Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गुरुवार पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पंचांगा नदीची पाणी पातळी गेल्या काही तासामध्ये वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ७४ छोटे, मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात चार फुटाने वाढली आहे. दुपारी चार वाजता ३३ फुटाच्या वरती पाणी वाहत आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फुट आहे, त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु केली आहे. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर अधिक जास्त असल्याने धरणांच्या पाणी पातळी वेगाने वाढत आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड व शाहूवाडी तालुक्यात जोराचा पाऊस सुरु आहे.
राधानगरी धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठा झाला असून आजपर्यंत ६.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील जंगमहट्टी, घटप्रभा आणि जांबरे तीन लघू प्रकल्प यापूर्वीच भरले आहेत. कडवी धरण ८५ टक्के भरले आहे, तर कासारी धरण ७० टक्के भरले आहे. अलमट्टी धरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरणामध्ये ८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अलमट्टी धरण भरण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रातही पाऊस असल्याने राधानगरी धरणातून प्रतिसेंकद १५००, वारणा धरणातून १६१०, कासारी धरणातून ५९०, कुंभी धरणातून ३१०, घटप्रभा धरणातून ७१३० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.

Kolhapur Rain Update कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेले बंधारे?
- वारणा नदी- चिंचोली, माणगांव, तांदुळवाडी, खोची
- भोगावती नदी- हळदी, राशिवडे,कोगे, शिरगाव
- पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ, रुकडी, तेरवाड
- कासारी नदी- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे,
- घटप्रभा नदी- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी
- ताम्रपर्णी नदी- कुर्तनवाडी, हालरवाडी, काकर, माणगाव, न्हावेली
- हिरण्यकेशी नदी – साळगाव,
- दुधगंगा नदी- दत्तवाड
- कुंभी नदी – कळे, शेनवडे, मांडुकली, सांगशी
- तुळशी नदी – बीड
- वेदगंगा नदी – निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी, म्हसवे
- धामणी नदी – सुळे, पनोरे आंबर्डे, गवशे
अधिक माहितीसाठी https://www.accuweather.com/en/in/kolhapur/189317/weather-forecast/189317 या लिंक ला क्लीक करा
Table of Contents