New Ration Card Download: मोबाईलवरून घरबसल्या डाउनलोड करा, नवीन रेशन कार्ड, येथून डाउनलोड करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

New Ration Card Download: आता कोणत्याही वेळी तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून नवीन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. तुमचे नवीन रेशन कार्ड तम्ही बनवले असेल तर आता तुम्ही काही मिनिटांत तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाइन मोफत रेशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. हे रेशन कार्ड कसे डाऊनलोड करायचे याची संपूर्ण प्रक्रिया, माहिती या लेखा मध्ये देत आहोत, हा लेख संपूर्ण वाचून तुमचे रेशन कार्ड लगेच डाऊनलोड करून घ्या आणि हा लेख फॉरवर्ड करा.

New Ration Card Download

रेशनकार्ड हे केंद्र सरकारकडून दिले जाणारे कागदपत्र आहे, ज्या रेशनकार्डच्या मदतीने सर्वसामान्य गरीब कुटुंबांना जीवनावश्यक रेशनचे साहित्य दिले जाते

असे बरेच लोक आहेत ज्यांचे रेशन कार्ड एकतर खराब झाले आहे किंवा हरवले आहे. ज्यांनी नवीन रेशनकार्ड साठी अर्ज केला आहे पण काही कारणाने आजपर्यंत त्यांना रेशन कार्ड हार्ड कॉपी मिळालेले नाही पण ते रेशन कार्डची वाट पाहत आहेत. आता तुम्हाला जास्त वाट पाहण्याची गरज नाही. केंद्र सरकारने रेशनकार्ड डाऊनलोड करण्यासाठी वेबसाइट सुरू केली आहे. ज्यावरून तुम्ही तुमचे रेशनकार्ड डाऊनलोड करू शकता. ते ही घरबसल्या तुमच्या मोबाईलचा वापर करून.

Screenshot 505
New Ration Card Download
New Ration Card Download
New Ration Card Download

या लेखाच्या सर्वात शेवटी रेशन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठीची लिंक दिली आहे. लिंक ला क्लिक करून तुम्ही तुमचे रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता.

रेशन कार्ड प्रकार

अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका हे रेशन कार्ड सर्वात गरीब कुटुंबांना दिले जाते, शिवाय हे अनुदानित रेशन कार्ड आहे. बीपीएल रेशन शिधापत्रिका हे रेशन कार्ड दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दिले जाते. प्राधान्य घरगुती शिधापत्रिका राज्य सरकारने ठरवून दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या कुटुंबांना हे रेशन कार्ड दिले जाते. कमी उत्पन्न गटाचे शिधापत्रिका हे तुलनेने गरीब कुटुंबांना दिले जाते, जे सरकारी अनुदानावर अवलंबून असतात.

रेशन कार्ड हे शासनाचे महत्त्वाचे कागदपत्र आहेत. आपल्या देशातील जवळपास सर्वच कुटुंबांकडे रेशन कार्ड आहे आणि सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा वापर होतो.

शिधापत्रिका डाउनलोड करण्याची प्रक्रिया 

New Ration Card Download आपल्या देशामध्ये प्रत्येक राज्याने रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट तयार केल्या आहेत, त्याचबरोबर केंद्र शासनाची सुद्धा वेबसाईट आहे या वेबसाईट वरती लॉगिन करून अतिशय सोप्या पद्धतीने आपण रेशन कार्ड पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करून घेऊ शकतो.

पायरी 1: आवश्यक कागदपत्रे

  • शिधापत्रिका क्रमांक
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर (जो रेशन कार्डशी जोडलेला आहे)

पायरी 2: राज्य शिधापत्रिका पोर्टलला भेट द्या

  • तुमच्या राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
  • “रेशन कार्ड सेवा” किंवा “ई-रेशन कार्ड” सारख्या लिंकवर क्लिक करा.
  • “रेशन कार्ड डाउनलोड” पर्याय निवडा.

पायरी 3: आवश्यक माहिती प्रविष्ट करा

  • रेशन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
  • आवश्यक असल्यास, कॅप्चा किंवा व्हेरिफिकेशन कोड प्रविष्ट करा.
  • “सबमिट” बटणावर क्लिक करा.

पायरी 4: रेशन कार्ड डाउनलोड करा

  • तुमचे रेशन कार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • तुम्ही ते PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट करू शकता.

New Ration Card Download रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी केंद्र शासनाची वेबसाईट लिंक  https://nfsa.gov.in/portal/Ration_Card_State_Portals_AA ही आहे किंवा महाराष्ट्र राज्य अन्नपुरवठा विभाग ची लिंक  www.mahafood.gov.in आहे यावरती क्लिक करून रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता.