Life insurance new rule: आयुर्विमा पॉलिसी सरेंडर केल्यावर जास्त परतावा मिळेल? 1 ऑक्टोबर 2024 पासून, नवीन नियम लागू.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

Life insurance new rule: 1 ऑक्टोबर 2024 पासून पारंपारिक आयुर्विमा पॉलिसीधारकांसोबत, नवीन योजना सुरु करणाऱ्या सर्व पॉलिसीधारकांना ‘भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने’ (IRDAI) नवीन नियम लागू केले आहेत. नवीन “विशेष समर्पण मूल्य” (Special Surrender Value) नियमांनुसार, पारंपारिक एंडॉवमेंट पॉलिसींचे सरेंडर केल्यावर पॉलिसीधारकांना जास्त परतावा मिळेल. यामुळे जीवन विमा पॉलिसीधारकांना लवचिकता आणि तरलता मिळणार आहे. हे नियम बदल भारतामध्ये आयुर्विमा व्यवसाय करणाऱ्या सर्व कंपन्यांना लागू असतील.

आता इथूनपुढे भारतामधील कोणत्याही इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी सुरुवातीच्या काही वर्षात पॉलिसी सरेंडर केली तरी देखील पॉलिसीधारकांना अधिक रक्कम मिळेल. या लेखात IRDAI कडून 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणाऱ्या नवीन लाइफ इन्शुरन्स विमा नियमांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि शेअर करा.

Life insurance new rule
Life insurance new rule

नवीन विशेष समर्पण मूल्य (SSV) नियम म्हणजे काय?

IRDAI ने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, विशेष समर्पण मूल्य (Guaranteed surrender value) हे पॉलिसीधारकाने एक वर्षाचा प्रीमियम पूर्ण भरल्यानंतर देय होईल. यामुळे आता कोणत्याही कंपनीची, कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी, पॉलिसीधारकांनी, पॉलिसी एक वर्ष पूर्ण होण्या अगोदर सरेंडर केल्यास त्यांना किमान रक्कम परत मिळू शकते. यापूर्वी, पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू कमी होती आणि बहुतांश पॉलिसीधारकांना पहिल्या तीन वर्षाचे प्रीमियम पूर्णपणे गमवावे लागत होते.

विशेष समर्पण मूल्य (Special Surrender Value) कसे काढले जाते?

विशेष समर्पण मूल्याची (SSV) गणना खालील प्रमाणे केली जाईल:

पेड-अप मूल्याची गणना: पेड-अप मूल्य = (विमा रक्कम × भरलेल्या प्रीमियमची संख्या) ÷ एकूण प्रीमियमची संख्या.

बोनस लाभ: पॉलिसीमध्ये सुरुवातीपासून जमा केलेले उत्पन्नावरचे लाभ (Bonuses) जसे की, वार्षिक बोनस, अंतिम अतिरिक्त बोनस, इ. देखील यामध्ये समाविष्ट केले जातील.

IRDAI ने स्पष्ट केले आहे की, नवीन SSV नियमांनुसार, 10-वर्षाच्या G-Sec वर आधारित उत्पन्न दराचा वापर करून पॉलिसीधारकांच्यासाठी रिटर्न्स चे कॅल्क्युलेशन केले जाईल. यामुळे दरवर्षी विशेष समर्पण मूल्याचे (Special Surrender Value) प्रत्येक वर्षी पुनरावलोकन केले जाईल.

नवीन नियमांचा लाभ कोणाला होईल?

1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणारे हे नवीन नियम प्रामुख्याने खालील प्रकारच्या पॉलिसीधारकांना लागू होतील:

  1. एंडॉवमेंट पॉलिसीधारक, जे त्यांनी निवडलेल्या निश्चित काळापर्यंत प्रीमियम भरण्यास तयार आहेत.
  2. मर्यादित प्रीमियम भरणारे पॉलिसीधारक.
  3. सिंगल प्रीमियम पॉलिसीधारक.

उदाहरणासह नवीन नियम कसे लागू होतील?

उदाहरण: एका पॉलिसीधारकाने रु. 5 लाख विमा रक्कम असलेली आणि 10 वर्षांची पॉलिसी घेतली आहे, ज्यासाठी वार्षिक प्रीमियम रु. 50,000 आहे. जर त्याने पहिल्या वर्षानंतर पॉलिसी सरेंडर केली, तर जुने नियमांनुसार त्याला कोणताही परतावा मिळत नव्हता. मात्र, नवीन SSV नियमांनुसार, त्याला पहिल्या वर्षात रु. 31,295 परत मिळू शकतात.

Life insurance new rule
Life insurance new rule

विमा कंपन्यांना कोणते नवीन बदल करावे लागणार?

आयआरडीआयए ने सर्व विमा कंपन्यांना 30 सप्टेंबर 2024 पूर्वी त्यांच्या पॉलिसींच्या विशेष समर्पण मूल्य नियमांमध्ये बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये LIC (भारतीय आयुर्विमा महामंडळ) सारख्या मोठ्या विमा कंपन्यांसह इतर विमा कंपन्यांनी नवीन सरेंडर व्हॅल्यू नियम लागू केले पाहिजेत.

नवीन नियमामुळे पॉलिसीधारकांना मिळणारे फायदे

नवीन विशेष समर्पण मूल्य (Special Surrender Value) नियमांमुळे पॉलिसीधारकांना खालील फायदे मिळतील:

  1. सरेंडर व्हॅल्यू परतावा मिळणार: नवीन नियमांनुसार, पॉलिसीचा पहिला प्रीमियम भरण्यासह, एक वर्ष पूर्ण झाल्यावर पॉलिसी सरेंडर केली तरही परतावा मिळणार.
  2. जास्त परतावा: SSV नियमांनुसार, अधिकृत रूपात नवीन गणना सूत्रांमुळे पॉलिसीधारकांना जास्त परतावा मिळेल.
  3. विमा पॉलिसी स्विच करण्याची लवचिकता: आता पॉलिसीधारकांना सध्याच्या विमा पॉलिसीच्या तुलनेत नवीन योजनांचा शोध घेण्याची लवचिकता मिळेल.
  4. फसव्या योजनांपासून संरक्षण: चुकीच्या सल्ल्यामुळे चुकीच्या योजना घेतलेल्या पॉलिसीधारकांना आता चांगला पर्याय मिळेल.

IRDAI कडून अधिकृत निवेदन

RDAI ने स्पष्ट केले की, नवीन नियमामुळे पॉलिसीधारकांना विमा पॉलिसीमध्ये थांबून राहणे किंवा बाहेर पाडण्यासाठी सरेंडर व्हॅल्यू घेणे यासाठी योग्य पर्याय मिळेल पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पॉलिसीधारकांनी नवीन लाभाचे उदाहरण आणि SSV, GSV यांची तुलना करावी त्याची गणना काळजीपूर्वक तपासावी आणि योग्य निर्णय घ्यावा.

पॉलिसीधारकांना विशेष समर्पण मूल्याबद्दल कसे कळेल?

विमा कंपन्यांनी त्यांच्या पॉलिसीधारकांना खालील गोष्टी स्पष्टपणे सांगाव्यात:

  1. गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू (GSV): ही रक्कम पॉलिसी विकतेवेळी निश्चित केली जाते.
  2. स्पेशल सरेंडर व्हॅल्यू (SSV): हि गणना केलेली रक्कम मूल्य वेळोवेळी, प्रत्येक वर्षी बदलू शकते.
  3. देय सरेंडर व्हॅल्यू: हि रक्कम अशी असेल, जी पॉलिसी सरेंडर केल्यावर त्वरित लागू होईल.

विमा कंपन्यांनी पॉलिसी लाभाच्या उदाहरणामध्ये या सर्व गोष्टींची माहिती द्यावी आणि पॉलिसी विकण्यापूर्वी संभाव्य आयुर्विमा पॉलिसीधारकांना संपूर्ण माहिती द्यावी.

नवीन नियमांमुळे कोणती जोखीम कमी होईल?

नवीन नियमांमुळे मिस सेलिंग आयुर्विमा विक्रीचे प्रमाण कमी होईल, तसेच चुकीच्या पॉलिसीमुळे पॉलिसीधारकांना होणारे नुकसान कमी होईल. विशेषतः, IRDAI ने विमा कंपन्यांना सर्व फायदे स्पष्टपणे सांगण्यास सांगितले आहे.

जीवन विमा नवीन नियम: पॉलिसी सरेंडर कधी करावी?

पॉलिसीधारकाने, पॉलिसीचा वैयक्तिक लाभ समजून घेतल्यानंतरच पॉलिसी सरेंडर करावी. आयआरडीआयए ने जारी केलेले नवीन नियम तुमच्या आर्थिक गरजेनुसार निर्णय घेण्यास मदत करतील.

निष्कर्ष: Life insurance new rule

1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणारे नवीन Life insurance new rule पॉलिसीधारकांसाठी फायदेशीर आहेत. पॉलिसीधारकांनी त्यांच्या विशेष समर्पण मूल्याची माहिती आणि लाभ काळजीपूर्वक तपासावी. यामुळे त्यांना जास्त परतावा मिळण्यासोबतच अधिक तरलता आणि लवचिकता मिळेल. विमा कंपन्यांनी या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

नवीन नियम पॉलिसीधारकांच्या बाजूने असल्याने, IRDAI चे हे पाऊल विमा क्षेत्रामध्ये चांगला बदल घडवून आणेल.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us