिंत होतो की आपली आरोग्यविषयक समस्या सहजपणे सोडवली जाईल. पण अनेकदा दावा केल्यानंतर अपेक्षित रक्कम मिळत नाही, ज्यामुळे पॉलिसीधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या बहुतेक वेळा पॉलिसीतील अटी आणि शर्तींमुळे निर्माण होते. पॉलिसीच्या अटी समजून न घेतल्यामुळे दावे नाकारले जातात किंवा कमी रक्कम दिली जाते. यामुळे पॉलिसीधारकाच्या अपेक्षांमध्ये आणि वास्तवात मोठी तफावत निर्माण होते. या लेखामध्ये अशा समस्यांची मुख्य कारणे आणि त्यावरीळ उपाय जाणून घेऊया.
दावा रक्कम कमी मिळण्याची कारणे.
पॉलिसीमध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी: आरोग्य विमा पॉलिसींमध्ये अनेक गोष्टींना संपूर्ण कव्हरमध्ये समाविष्ट केले जात नाही. काही वेळा पॉलिसीधारकांनी केलेला दावा, अशा गोष्टींवर आधारित असतात, ज्यामुळे हेल्थ इन्शुरन्स कंपनी त्यांचा दावा देण्यास नकार देतात किंवा कमी प्रमाणात रक्कम देतात. उदाहरणार्थ, कॉस्मेटिक उपचार, पीपीई किट्स, मास्क इत्यादींचे खर्च बहुतेक पॉलिसीमध्ये कव्हर केले जात नाहीत.
पॉलिसीच्या अटी आणि शर्ती: पॉलिसीमध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींवर जर पॉलिसीधारकांनी पूर्ण समजून घेतल्या नाहीत तर, दावा करताना अडचण येते. उदाहरणार्थ, काही पॉलिसीमध्ये हॉस्पिटलच्या रूमचे भाडे, सर्जरीच्या खर्चाचे मर्यादित कव्हरेज दिले जाते. जर पॉलिसीधारकांनी याची काळजी न घेता अधिक महागडे रूम निवडले, तर विमा कंपनी बिलाच्या प्रमाणात कमी रक्कम देऊ शकतात.
को-पेमेंट आणि कटिंग: काही पॉलिसीमध्ये सह-भुगतान (को-पेमेंट) व्यवस्था असते, ज्यामुळे येणाऱ्या बिलाच्या काही टक्केवारीचा खर्च पॉलिसीधारकाला स्वतः करावा लागतो. यामुळे बिलाचा 20% किंवा त्याहून अधिक खर्च पॉलिसीधारकाच्या खिशातून भरावा लागतो, त्यामुळे दावा रक्कम कमी होऊ शकते.
गैर खर्च: बऱ्याच वेळा विमा कंपनी काही खर्च अनावश्यक किंवा गैर मानतात आणि त्यांना कव्हर दिला जात नाही. यामध्ये नातेवाईकांच्या भोजनाचा खर्च, रुग्णालयातील उधारी अशा गोष्टी येतात, ज्यांचा आरोग्याशी काही संबंध नसतो.
पॉलिसी घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा : हेल्थ इन्शुरन्स विमा घेताना त्याच्या अटी आणि शर्ती पूर्णपणे समजून घ्या. पॉलिसीमध्ये कव्हर केलेल्या आणि कव्हर न केलेल्या गोष्टींची यादी तपासून पहा. पॉलिसीच्या कागदपत्रांवर न वाचता स्वाक्षरी करू नका. हे लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीला दुर्लक्ष केल्यास दावा नाकारला जाऊ शकतो किंवा रक्कम कमी मिळू शकते.
योग्य पॉलिसीची निवड करा: को- पेमेंट असणारी पॉलिसी तुम्हाला परवडत असेल तरच ती निवडा. को-पेमेंट किंवा कटिंग असणारी पॉलिसी घेतल्यास तुम्हाला अतिरिक्त खर्च सहन करावा लागू शकतो. यामुळे आपला वैद्यकीय खर्च वाढतो. म्हणून, शक्य असल्यास पूर्ण कव्हरेज असलेली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडा. (Health Insurance Policy Claim)
विमा कंपनीची नेटवर्क हॉस्पिटल निवडा: विमा कंपनीशी टाईप असलेल्या नेटवर्क रुग्णालयांमध्येच उपचार घ्या. यामुळे तुम्हाला कटिंग आणि इतर खर्चात सवलत मिळू शकते. अशा रुग्णालयांमध्ये दावा करण्याची प्रक्रिया सुलभ आणि लवकर होते.
कमी रक्कम मिळण्याची टाळण्याचे उपाय
विमा कंपनीच्या अटी पूर्ण समजून घ्या: पॉलिसी घेण्यापूर्वी विमा कंपनी कडून पॉलिसीच्या अटी आणि त्यात दिलेल्या मर्यादा पूर्णपणे समजून घ्या. खासकरून रूम्सच्या भाड्याची मर्यादा आणि को-पेमेंट यासारख्या गोष्टींची पूर्ण माहिती घ्या आणि अटींवर लक्ष ठेवा.
कोणत्या गोष्टींना कव्हर दिले जाते ते तपासा: अनेक विमा कंपन्या आता पीपीई किट्स, मास्क आणि इतर उपभोगाच्या वस्तू कव्हर करतात. अशा गोष्टी क्लेम कव्हरमध्ये आहेत की नाहीत, याची खात्री करूनच पॉलिसी निवडा.
विस्तृत कव्हरेज असलेली पॉलिसी निवडा: पूर्वीच्या पॉलिसी मध्ये लिमिटेड कव्हर होते पण अलीकडच्या पॉलिसीमध्ये विमा कंपन्या विविध प्रकारच्या उपचारांसाठी विस्तारित कव्हरेज देत आहेत. ही पॉलिसी घेऊन तुम्ही कोण कोणत्या प्रकारच्या मर्यादा टाळू शकता. तसेच, नवीन पॉलिसीमधील अटी आणि शर्ती जुन्या पॉलिसींपेक्षा सुधारित आहेत कि नाहीत याची संपूर्ण माहिती घ्या, त्यानंतरच नवीन पॉलिसी घेताना विचार करूनच सुरु करा.
बीमा लोकपाल सेवा: जर तुम्हाला क्लेम केल्यानंतर कमी रक्कम मिळाली आहे किंवा तुम्हाला अन्यायकारक वागणूक दिली आहे, असे वाटत असेल तर तुम्ही बीमा लोकपालाकडे तक्रार करू शकता. यामुळे तुम्हाला योग्य न्याय मिळण्याची शक्यता आहे.
निष्कर्ष: Health Insurance Policy Claim
विमाधारकाने हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम विमा पॉलिसी घेताना पॉलिसीतील सर्व अटीं लक्षात घेणे आवश्यक आहे. कमी रक्कम मिळण्याची टाळण्यासाठी सर्व अटी समजून घेतल्याशिवाय पॉलिसी न घेणेच शहाणपणाचे आहे. पॉलिसीधारकांनी त्यांची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन पॉलिसीची निवड करावी. तसेच, दावा करताना योग्य बिल, हॉस्पिटल कागदपत्रे सबमिट करावीत त्याच बरोबर दावा करताना पॉलिसीच्या मर्यादा आणि उपभोगाच्या वस्तूंसाठीची पॉलिसीच्या अटींवर लक्ष ठेवावे.
Table of Contents