Euro Cup 2024: युरो कप 2024 च्या अंतिम सामन्यात, स्पेनने इंग्लंडचा 2-1 ने पराभव केला. यासह स्पेन फुटबॉल संघाने इतिहास रचला. स्पेनच्या संघाने युरो कप जिंकण्याची ही चौथी वेळ ठरली. इंग्लंड संघाचे पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. याआधी 2020 च्या मोसमात इंग्लंड संघाला अंतिम फेरीत इटलीकडून पराभव पत्करावा लागला होता.
स्पेनने युरो कप 2024 चे विजेतेपद पटकावले, अंतिम फेरीत स्पेनने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला, इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा निराशा सहन करावी लागली.
स्पेन विरुद्ध इंग्लंड. युरो कप 2024 च्या अंतिम सामन्यात स्पेन फुटबॉल संघाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून इतिहास रचला. स्पॅनिश संघाने विक्रमी चौथ्यांदा युरो कप जेतेपद पटकावले. पूर्वार्धात स्पेनचे वर्चस्व होते, परंतु इंग्लंडने दडपणाखाली येऊन त्यांना 0-0 अशी स्कोअरलाइनवर रोखले.
स्पेनने दुस-या हाफमध्ये 47व्या मिनिटाला नेको विल्यम्सने गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली, पण कोल पामरने 73व्या मिनिटाला बरोबरी साधत इंग्लंडला सामन्यात परत आणले. स्पेनचा बदली खेळाडू मिकेल ओयारझाबालने 86 व्या मिनिटाला विजयी गोल करत, आपल्या संघाला 2-1 असा विजय मिळवून दिला.
स्पेन फुटबॉल संघाने इंग्लंडला हरवून इतिहास रचला
खरेतर, स्पेनने अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत युरो कप 2024 चे विजेतेपद पटकावले. 14 जुलै रोजी बर्लिन येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. त्याचवेळी इंग्लंड संघाचे पुन्हा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. इंग्लंडचा संघ सलग दुसऱ्यांदा युरो कपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
याआधी 2020 च्या मोसमात इटलीकडून विजेतेपदाच्या सामन्यात पराभव झाला होता. स्पेनने यापूर्वी 1964, 2008 आणि 2012 मध्ये युरोपियन चॅम्पियनशिप जिंकली होती. युरो 2024 चे विजेतेपद जिंकून, स्पेन फुटबॉल संघ युरो कपचा सर्वात यशस्वी संघ बनला आहे, तर जर्मनी तीन विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
Euro Cup 2024: विजेते पारितोषिक रक्कम, पुरस्कार विजेता
सामनावीर (अंतिम) – निको विल्यम (स्पेन)
यंग प्लेअर ऑफ द टूर्नामेंट- लॅमिने यामल (स्पेन)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू- रॉद्री (स्पेन)
स्पेन पारितोषिक रक्कम – रु. 256.84 कोटी
इंग्लंडची पारितोषिक रक्कम- रु. 220.48 कोटी
https://www.sonyliv.com/sports/football-uefa-euro-2024-1700000714
Table of Contents