IRDAI: विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) सतत लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स विम्याचे नियम सुलभ करण्याचा प्रयत्न करत असते. विमा नियामकाने 1 एप्रिलपूर्वी जारी केलेल्या नवीन नियम, आरोग्य पॉलिसींवर 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. यामुळे आरोग्य पॉलिसी ग्राहकांना खूप फायदा होणार आहे.
IRDAI Rules 2024
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने पॉलिसीधारकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये जीवन विमा, आरोग्य विमा आणि सामान्य विमा, अशा सर्व प्रकारच्या विमा योजनांचा समावेश आहे. नवीन आरोग्य पॉलिसी संदर्भात नवे नियम 1 एप्रिलपासून लागू झाले आहेत.
यापूर्वी जारी केलेल्या आरोग्य पॉलिसींवर नवीन नियम लागू करण्यासाठी विमा कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला होता,जसे कि विमा कंपन्यांना, विनंती मिळाल्यापासून एक तासाच्या आत कॅशलेस क्लेम साठी अधिकृतता मंजूर करावी लागेल, पेशंट साठी ऑस्पिटलकडून डिस्चार्जची सूचना मिळाल्यापासून तीन तासांच्या आत अंतिम अधिकृतता मंजूर करणे आवश्यक आहे. हे दोन्ही नियम सध्या लागू करण्यात आले आहेत.
नवीन नियमांमुळे प्रीमियम 10-15 टक्क्यांनी वाढल्याचे विमा कंपन्यांचे म्हणणे आहे. बहुतांश कंपन्यांनी यंदा आरोग्य पॉलिसींच्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. 14-15 टक्के वैद्यकीय महागाई देखील, यात एक महत्वाचा घटक आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ आनंद रॉय म्हणाले, “आयआरडीएआयने ग्राहकांच्या हितासाठी एक मास्टर परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये पॉलिसीचे कव्हरेज आणि प्रतीक्षा कालावधी याबाबतची परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. IRDAI आरोग्य विम्याच्या बाबतीत गोष्टी सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, यामुळे ग्राहकांना थोडी जास्त किंमत मोजावी लागेल.”
IRDAI ने आरोग्य विमा पॉलिसीवरील दाव्यांची स्थगिती कालावधी 8 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत कमी केली आहे. IRDAI च्या नियमांनुसार, आरोग्य विमा पॉलिसीचे कव्हरेज 60 महिने सुरू राहिल्यानंतर, विमा कंपनी गैर-प्रकटीकरण, चुकीच्या माहितीच्या आधारावर कोणत्याही पॉलिसी आणि दाव्यावर प्रश्न विचारू शकणार नाही. फक्त फसवणुकीच्याच प्रकरणांमध्ये दाव्याबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार असेल.
फसवणूक झाल्याशिवाय कंपनी दावा नाकारू शकत नाही
याचा अर्थ असा की जर पॉलिसीधारकाच्या पॉलिसीने पाच वर्षे पूर्ण केली असतील तर, पॉलिसीधारकाने त्याच्या आरोग्याची स्थिती उघड केली नाही, या आधारावर विमा कंपनी दावा नाकारू शकत नाही. विमा कंपनीशी निगडीत वादांचे प्रमुख कारण, आरोग्य स्थिती न उघड करणे जरी असले तरीही विमा कंपनीने फसवणुकीच्या आधारावर दावा नाकारला तर त्याला त्याचा पुरावा सादर करावा लागेल.
Insurance Samadhan च्या मुख्य कार्यकारी अधिकारी ‘शिल्पा अरोरा’ म्हणाल्या, “एखाद्याला कर्करोग झाला असेल आणि आरोग्य पॉलिसी घेताना ते उघड केले नाही, तर ती फसवणूक मानली जाईल.” जर एखाद्या पॉलिसीधारकाला असे वाटत असेल की विमा कंपनीने त्याचा दावा कोणत्याही कारणाशिवाय नाकारला आहे, तर तो त्याबद्दल लोकपाल कार्यालयाकडे तक्रार करू शकतो.
क्लेम न घेतल्यास, प्रीमियमवर सूट देण्याचा पर्याय!
जर पॉलिसीधारकाने वर्षभरात कोणताही दावा केला नाही, तर विमा कंपन्या सहसा कोणत्याही अतिरिक्त प्रीमियमशिवाय विम्याची रक्कम वाढवतात. आता IRDAI ने विमा कंपन्यांना पॉलिसीधारकांना पर्याय देण्यास सांगितले आहे. याचा अर्थ पॉलिसीधारक त्यांच्या विम्याची रक्कम वाढवू शकतात किंवा पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी प्रीमियमवर सूट मिळवू शकतात. या नियमाचा फायदा अशा पॉलिसीधारकांना होणार आहे ज्यांना गेल्या काही वर्षांतील वाढीमुळे प्रीमियम भरण्यात अडचणी येत होत्या. जूनपासून अनेक कंपन्यांनी त्यांच्या प्रीमियममध्ये 10-15 टक्क्यांनी वाढ केली आहे.
ग्राहक कधीही पॉलिसी रद्द करू शकतो?
नवीन नियम हे आसा पण आहे कि जर पॉलिसीधारकाने विमा कंपनीला 7 दिवसांची नोटीस देऊन वर्षातील कोणत्याही वेळी त्याची आरोग्य विमा पॉलिसी रद्द केली, तर कंपनीला वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी प्रीमियम परत करावा लागेल, त्यामुळे IRDAI विमा नियामकाने विमा कंपन्यांना सर्व वयोगटातील लोकांना कव्हर करणारी उत्पादने बाजारात आणण्यासाठी विमा कंपनींना सांगितले आहे. अधिक माहितीसाठी कोणत्याही हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या किंवा IRDIA ची ववेबसाइट https://irdai.gov.in ला भेट द्या