Khavale Mahaganapati: महाराष्ट्राचा महागणपती, 1701 पासून उत्सव; ज्याची नोंद लिम्का बुक ने सुद्धा घेतली.

Khavale Mahaganapati : महाराष्ट्राचा महागणपती ज्याची नोंद लिम्का बुक ने सुद्धा घेतली आहे. असा हा गणपती आहे तरी कसा चला त्याबद्दल जाणून घेऊया. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वसलेल्या तारा मुंबरी गावातील प्रसिद्ध खवळे महागणपतीची नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती आहे. 2010 साली लिम्का बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड मध्ये या महागणपतीची नोंद झाली आहे. 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तीन रूपामध्ये दर्शन देणारा गणपती अशी या गणपतीची नोंद आहे. या अशाच काही कारणामुळे खवळे महागणपती प्रसिद्ध आहे. 

खवळे महागणपती वंशवृद्धी करणारा असल्याने लोक याचे दर्शन घेण्यासाठी तारा मुंबरी गावात येतात. महाराष्ट्रातील कोकणासह कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई तसेच गोवा व गुजरात या राज्यातूनही भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. राजकारणी मंडळी तर हौसेने या गणरायाचे दर्शन घेतात. अशा या गणपतीची ख्याती जगभरात पोहोचली आहे.

Khavale Mahaganapati स्थापना

Khavale Mahaganapati ची स्थापना शिवकाळात तब्बल 323 (सन1701) वर्षांपूर्वी झाली. हा इतिहासाही अतिशय रोमांच कारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार शिव तांडेल यांना अपत्य होत नव्हते, तेंव्हा शिव तांडेल यांना गणपती ने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की “तू माझा मोठा उत्सव कर, तुला अपत्य प्राप्ती होईल” तेव्हा पासून खवळे महागणपतीच्या उत्सवाला सुरुवात झाली. तेंव्हा पासून आजपर्यंत त्यांच्या अकरावी पिढी पर्यंत हा गणपती उत्सव साजरा होत आहे.

महागणपती (Khavale Mahaganapati) इतिहास 

नवसाला पावणारा हाकेला धावणारा महागणपती : हे सरदार नाना खवळे यांचे घर, देवघर म्हणून प्रसिद्ध आहे. या महागणपतीचा महोत्सव सतत तीनशे वर्षापेक्षा जास्त चालू आहे.  

Khavale Mahaganapati
Khavale Mahaganapati

नवसाला पावणारा हाकेला धावणारा महागणपती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुराब जातीच्या जहाजांचा प्रमुख असलेल्या सरदार शिवतांडेल यांचा वंश वाढत नव्हता. मालवण येथील मालडी गावातील नारायण मंदिरात ते दररोज पूजा करत असत. अनेक वर्ष त्यांना मूल होत नव्हते. या नारायण मंदिरात एक गणपतीची मूर्ती आहे ती त्यांच्या स्वप्नात आली आणि त्यांना दृष्टांत दिला कि तू माझा माझा मोठा उत्सव कर तुला पुत्ररत्न होईल.

स्वप्नामध्ये दिलेल्या दृष्टांत प्रमाणे शिव तांडेल यांनी सतराशे एक मध्ये गणपती उत्सव केला त्यानंतर त्यांना पुत्ररत्न झाले.  त्यांनी त्याचे नाव गणोजी असे ठेवले. त्यांना आलेल्या प्रत्ययानंतर हा उत्सव त्यांनी कायमस्वरूपी चालूच ठेवला

1756 साली गणोजी विजयदुर्ग वर इंग्रजांशी झालेल्या लढाईत लढताना पकडले गेले व त्यांना शिक्षा झाली. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांची समाधी तारा मुंबरी येथील खवळे घराण्याच्या शेतात आहे. आजही गणोजी सरदारांची समाधी समोर परंपरेने दर सोमवारी दिवा, अगरबत्ती लावली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार शिव तांडेल, सरखेल तुळोजी आंग्रे (कान्होजी आंग्रे यांचे नातू ) यांचा मुख्य सरदार गणोजी यांची नववी, दहावी व अकरावी पिढी आज त्याच उत्साहात या महागणपतीचा उत्सव साजरा करीत आहेत.

महागणपतीची ही काही वैशिष्ट्य

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गणपतीची कुठेही मंदिर नाही. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि 21 दिवसांनी विधिवत विसर्जन होते. 

एक शेतातील साधी माती जवळजवळ दीड टन आणून ती लाकडी घनाने मळून त्याचे गोळे केले जातात. या महागणपतीची (Khavale Mahaganapati) मूर्ती बनवण्यात श्रावण नारळी पौर्णिमेला सुरुवात करतात. ही मूर्ती याच घरातील पुरुषांनी बनवावी लागते, बाहेरील मूर्तिकार चालत नाही. सूर्यकांत खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद, विकट, अक्षय, अनंत व चिन्मय हे बंधू ही मूर्ती बनवतात. ठराविक दिवसांचे अंतर ठेवून ती बनवली जाते ही मूर्ती साच्याशिवाय संपूर्ण हाताने बनवतात त्यामुळे ती संपूर्ण भरीव असते. ही मूर्ती बैठी सहा फूट उंचीची आहे. गणेश चतुर्थीला या Khavale Mahaganapati संपूर्ण अंगाला सफेद चुना लावून पूजेला बसवितात. फक्त डोळे रंगवले जातात आणि विधिवत पूजा होते यावेळी उंदीर नसतो. 

दुसऱ्या दिवशी उंदीर पूजेला लागतात. उंदीरासाठी नैवेद्य म्हणून खीर बनवली जाते. तिसऱ्या दिवशी महागणपतीचे रंगकाम सुरू होते. पाचव्या दिवशी संपूर्ण रंगवून पूर्ण होतो. संपूर्ण अंगाला लाल रंग, चांदीच्या रंगाचा अंगरखा, पिवळे पितांबर, सोनेरी मुकुट, त्यावर पाच फणी नाग, मागे गोल कागदी पंखा, हातावर शेला अशी काहीशी उग्र पण विलोभनीय मूर्ती असते. 

पाचव्या दिवसापासून सकाळी संध्याकाळी व रात्री अशी तीन वेळा आरती केली जाते. दररोज संध्याकाळी लहान मुलांप्रमाणे घरातील सुवासिनी या महागणपतीची दृष्ट काढतात. दररोज रात्री भजन करावे लागते. 

सातव्या, अकराव्या, पंधराव्या, सतराव्या व विसाव्या दिवशी असे सतत रंगकाम चालू असते. शेवटचे रंगकाम विसर्जनाच्या दिवशी दुपारी केले जाते. यावेळी संपूर्ण चेहऱ्यावर लाल रंगावर पिवळे ठिपके दिले जातात त्यामुळे मूर्ती च्या उग्रतेत आणखी भर पडते. राक्षसांशी लढणाऱ्या विकट रूपाचा भास होतो. 

पहिले तीन दिवस सफेद रंग, नंतर संपूर्ण रंगकाम झालेला व विसर्जनाच्या दिवशी पिवळे ठिपके दिलेला असा 21 दिवसात वेगवेगळ्या तीन रूपात दिसणारा हा जगातील पहिलाच महागणपती आहे. 

विसावी रात्र जागर किंवा लळीत म्हणून साजरी केली जाते. या दिवशी संध्याकाळी पूर्वजांच्या पगड्यांची देवघरात पूजा केली जाते. त्याला जैन पूजा असे म्हणतात. रात्री एका पुरुषाला साडी नेसवून डफ, तुणतुणे, ढोलकी असा तमाशाचा फड उभा करून नाचवले जाते. पहाटे वारी अंगात येणे व देव खुदवली जातात. रात्री जो पुरुष साडी घालून नाचतो, त्याला पहाटेची आरती धरायला दिली जाते. यावेळी महागणपतीची व त्याची दृष्ट काढली जाते. नंतर महागणपती (Khavale Mahaganapati) समोर पुरुष फेर धरून नाचतात व हा कार्यक्रम संपतो.

महागणपती विसर्जन

विसर्जनाच्या सकाळी खवळे कुटुंबीयातील कैलासवासी झालेल्या सर्वांना पिंडदान केले जाते. महागणपती समोर पिंडदान होणारा हा जगातील पहिलाच गणपती आहे. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भक्तांना महाप्रसाद दिला जातो. दुपारी पावन झालेले नवस फेडले जातात व नवीन नवस बोलले जातात. वंश वृद्धीसाठी हा महागणपती प्रसिद्ध असल्याने मूल होण्यासाठी व लग्नासाठी हा महागणपती नवसाला पावतोच असा लौकिक आहे. 

Khavale Mahaganapati विसर्जनासाठी 25 ते 30 तगडे पुरुष लागतात. 25 ते 30 ढोलांचे पथक, लेझीम, मृदुंग, गुलाल उधळत भाल्यावर लावलेले भगवे झेंडे, तलवारी नाचवत महागणपती विसर्जनाच्या ठिकाणी आणला जातो. मिरवणुकीला हजारो भक्त सामील झालेले असतात. महागणपती विसर्जनाच्या ठिकाणी दांडपट्टा, तलवार, लाठी काठी अशी शिवकालीन मर्दानी  खेळ प्रकार खेळले जातात. पुरुष फेर धरून नाचतात. विसर्जनाला पाण्यात प्रथम उंदीर नेला जातो नंतर सागाची फळी पाठाखाली घालून महागणपती खांद्यावरून पाण्यात नेला जातो व विधीवत विसर्जित केला जातो.

महागणपती चित्रपट

महागणपती चा इतिहास जगभरात पोहोचविण्यासाठी महागणपती(Khavale Mahaganapati) वरती 2016 साली ‘विघ्नहर्ता महागणपती’ हा मराठी चित्रपट सुध्दा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक राजेश चव्हाण यांनी सांगितले की चित्रपटात चमत्कार नाही की अंधश्रद्धा नाही. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली आहे. केवळ धार्मिक स्वरूपातील हा चित्रपट नाही खवळे महागणपतीच्या इतिहासाची सत्यता पडताळून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

Khavale Mahaganapati
Khavale Mahaganapati

अनेक जगावेगळी वैशिष्ट्य असलेला असा हा Khavale Mahaganapati या वैशिष्ट्या मुळे लिम्का बुकने त्याला मान्यता दिली आहे. सर्व भक्तांना सुख आणि समृद्धी मिळो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

source https://en.wikipedia.org/wiki/India

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur