Bajaj CNG Bike: भारतीय मोटारसायकल निर्माती कंपनी ‘बजाज ऑटो’ ने कंप्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) वर चालणारी जगातील पहिली बाईक, Bajaj Freedom 125 भारतीय मार्केट मध्ये नुकतीच सादर केली आहे. ही बाइक पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालते. या 125CC बाईक श्रेणीतील रायडर्ससाठी लागणारा खर्च लक्षणीयरीत्या कमी करण्याचा उद्देश कंपनी समोर आहे.
दरम्यान, बाइक चे बुकिंग आजपासून सुरू झाले आहे. इजिप्त, टांझानिया, पेरू, इंडोनेशिया आणि बांग्लादेश यांच्या बाजारपेठेत निर्यात करण्याच्या योजनांसह प्रारंभिक स्वरूपात गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात हि बाईक उपलब्ध असेल. ही बाईक इंधन कार्यक्षमतेसह पर्यावरणपूरक प्रवासासाठी आदर्श आहे. या लेखात आपण या बाईकच्या सर्व महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती घेऊ.

bajaj cng bike: Bajaj Freedom 125
Bajaj Freedom 125 सीएनजी बाइकमध्ये एलईडी हेडलाइट, मोनोशॉक रिअर सस्पेन्शन, एलईडी हेडलाइट आणि फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. कंपनीने बाइकला एक मजबूत डिझाइन दिले आहे, ज्याला अनेक प्रकारच्या क्रॅश चाचण्यांद्वारे प्रमाणित केले गेले आहे. या बाईकमध्ये 2 किलो वजनाची CNG टाकी आणि 2 लीटरची पेट्रोल टाकी बसवण्यात आली आहे, ज्यामुळे रायडर्सना एका बटणावरती PETROL आणि CNG दरम्यान स्विच करता येते. या नवीन सिस्टीम मुळे इंधन खर्च आणि उत्सर्जन कमी होऊ शकते, ज्यामुळे मोटारसायकल उद्योगात एक नवीन मानक स्थापित होईल.
बजाज फ्रीडम 125 bajaj cng bike चे मायलेज किती आहे?
ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर चालते आणि पर्यावरणावर ताण कमी पडतो. सीएनजी इंधनामुळे या बाईकला अधिक मायलेज मिळेल, जे इंधन खर्चात मोठी बचत करेल, याच्या पेट्रोल प्रणालीतही उत्तम मायलेज मिळते. दुहेरी इंधन प्रणालीमुळे इंधनाच्या दोन्ही पर्यायांचा फायदा होईल. 2kg CNG टँक आणि 2-लीटर पेट्रोल टाकीसह एकत्रित मायलेज सुमारे 332kmpl असेल.
बजाज कंपनीने ने त्यांच्या प्रेस कॉन्फेरंस मध्ये सांगितले आहे कि, Bajaj Freedom 125 केवळ सीएनजीवर 214km पर्यंतचा प्रवास कव्हर करू शकते, पेट्रोल टाकीद्वारे अतिरिक्त 118km किमी कव्हर केला जाऊ शकतो, एकूण 332 किमीची रेंज हि बाईक देईल, (मायलेज रायडर्सच्या चालवण्याची कला आणि रोड अवस्था यावरती बदलू शकते) पण हे लक्षात घेण्यासारखे आहे की बाईकचा CNG संपल्या नंतर पेट्रोल हे सहायक इंधन म्हणून वापरायचे आहे. याचा अर्थ, बाइकची केवळ सीएनजी-ची रेंज सुमारे 214kmpl पर्यंत असेल.

Bajaj Freedom 125 व्हेरिएंट किंमत
‘बजाज ऑटो’ ने जगातील पहिली CNG बाईक Bajaj Freedom 125 भारतात नुकतीच लॉन्च केली आहे. कंपनीने हि बाइक डिस्क एलईडी, ड्रम एलईडी आणि ड्रम या तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. या बाइकच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 95,000 रुपये, ड्रम एलईडीची किंमत 1,05,000 रुपये आणि डिस्क एलईडीची किंमत 1,10,000 रुपये ठेवण्यात आली आहे. (सर्व किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत).
Bajaj Freedom 125 डिजाईन & इंजिन पॉवर
बजाज फ्रीडम 125 सीएनजीचे डिझाईन आकर्षक आणि आधुनिक आहे. याच्या स्टायलिश ग्राफिक्स आणि स्पोर्टी लुकमुळे ही बाईक तरुणांच्या मनात स्थान मिळवत आहे. याच्या फ्रंट आणि रियर लाईट्स आधुनिक LED तंत्रज्ञानावर आधारित आहेत, ज्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी उत्कृष्ट व्यूजव्हल्स मिळतात. सोबत बाईकमध्ये 17-इंच अलॉय व्हीलवर टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक सस्पेन्शन, फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेकची वैशिष्ट्ये दिली आहेत.

कंपनीने यामध्ये ड्युअल फ्युएल इंजिन बसवले आहे. बजाज ने या बाइक मध्ये 4 स्ट्रोक 125 CC सिंगल-सिलेंडर, इंधन इंजेक्शनसह एअर-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 9.4 bhp @8000 rpm पॉवर आणि 9.7 Nm 5000RPM टॉर्क जनरेट करेल, जे शहरातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर उत्कृष्ट कार्यक्षमतेणे काम करेल. बाईकमध्ये 5 स्पीड चेंज गिअरबॉक्स आहे.
हेडलॅम्प मध्ये आधुनिक-रेट्रो लूक्सचा वापर केला आहे. बाइकच्या डिझाइनमध्ये राइडिंग पोझिशनसाठी फ्लॅट सीट, रुंद हँडलबार आणि सेंटर फूटरेस्ट समाविष्ट आहेत. सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये सीएनजी अलर्ट आणि न्यूट्रल गियर इंडिकेटर यांसारखे विविध सिग्नल्स दिले आहेत.
बजाज फ्रीडम 125 खर्च
महाराष्ट्रात सरासरी 89.90 रुपये प्रति किलो CNG किंमत आणि 104Rs प्रति लिटर पेट्रोल लक्षात घेता, CNG- साठी प्रति किलोमीटर सुमारे 0.84 रुपये खर्च अपेक्षित आहे. जर तुमचे महिन्याचे रनिंग सरासरी 1000km असेल, तर तुम्हाला दरमहा 841Rs रुपये CNG इंधन खर्च अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात सरासरी पेट्रोलची किंमत रु. 105Rs लिटर आणि पेट्रोलवर चालणाऱ्या 125CC बाईकच्या मायलेजची तुलना करता, TVS Raider 125, 68.69kmpl आहे. त्यामुळे 1.53 रुपये प्रति किलोमीटर खर्च येईल, जो सीएनजी बाइकपेक्षा 0.66 रुपये अधिक आहे, महिना रनिंग 1000KM पेट्रोलसाठी 1,499Rs रुपये खर्च करावे लागतील.
Bajaj Freedom 125 Comfort
ही bajaj cng bike बाईक दीर्घ प्रवासासाठी आदर्श आहे, कारण तिची सीट आरामदायी आणि रुंद आहे. यात टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि ट्विन शॉक रियर सस्पेंशन आहे, जे प्रवास अधिक आरामदायी बनवते. या बाईकचे हँडलबार राइडरला उत्कृष्ट कंट्रोल देते, ज्यामुळे कंट्रोल आणि स्टेबिलिटी वाढते. Bajaj Freedom 125 CNG मध्ये ड्रम ब्रेक्स आणि एबीएस सिस्टम आहे, ज्यामुळे ब्रेकिंग कार्यक्षमता वाढते आणि राइडरला अधिक सुरक्षा मिळते. यात ट्यूबलेस टायर्स आहेत, ज्यामुळे पंक्चर होण्याची शक्यता कमी होते.

बजाज फ्रीडम 125 सीएनजी: तुम्ही का खरेदी करावे याची कारणे
बजाज फ्रीडम ही जगातील पहिली CNG मोटारसायकल आहे. सीएनजीसह, मोटरसायकलची धावण्याची किंमत त्याच्या पेट्रोल खर्चा पेक्षा सुमारे 50 टक्के बचत करते. 5-स्पीड गिअरबॉक्सशी ट्रेलीस फ्रेमवर जोडलेली बाईक हेडलाइट आणि टेल लाइटसह सर्व एलईडी लाइटिंग सहित आहे. एंट्री-लेव्हल ट्रिमला हॅलोजन हेडलाइट मिळते. LCS इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो तुमच्या स्मार्टफोनशी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे जोडला जाऊ शकतो आणि कॉल आणि एसएमएस अलर्ट पाठवतो. कन्सोल स्पीडोमीटर, ओडोमीटर, इंधन गेज, गियर इंडिकेटर आणि रिअल-टाइम आणि इंधन वाचतो. पेट्रोलमधून CNG इंधनावर स्विच करण्यासाठी डाव्या हँडलबारवर एक स्विच दिले आहे आहे.
बजाज फ्रीडम 125 bajaj cng bike रायडर्ससाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे, ज्यामध्ये पर्यावरणपूरकता, इंधन कार्यक्षमता, आरामदायीता आणि स्टायलिश डिझाईन यांचे एकत्रीकरण आहे. बजाज ऑटोने आपल्या ग्राहकांसाठी एक योग्य आणि परिपूर्ण बाईक सादर केली आहे, जी त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करते. जर तुम्ही एक नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Bajaj fredoom 125 सीएनजी बाईक निश्चितच तुमच्या यादीत असावी.
या बाईक च्या अधिक माहितीसाठी किंवा बुकिंग साठी आपल्या जवळच्या बजाज शोरूम ला भेट द्या किंवा अधिकृत वेब साईट ttps://www.bajajauto.com/bikes/freedom/freedom-125-ng04-disc-led ला भेट द्या