LIC Jeevan Tarun Plan: मुलांच्या भविष्य, शिक्षणासाठी सर्वोत्तम योजना, महिना जमा करा फक्त 5000/-रुपये. 

LIC Jeevan Tarun Plan: भारतातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी एलआयसी ने आपल्या विमाधारकासाठी एक विशिष्ट पद्धतीची योजना सुरू केली आहे. जेव्हा आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याचा विचार येतो, तेव्हा योग्य आर्थिक नियोजन आणि आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ असल्याची खात्री करणे महत्त्वाचे असते. या योजनेमार्फत विमाधारक आपल्या मुलांच्या भविष्यातील व्यवसाय, शिक्षण, लग्न, त्यांचं करिअर इत्यादी गोष्टींचे नियोजन करू शकतो.

एलआयसी ची जीवन तरुण योजना ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी डिझाईन केलेली अशीच एक गुंतवणूक  योजना आहे, जी तुमच्या मुलाचे उज्वल आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करते. या लेखांमध्ये जीवन तरुण योजनेची वैशिष्ट्ये, फायदे इ. तपशीलवार माहिती देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला या योजनेबद्दल योग्य ते निर्णय घेण्यास मदत होईल, त्यासाठी कृपया हा लेख काळजीपूर्वक वाचा.

LIC Jeevan Tarun plan
LIC Jeevan Tarun plan

LIC Jeevan Tarun Plan योजना काय आहे ?

एलआयसीची LIC Jeevan Tarun Plan तरुण योजना मुख्यतः लहान मुलांच्या भविष्यासाठी तयार केली आहे. ही एक नॉन लिंक, सहभागी, मर्यादित प्रीमियम पेमेंट आयुर्विमा योजना आहे. ही योजना बचती सोबत संरक्षणाची जोड देते, ज्यामुळे त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू पाहणाऱ्या पालकांसाठी ही एक योग्य निवड आहे. विशेषता वाढत्या वयाच्या मुलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली गेली आहे.

जीवन तरुण योजनेचे वैशिष्ट्ये काय आहे ?

  1. प्रवेशाचे वय: शून्य ते बारा वर्ष
  2. मॅच्युरिटी वय: 25 वर्षे 
  3. योजनेची मुदत: योजनेची मुदत निश्चित आहे. (मुलाचे प्रवेश वय वजा 25 वर्ष) उदाहरणार्थ मुलाचे वय पाच वर्षाचे असताना पॉलिसी सुरू केली असल्यास पॉलिसीची मुदत वीस वर्ष (25 -5) असेल.
  4. हप्ता भरण्यासाठी मुदत: योजना सुरू करताना असणारे वय वजा वीस वर्ष समान कालावधीसाठी प्रीमियम भरावे लागतील.
  5. विमा रक्कम: किमान विमा रक्कम रु. 75,000/- असून कमाल मर्यादा नाही.
  6. मॅच्युरिटी लाभ: ही योजना 20, 21, 22, 23, 24 वयासाठी विमा रकमेची ठराविक टक्केवारी देत राहते आणि उर्वरित रक्कम शेवटी म्हणजे वयाच्या 25 व्या वर्षी दिली जाते.
  7. मृत्यू लाभ: विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास या योजनेमध्ये जमा झालेल्या बोनसह विम्याची रक्कम नॉमिनीला परत दिली जाते.
LIC Jeevan Tarun PLan
LIC Jeevan Tarun PLan

एलआयसी जीवन तरुण योजनेचे फायदे

आपल्या मुलांच्या जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, चार वेगवेगळ्या सर्वायवल बेनिफिट पर्याय मधून एक पर्यायाची निवड करण्याची सोय LIC Jeevan Tarun Plan योजनेमध्ये मिळते. ही एक बोनस मध्ये सहभागी असणारी योजना आहे, त्यामुळे एलआयसी द्वारे घोषित केलेले बोनस मॅच्युरिटीच्या वेळेस आणि मृत्यूच्या फायद्यामध्ये वाढवून दिली जाते. या योजनेमध्ये भरलेले प्रीमियम आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र असतील. याशिवाय मॅच्युरिटी रक्कम ही कायद्याच्या कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त असेल. योजना सुरू केल्यापासून तीन वर्षाच्या कालावधीनंतर आपल्याला कोणत्याही कारणासाठी पैशाची गरज असेल तर यामध्ये कर्ज मिळण्याची सुविधा आहे.

LIC जीवन तरुण योजना उदाहरण

ही योजना सुरू करताना मुलाचे किंवा मुलगीचे वय 1 आहे असे गृहीत धरले, तर या योजनेचा एकूण कालावधी 24 वर्षाचा असेल त्यापैकी फक्त 19 वर्ष हप्ता भरावयाचा आहे. पाच हजार रुपये प्रत्येक महिना या अर्थाने रु. 5000 x 12 महिने = रु. 60,000/- वर्षाचे भरून घेतले जातील. हीच रक्कम आपल्याला 19 वर्ष भरायची आहे, 60,000 X 19 = 11,40,000/- एवढी मूळ रक्कम स्वरूपामध्ये भरून घेतली जाईल.

या योजनेअंतर्गत सर्वायवल बेनिफिट पर्याय क्रमांक चार निवडला असल्यास, 100% विमा रक्कम पैकी 15% रक्कम ही वयाच्या 20, 21, 22, 23 आणि 24 व्या वर्षी दिली जाईल आणि उरलेली 25% विमा रक्कम ही वयाच्या 25 यावर्षी मॅच्युरिटी स्वरूपामध्ये दिली जाईल. मुदत कालावधी मध्ये जमा झालेल्या बोनस मॅच्युरिटी सोबत दिला जाईल. याचबरोबर या योजनेमध्ये विमाधारकास 12,50,000- लाइफ कव्हर सिक्युरिटी दिले जाईल.

मॅच्युरिटी वेळेस संपूर्ण कालावधीमध्ये जमा झालेला बोनस 18,97,000/- आणि आपण भरलेली 11,40,000/- अशी एकत्रित रित्या 30,37,500 मॅच्युरिटी रक्कम मिळेल. यापैकी आपल्या पाल्यांच्या वयाच्या 20व्या वर्षी 1,87,500/-, 21व्या वर्षी 1,87,500/-, 22व्या वर्षी 1,87,500/-, 23व्या वर्षी 1,87,500/-, 24व्या वर्षी 1,87,500/- असे एकूण शेवटची 5 वर्षे सर्वायवल बेनिफिट स्वरूपामध्ये रक्कम मिळेल आणि 25व्या वर्षी 21,00,000/- मॅच्युरिटी रक्कम मिळेल. म्हणजेच या योजनेमध्ये एकूण 30,37,500 रु. रक्कम योजना धारकास मिळणार आहे.

LIC Jeevan Tarun Plan योजना कशी कार्य करते ?

ही LIC Jeevan Tarun Plan योजना सुरू केल्यानंतर पालकांना विमा रक्कम आणि सर्वायवल बेनिफिट पर्याय निवडणे आवश्यक आहे. निवडलेल्या प्रीमियम पेमेंट मुदत पर्यंत प्रीमियम नियमित भरणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये सर्वायवल बेनिफिट मिळण्यासाठी चे पुढील प्रमाणे चार पर्याय उपलब्ध आहेत, यापैकी कोणताही एक पर्याय निवडणे आवश्यक आहे.

पर्याय क्रमांक एक नुसार या मध्ये कोणतेही सर्वायवल बेनिफिट दिला जात नाही. संपूर्ण 100% विमा रक्कम आणि  बोनसची संपूर्ण रक्कम ही मुदत संपल्यानंतर योजना धारकास दिली जाईल.

पर्याय क्रमांक दोन नुसार विमा रकमेच्या 5% रक्कम मॅच्युरिटीपूर्व पाच वर्षासाठी दरवर्षी दिली जाईल आणि राहिलेली 75% रक्कम आणि त्याच्यावरील संपूर्ण बोनस मॅच्युरिटीला दिला जाईल.

पर्याय क्रमांक तीन नुसार विमा रकमेच्या 10% रक्कम मॅच्युरिटीपूर्व पाच वर्षासाठी दरवर्षी दिली जाईल आणि राहिलेली 50% रक्कम आणि त्याच्यावरील संपूर्ण बोनस मॅच्युरिटीला दिला जाईल.

पर्याय क्रमांक चार नुसार विमा रकमेच्या 15% रक्कम मॅच्युरिटीपूर्व पाच वर्षासाठी दरवर्षी दिली जाईल आणि राहिलेली 25% रक्कम आणि त्याच्यावरील संपूर्ण बोनस मॅच्युरिटीला दिला जाईल.

LIC जीवन तरुण योजना का निवडावी ?

ज्या पालकांना त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि इतर महत्त्वाच्या टप्प्यासाठी आर्थिक सहाय्यक सुनिश्चित करण्याची इच्छा आहे, त्यांच्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी बचत आणि विमा एकत्र हवा आहे, त्याचबरोबर विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लवचिकता पर्यायांचा, सर्वायवल बेनिफिटचा लाभ घ्यायचा आहे अशा सर्व मुलांच्या पालकांनी LIC Jeevan Tarun Plan ही योजना निवडावी.

LIC Jeevan Tarun PLan
LIC Jeevan Tarun PLan

एलआयसी जीवन तरुण योजना आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करून पाहणाऱ्या पालकांसाठी उत्तम पर्याय आहे. बचत, विमा संरक्षण आणि लवचिकता या पर्यायांच्या मिश्रणासह या योजनेमध्ये तुमच्या मुलांच्या शैक्षणिक आणि विकासात्मक गरजेंसाठी सर्व समावेशक उपाय प्रदान केले आहेत यासाठी एलआयसी जीवन तरुण योजनेत गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांच्या आर्थिक सुरक्षित भविष्याची हमी घ्या.

अधिक माहितीसाठी कृपया www.licindia.in वर क्लिक करा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q1: LIC Jeevan Tarun plan योजनेसाठी किमान आणि कमाल विमा रक्कम किती आहे?

किमान विमा रक्कम ₹75,000 आहे आणि कोणतीही कमाल मर्यादा नाही.

Q2: मी माझ्या LIC जीवन तरुण पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतो का?

होय, तुमच्या पॉलिसीने 3 वर्षानंतर समर्पण मूल्य प्राप्त केल्यानंतर तुम्ही कर्जाचा लाभ घेऊ शकता.

Q3: LIC जीवन तरुण योजनेशी संबंधित कोणते कर लाभ आहेत?

प्रीमियम कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र ठरतात आणि परिपक्वता प्राप्ती आयकर कायद्याच्या कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त आहेत.

Q4: LIC जीवन तरुण योजना कोणत्या वयात परिपक्व होते?

LIC Jeevan Tarun Plan : मूल 25 वर्षांचे झाल्यावर योजना परिपक्व होते.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now