How Life Insurance Helps In Tax Savings: आपल्या भविष्याचे आर्थिक नियोजन करणे म्हणजे केवळ संपत्ती वाढवणे नसून, आपल्या भविष्यासाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता निर्माण करणे हे देखील महत्वाचे आहे. अनेक उत्पन्न स्तोत्रांपैकी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी योजनाद्वारे आर्थिक नियोजन करणे हा देखील तितकाच महत्वाचा भाग आहे. ज्याद्वारे केवळ आपल्या कुटुंबासाठी सुरक्षेची खात्री तर मिळतेच त्यासोबत कर वाचविण्याचे अनेक फायदे देखील मिळतात.
आयकर कायदा कलम 80C अंतर्गत लाईफ इन्शुरन्स प्रीमियमसाठी आपणास टॅक्स मधून वाजवट मिळते, कलम 10(10D) अंतर्गत टॅक्स-फ्री मॅच्युरिटी रक्कम मिळते आणि इन्शुरन्स मधील विविध रायडर्सवरती कलम 80D च्या लाभांचासुद्धा टॅक्स वाचवण्यासाठी उपयोग होतो. या सर्व गोष्टी सोबत आपण करबचत कशी वाढवू शकतो, याबद्दल सविस्तर माहिती या लेखा मध्ये दिली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी हे लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.
लाईफ इन्शुरन्स आणि कर फायदे
80C अंतर्गत इन्शुरन्स प्रीमियम वजावट: आयकर कायदा 1961 च्या 80C कलमानुसार, आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसीवर भरलेल्या प्रीमियमसाठी दरवर्षी ₹1.5 लाखांपर्यंत कर वजावट घेऊ शकतो. ही वजावट आपल्या करपात्र उत्पन्नातून कपात होते आणि कराची एकूण देय रक्कम कमी होते. एकट्या व्यक्तींपासून हिंदू अविभाजित कुटुंबांपर्यंत (HUF) सर्वच याचा लाभ घेऊ शकतात.
10(10D) अंतर्गत परिपक्वता रक्कम करमुक्त: आयकर कायदा 10(10D) च्या नियमानुसार, जीवन विमा पॉलिसीची परिपक्वता रक्कम आणि मृत्यूनंतर लाभार्थ्याला दिले जाणारे फायदे हे करमुक्त असतात. यामुळे विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना संपूर्ण विमा रक्कम मिळते आणि त्यावर कोणताही कर लागू होत नाही. (How Life Insurance Helps In Tax Savings)
80D अंतर्गत क्रिटिकल इलनेस रायडरवरील कर फायदे: जीवन विमा पॉलिसीमध्ये अनेकदा गंभीर आजारांसाठी अतिरिक्त कवच मिळविण्यासाठी रायडर जोडण्याचा पर्याय असतो. 80D अंतर्गत या रायडरच्या प्रीमियमवर कर वजावट मिळते. यामुळे केवळ आर्थिक सुरक्षा मिळत नाही, तर कर बचतही होते.
कर बचतीसाठी स्मार्ट विमा नियोजनाचे उपाय
ULIP प्लॅन्स द्वारे कर वाचवणाऱ्या गुंतवणूक पॉलिसी निवडणे:
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) हे आयुर्विमा आणि गुंतवणूक यांचे एक खूप चांगले संयोजन आहे. ULIP द्वारे केलेल्या योजनांमधील गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न करमुक्त असते जोपर्यंत ते पॉलिसीच्या मर्यादेत आहे. कोणत्याही दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय अतिशय फायदेशीर ठरतो. (How Life Insurance Helps In Tax Savings)
टॅक्स-फ्री कर्ज किंवा अंशतः पैसे काढण्याचा पर्याय:
काही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कॅश व्हॅल्यूवर आधारित कर्ज घेण्याचा सुविधा किंवा अंशतः पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध असतो. हे पैसे अनेकदा करमुक्त असतात, ज्यामुळे आपल्या तातडीच्या गरजा पूर्ण करताना अतिरिक्त कर भरण्याची चिंता राहत नाही.
इस्टेट प्लॅनिंगसाठी विम्याचा योग्य वापर:
लाईफ इन्शुरन्स पॉलिसी या इस्टेट प्लॅनिंगचा महत्त्वाचा भाग बानू शकतात. आपल्या नॉमिनीना योग्य प्रकारे नियुक्त करून आपण संपत्ती, टॅक्स-एफिशियंट पद्धतीने हस्तांतरित करू शकतो. शिवाय, विम्याद्वारे मिळणाऱ्या रक्कमेतून इस्टेट, टॅक्स किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या सहज पेलल्या जाऊ शकतात.
लाईफ इन्शुरन्स निवडताना विचारात घ्यायचे महत्त्वाचे मुद्दे.
आयुर्विमा गरजांचे विश्लेषण: लाईफ इन्शुरन्स योजना घेताना, आपल्या गरजांचे सखोल विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, गृहकर्ज फेडण्यासाठी किंवा निवृत्तीनंतरच्या गरजांसाठी किती लाईफ कव्हर आवश्यक आहे, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
योग्य पॉलिसीची निवड: आपल्या आर्थिक उद्दिष्टांशी आणि लाईफ कव्हर गरजांशी सुसंगत आयुर्विमा पॉलिसी निवडणे गरजेचे आहे. एंडोमेंट किंवा मनी बॅक पॉलिसी मधून स्थिर रक्कम मिळते, तिथे ULIPs योजनांमधून बाजाराशी जोडलेल्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतात. योग्य पॉलिसीची निवड केल्याने आपल्याला दीर्घकालीन फायदे मिळतात.
तज्ञाचा सल्ला घ्या: लाईफ इन्शुरन्स योजनांची विविधता लक्षात घेता, योग्य पॉलिसीची निवड करणे कधी कधी कठीण होऊ शकते. त्यासाठी LIC आयुर्विमा प्रतिनिधी किंवा अधिकृत आर्थिक सल्लागार यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्या द्वारे योजनांची निवड करा आणि आपल्या इन्कम टॅक्स बचतीसाठी याचा वापर करून घ्या.
निष्कर्ष: How Life Insurance Helps In Tax Savings
लाईफ इन्शुरन्स केवळ आर्थिक सुरक्षेसाठी नसून, कर बचतीसाठीही एक महत्त्वाचे साधन आहे. योग्य पद्धतीने नियोजन करून प्रीमियम वजावट, करमुक्त मॅच्युरिटी रक्कम आणि ULIP योजनांद्वारे वर दीर्घकालीन वाढ यांचा फायदा आपण घेऊ शकतो. योग्य पॉलिसीची निवड करून आणि स्मार्ट स्ट्रॅटेजींचा अवलंब करून आपण आपल्या आर्थिक उद्दिष्टांना गाठताना इनकम टॅक्स आणि इतर कराचा बोजा कमी करू शकतो.
अधिक माहिती साठी: (How Life Insurance Helps In Tax Savings)
- आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अधिक वाचा
- IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India)
Table of Contents