Police Patil Mandhan 2024: पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ, आता प्रत्येक महिन्याला मिळनार 15 हजार.

Police Patil Mandhan 2024: महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व्यवस्थेतील एक महत्वाचे पद म्हणजे गावाचा ‘पोलीस पाटील’ हे पद होय. प्राचीन काळापासूनच गावाचा कारभार पाहण्याची जबाबदारी पोलीस पाटील असणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे असायची. छत्रपती शिवाजी महाराज याच्या काळामध्ये मुलखीं प्रशासनामध्ये या पदाची निर्मिती करण्यात आली होती. त्या काळी या पदाला ‘पोलीस पाटील’ या ऐवजी ‘पाटील’ हे एवढेच नाव होते. गावाचा प्रमुख या नात्याने त्यांना गावात मुख्य आणि महत्वाचे स्थान असायचे. या पदावरील व्यक्तीला कायदा आणि सुव्ययस्था बरोबरच सामाजिक समस्या सोडवण्याचे काम करावे लागायचे.

पोलीस पाटील कायदा १९६७

ब्रिटिश काळातील राज्यपद्धतीमध्ये सुद्धा पोलीस पाटील हे पद महत्वाचे होते. गावपातळीवरील कायदा, सुव्यवस्था, महसूल यावरती देखरेख करण्याचे काम पोलीस पाटील करत होते. ब्रिटिश काळामध्ये पाहिल्यान्दा ‘मुंबई ग्राम पोलीस अधिनियम’ १८६७ मध्ये निर्माण झाला होता. भारत स्वतंत्र झाल्यावर या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. या कायद्यानुसार वंशपरंपरागत असणारी पदे रद्द करण्यात आली.

१७ डिसेंबर १९६७ ला झालेल्या ‘पोलीस पाटील अधिनियम कायदा १९६७’ कायद्यानुसार नुसार ‘पोलीस पाटील’ या पदाला कायदेशीर मान्यता मिळाली. ‘पोलीस पाटील’ या गावातील प्रशासनाचा शेवटचा घटक म्हणून निर्मिती झाली.

Police Patil Mandhan 2024
Police Patil Mandhan 2024

Police Patil Mandhan 2024: पोलीस पाटील पदाला मानधन किती मिळते?

ब्रिटिशकाळापासून पोलीस पाटील पदाला पगार न्हवता, त्यांना मानधन मिळत होते कि जे अतिशय कमी स्वरूपात होते. भारत स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्र्र राज्यातील कायद्याप्रमाणे त्यांना सुरुवातीस ८०० रुपये महिना मानधन होते, काही वर्षानंतर ते ३००० महिना झाले, त्याचसोबत त्यांना भत्ताही मिळत असे. अलीकडच्या काळामध्ये म्हणजेच ३१ मार्च २०२४ पर्यंत त्यांचे मानधन ६५०० रुपये महिना केले होते पण त्याचबरोबर पोलीस पाटील यांच्या कामाचा व्याप सुद्धा वाढतच होता.

Police Patil Mandhan 2024: १५ हजार मानधन कधीपासून मिळणार?

पोलीस पाटील हा महसूल आणि पोलीस यंत्रणा त्यांच्यामधील गावपातळीवरचा महत्वाचा दुवा आहे. अलीकडच्या काळात पोलीस पाटलांच्या जबाबदाऱ्या आणि कर्त्यव्य वाढल्याने यांच्या संघटनेने वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून आपल्या मानधनात वाढ करून घेतली आहे. १ एप्रिल २०२४ पासून १५०००/- रुपये पोलीस पाटलांच्या बँक खात्यावरती प्रत्येक महिन्याला जमा होत राहतील

१३ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील बैठकीत अद्यादेश जारी करण्यात आला आणि पोलीस पाटलांचे मानधन १५०००/- रुपये महिना करण्यात आले. याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२४ पासून सुरु झाली आहे. सध्या महाराष्ट्रात पोलीस पाटलांची संख्या ३८७२५ असून, मानधनात वाढ केल्यामुळे ३९४.९९ लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा राज्य शासनावरती पडणार आहे.

पोलीस पाटलांची प्रशासनातील कामे

Police Patil Mandhan 2024: पूर्वीच्या काली पोलीस पाटलांना गावातील सामान्य तक्रारींचा न्याय निवड करणे, गावपातळीवरील पंच कमिटी स्थापन करणे, शेतसारा वसूल करणे इ गावातील विविध कामे करावी लागत असत. १७ डिसेंबर १९६७ चा महाराष्ट्र पोलीस कायदा मध्ये पोलीस पाटलांच्या कार्यपद्धती मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. या अधिनियमान्वये पोलीस पाटील हा गावपातळीवरील कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाद्वारे कार्य करत असतात.

गावपातळीवरील माहिती पत्रके मागवणे, गावातील अपराधांची प्रमाण व समाजस्वास्थ्य या बाबत ची पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती माहिती पुरवणे, गावाच्या हद्दीत गुन्हा घडू नये,लोकांना उपद्रव होऊ नये यासाठी बंदोबस्त करणे, आपल्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यास मदत करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, गावपातळीवरील किंवा त्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती पोलीस ठाणेस कळवणे, विनापरवाना शस्त्र बाळगणेस मनाई करणे,  नैसर्गिक आपत्ती, रोगराई यांचा अहवाल वरिष्ठांना देणे, गावात अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू झाल्यास याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे, आपल्या कार्यक्षेत्रातील विभागात सार्वजनिक शांततेला बाधा पोचणार नाही यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत खबरदारी घेणे. इत्यादी बरीच कामे पोलीस पाटील यांना गावात करावी लागतात.

Police Patil Mandhan 2024: याचबरोबर गावातील सण, उत्सव, समारंभ, यात्रा, राजकारण, निवडणूक या सर्वच घडामोडीवर पोलीस पाटील हे लक्ष ठेऊन असतात. ग्रामपंचायत व विविध निवडणूक यांच्या विविध घडामोडी बाबत पोलीस प्रशासनाला माहिती उपलब्ध करून देत प्रताप असतात. अशा प्रकारची पोलीस प्रशासनाची विविध कामे  पोलीस पाटलांना करावी लागतात. 

पोलीस पाटील भरती कसे केले जाते?

Police Patil Mandhan 2024: अलीकडच्या काही वर्षांमध्ये पोलीस पाटील या पदासाठी महिलांना व विविध जातीधर्मातील घटकांना आरक्षण देण्यात आले आहे. पदाची भरती हि रिक्त स्थानाप्रमाणे केली जाते आरक्षण, लेखी परीक्षा, मुलखात इ. सर्व गोष्टी धान्यात घेऊन स्पर्धा परीक्षा पद्धतीने परीक्षा घेऊन या पदाची भरती केली जाते. एखाद्या गावातील वक्ती पोलीस पाटील झाली तर कायमस्वरूपी हे पद त्याच व्यक्तीकडे राहते.

GR पाहण्यासाठी इथे क्लीक करा https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now