Palkhi Route: संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारीचा पालखी सोहळा अनुभवणं हे प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं. परंतु अनेकदा कामाची गडबड किंवा आरोग्य कारणांमुळे प्रत्यक्षात सहभागी होणं शक्य होत नाही.
अशा भाविकांसाठी यंदा पुणे पोलिसांनी एक अत्यंत उपयुक्त आणि डिजिटल पाऊल उचललं आहे. त्यांनी यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी लाईव्ह ट्रॅकिंग सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे घरी बसूनही तुम्ही सोहळ्याचा संपूर्ण अनुभव घेऊ शकता.
लाईव्ह ट्रॅकिंगची सुविधा आणि त्याचा उपयोग
पुणे पोलिसांनी यासाठी विशेष वेबसाईट सुरू केली आहे – diversion.punepolice.gov.in. या वेबसाईटवर तुम्हाला खालील गोष्टी पाहता येतील: Palkhi Route
- लाईव्ह ट्रॅकिंग: पालखी सध्या कुठे आहे याची थेट माहिती.
- ट्रॅफिक डायव्हर्जन: रस्ते बंद असलेले भाग (लाल रंगाने दाखवलेले), पर्यायी रस्ते (हिरव्या रंगात), आणि ताजे अपडेट्स (पिवळ्या घड्याळ चिन्हाद्वारे).
- पार्किंग अपडेट्स: कुठे पार्किंग उपलब्ध आहे आणि कुठे बदल झालेत याची सविस्तर माहिती.
हे सर्व अपडेट्स रिअल टाइममध्ये मिळणार असल्यामुळे, नागरिकांना मार्गात अडथळा न होता आपली कामं किंवा वारी पाहणे शक्य होणार आहे.

पुण्यातील पालखी मुक्काम आणि वाहतुकीत बदल
पालखी सोहळा पुण्यात २१ जून रोजी मुक्कामी असणार आहे. या कालावधीत शहरातील काही भागात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेचा तपशीलवार आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये वाहतुकीचे मार्ग, पार्किंगची जागा, अडथळे आणि पोलीस नियंत्रणाची माहिती आहे.
Palkhi Route पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक
१९ जून – माऊली पालखी प्रस्थान, आळंदी
२० जून – आळंदी ते पुणे
२१ जून – पुणे मुक्काम
२२ जून – पुणे ते सासवड
२३ जून – सासवड मुक्काम
२४ जून – सासवड ते जेजुरी
२५ जून – जेजुरी ते वाल्हे
२६ जून – वाल्हे ते लोणंद
२७ जून – लोणंद ते तरडगाव
२८ जून – तरडगाव ते फलटण
२९ जून – फलटण ते बरड
३० जून – बरड ते नातेपुते (गोल रिंगण)
०१ जुलै – नातेपुते ते माळशिरस (गोल रिंगण, सदाशिवनगर)
०२ जुलै – माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोळ रिंगण)
०३ जुलै – वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण, बंधू भेट सोहळा)
०४ जुलै – भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
०५ जुलै – वाखरी ते पंढरपूर (वाखरी येथे गोल रिंगण)
०६ जुलै – देवशयनी आषाढी एकादशी, पंढरपूर मुक्काम
१० जुलै – पंढरपूरहून परतीचा प्रवास आळंदीकडे
वारकऱ्यांसाठी आणि पुणेकरांसाठी ही सेवा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर आहे. यामुळे नागरिकांना वाहतुकीची अडचण न होता नियोजनबद्ध पद्धतीने प्रवास करता येईल, आणि घरबसल्या सोहळा अनुभवता येईल. पुणे पोलिसांचं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असून, डिजिटल युगात वारीचा अनुभव आणखी सुलभ व व्यापक होणार आहे.
👉 वेबसाईट लिंक – https://diversion.punepolice.gov.in
अपडेट्स पाहण्यासाठी – लाईव्ह ट्रॅकिंग सिलेक्ट करा, झूम इन-आऊट करून तपशील पाहा
Table of Contents