LIC OF INDIA ची नवी योजना, 10% वार्षिक पेन्शन आयुष्यभरासाठी, इथे सर्व माहिती पहा.

LIC Jeevan Utsav Plan: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) लोकांच्या गरजेनुसार अनेक योजना घेऊन येत असते. LIC कडे प्रत्येक वयोगटातील प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन विम्याची विशेष योजना आहेत. अलीकडेच LIC ने आपल्या ग्राहकांना एका नवीन योजनेची भेट दिली आहे. एलआयसी ने नवीन मनी बॅक पेन्शन पॉलिसी ची सुरुवात केली असून या पॉलिसीचे नाव आहे जीवन उत्सव योजना. या योजनेमध्ये ग्राहकांना गॅरंटीड बोनस व गॅरेंटेड सर्वायवल बेनिफिट चे आश्वासन एलआयसी कडून दिले आहे.

LIC जीवन उत्सव योजना ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड, मनी बॅक लाइफ प्लॅन आहे. जी विमा रकमेच्या 10% पर्यंत उत्पन्नाचा लाभ पेन्शन स्वरूपात देते. तुम्हालाही एलआयसीची ही पॉलिसी घ्यायची असेल, तर तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत सविस्तर वाचावा लागेल. कारण आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे LIC Jeevan Utsav Plan संबंधित संपूर्ण माहिती देत आहोत चला तर मग, सविस्तर जाणून घेऊया LIC Jeevan Utsav Plan योजनेबद्दल.

LIC Jeevan Utsav Plan
LIC Jeevan Utsav Plan

योजना काय आहे?/what is LIC Jeevan Utsav Plan?

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने 29 नोव्हेंबर 2023 रोजी LIC Jeevan Utsav Plan योजना सुरू केली. एलआयसी जीवन उत्सव ही संपूर्ण जीवन विमा योजना आहे. जे तुमच्या दुर्दैवी मृत्यूच्या बाबतीत तुमच्या कुटुंबातील सदस्याला संपूर्ण संरक्षण देईल. ही एक गैर-सहभागी, नॉन-लिंक्ड, वैयक्तिक बचत आणि पूर्णपणे एक विमा योजना आहे. ही पॉलिसी ग्राहकांना विमा रकमेच्या 10% गॅरंटेड पेन्शन, प्रत्येक वर्षी, तहयात देत राहते. मॅच्युरिटीनंतर, पॉलिसी धारक विमा रकमेच्या 10 टक्के आजीवन लाभ म्हणून लाभ घेऊ शकतात.

LIC Jeevan Utsav Policy Details/ योजना डिटेल्स

या योजनेमध्ये  90 दिवसापासून ते 65 वर्षापर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीला सामील होता येतं.  पॉलिसीची मुदत अकरा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंत आहे. हप्ता भरण्यासाठी चा कालावधी पाच वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंत आहे  किमान इमारत कमी पाच लाख व कमाल विमा रकमेस मर्यादा नाहीत.

LIC Jeevan Utsav Benefits/ फायदे कसे मिळणार ?

पेन्शन साठी दोन पर्याय

 1. एलआयसी जीवन उत्सवामध्ये, पॉलिसीधारकाला कव्हर सुरू झाल्यानंतर दोनपैकी एक पर्याय निवडावा लागेल, त्यातील पहिला पर्याय म्हणजे नियमित उत्पन्न लाभ आणि दुसरा पर्याय फ्लेक्सी इन्कम बेनिफिट आहे. यापैकी कोणतेही एक निवडून, तुम्ही प्रीमियम पेमेंट करू शकता, त्यानंतर निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यावर पॉलिसीचा लाभ दिला जातो. पॉलिसी धारकाने निवडलेल्या मूळ विमा रकमेच्या 10% प्रीमियम पेमेंट मुदतीच्या आधारावर 11 व्या वर्षापासून सुरू होते
 2. नियमित उत्पन्न लाभाची निवड केल्यावर, विमाधारकाच्या हयातीवर प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी मूळ विमा रकमेच्या 10% इतका नियमित उत्पन्न लाभ देय असतो. तर फ्लेक्सी इनकम बेनिफिटची निवड करणाऱ्या पॉलिसी धारकाला प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी मूळ विमा रकमेच्या 10% चा लाभ मिळतो. 

5.5% वार्षिक व्याजदर

LIC Jeevan Utsav Plan अंतर्गत, फ्लेक्सी ऑप्शन पर्यायानुसार तुम्हाला काही कारणास्तव मॅच्युरिटी नंतरचे पेन्शन नको असेल, तर ती रक्कम तशीच एलआयसीकडे फिरवली जाते आणि त्यावरती  5.5% ने वार्षिक दराने एलआयसी कडून व्याज जमा होत राहते. अशी रक्कम तुम्ही न घेता पुढे  कंटिन्यू ठेवली तरी चालेल, त्यावरील विमा संरक्षण चा लाभ तुम्हाला मिळेलच पण त्याचबरोबर आपली रक्कम ही वाढत वाढत जाईल. जमा झालेल्या रकमेपैकी 75% रक्कम काढण्याचा ऑप्शन तुमच्याकडे केव्हाही उपलब्ध आहे.

LIC Jeevan Utsav Plan: उदाहरण

LIC Jeevan Utsav Plan या योजनेमध्ये दोन पर्याय आहेत त्यापैकी रेग्युलर इन्कम पर्याय द्वारे 35 वयाच्या व्यक्तीचे उदाहरण आपण इथे पाहणार आहोत, या व्यक्तीने 10,00,000/- विमा रक्कम आणि दहा वर्षे हप्ते भरण्याची मुदत घेतली असेल तर या योजनेसाठी वार्षिक हप्ता 1,16,000/- रुपये असेल. हे हप्ते एकूण दहा वर्ष भरायचे आहेत. आपली एकूण रक्कम 11,37,000/- जमा होईल. आपणास आज पासून 14 वर्षानंतर याचे बेनिफिट्स सुरू होतील. तिथून पुढे प्रत्येक वर्षी योजना धारकास 1,00,000/- रुपये मिळत जातील.

पर्याय क्रमांक दोन फ्लेक्सि इन्कम नुसार 14 वर्षानंतर मिळणारे एक लाख रुपये काही कारणाने आपल्याला नको असतील तर तीच रक्कम एलआयसी मध्ये आपण पुन्हा फिरवू शकतो आणि त्याच्यावरती 5.5% दराने वार्षिक इंटरेस्ट घेऊ शकतो.

पैसे कसे काढले जातील?

एलआयसी जीवन उत्सव प्लॅनमधून पैसे काढणे, हे पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर किंवा सरेंडर, यापैकी जे आधी असेल ते केले जाऊ शकते. मुदतपूर्तीनंतरही पॉलिसीधारक पैसे काढू शकतात. मृत्यू झाल्यास रक्कम नॉमिनीला दिली जाईल. तथापि, पॉलिसीधारक लिखित अर्ज करून पॉलिसी मुदतीदरम्यान एकदा व्याजासह 75 टक्के रक्कम काढू शकतो. यानंतरही पॉलिसीधारकाला उर्वरित रकमेवर वार्षिक 5.5% व्याज मिळत राहील. 

LIC Jeevan Utsav Plan ठळक वैशिष्ट्ये

 1. जीवन उत्सव पॉलिसीसाठी किमान विम्याची रक्कम 5 लाख रुपये ठेवली आहे तर कमाल रकमेची मर्यादा नाही. 
 2. या पॉलिसीमध्ये, तुम्ही प्रीमियम पेमेंट टर्म किमान 5 वर्षे आणि कमाल 16 वर्षे निवडू शकता.
 3. 0 वर्षे ते 65 वर्षांपर्यंत कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकते. 
 4. एकदा कव्हर सुरू झाल्यावर, पॉलिसीधारकाला दोन पर्यायांपैकी एक निवडावा लागेल ज्यात नियमित उत्पन्न लाभ आणि फ्लेक्सी उत्पन्न लाभ समाविष्ट आहे.
 5. या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूकदारांना 5.5% दराने वार्षिक व्याज दिले जाईल.
 6. प्रतिबंधित प्रीमियम पेमेंटच्या सुविधेसह संपूर्ण आयुष्य कव्हरेजचा लाभ घ्या.
 7. ही योजना अनेक रायडर्ससह येते ज्यामुळे पॉलिसीधारक अतिरिक्त प्रीमियम भरून त्याचे कव्हरेज वाढवू शकतात. .
 8. पॉलिसीधारकाला सलग 2 वर्षे प्रीमियम भरल्यावर पॉलिसी सरेंडर करण्याची संधी मिळते.
 9. एलआयसी जीवन उत्सव पॉलिसी पॉलिसीधारकाला आर्थिक आणीबाणीचा सामना करण्यासाठी कर्जाची सुविधा प्रदान करते. 
 10. एलआयसी जीवन उत्सव पॉलिसी धारकांना प्रीमियम पेमेंटसाठी 15 ते 30 दिवसांचा वाढीव कालावधी ऑफर करतो ज्यांनी या कालावधीत त्यांची देय रक्कम भरली नाही तर पॉलिसी रद्द होते

LIC जीवन उत्सव साठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे.

LIC Jeevan Utsav Plan योजना सुरू करण्यासाठी लागणारी पात्रता व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पासपोर्टकर चा फोटो इ.

या योजनेसाठी अर्जदार हा भारतात नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदार किमान वय शून्य आणि कमाल वय 65 असावे अर्जदाराला किमान पाच वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल, कमाल प्रीमियम पेमेंट कालावधी सोळा वर्षे आहे.

अधिक माहितीसाठी कृपया या लिंक ला क्लिक करा https://licindia.in/web/guest/lic-s-jeevan-utsav-plan-no.-871-uin-no.-512n363v01- 

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now