Health Insurance in India: जाणून घ्या भारतातील आरोग्य विम्याचा इतिहास किती जुना आहे, मेडिक्लेम पॉलिसी 38 वर्षांपूर्वी सुरू झाली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

Health Insurance in India: सध्या भारतामध्ये हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा बद्दल बरीच चर्चा चालू आहे. हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर आकारला जाणारा जीएसटी कमी करण्याची मागणी सातत्याने होत आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. नोव्हेंबरमध्ये यावर निर्णय होणार आहे. भारतातील पहिली मेडिक्लेम पॉलिसी 1986 मध्ये सुरू झाली होती, तेव्हापासून या मध्ये कोणते आणि काय बदल झाले ते जाणून घ्या. या लेखामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यास्तही त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि शेअर करा.

Health Insurance in India

आजकाल विम्याची खूप चर्चा आहे. मग तो लाईफ इन्शुरन्स विमा असो वा हेल्थ इन्शुरन्स विमा असो, याचे कारण म्हणजे या इन्शुरन्स प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याची मागणी होत आहे. या महिन्यातील दुसऱ्या सोमवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. आता नोव्हेंबरमध्ये याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या विम्यांमध्ये आरोग्य विम्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे आजारी पडल्यावर त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे रुग्णालयाच्या बिलाचा आपल्या खिशावर फारसा बोजा पडत नाही. कॅशलेस मध्ये तर हा खर्च अजिबात होत नाही पण तुम्हाला माहित आहे कि आपल्या भारत देशामध्ये हेल्थ इन्शुरन्स योजना कधी झाल्या?

Health Insurance in India
Health Insurance in India

ESIS कधी सुरू झाले?

भारत देशामध्ये आरोग्य विमा योजनांची सुरुवात स्वातंत्र्यापूर्वी झाली असे मानले जात असले तरी, ते आताच्या पातळीएवढे प्रगत नव्हते. अशा योजना काही प्रमाणात चालू होत्या. 1948 मध्ये ESIS सुरू झाले, आणि त्यांनतर स्वातंत्र्यानंतर याचे मुख्य रूप सुरू झाल्याचे मानले जाते मात्र, त्यावेळी याचा वापर फक्त संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या ब्लू कॉलर कामगारांसाठी (कामगार वर्ग) होत असे. आणि यामध्ये ESIS चा वापर केवळ डॉक्टरांना भेटणे आणि त्यांच्याकडून औषध घेणे इतकाच मर्यादित होता.

मेडिक्लेम पॉलिसी 1986 मध्ये सुरू झाली.

1986 पूर्वी, आरोग्य विमा विभाग पूर्णपणे खंडित झाला होता. 1986 मध्ये जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (GIC) यासाठी काही नियम केले होते. यानंतर, केंद्र सरकारने 1986 मध्ये भारताची पहिली मेडिक्लेम पॉलिसी सुरू केली. त्यावेळी त्याचे कव्हर 15 हजार ते 5 लाख रुपये होते.

या गोष्टी साठी कव्हर दिले नव्हते?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सुरुवातीच्या Health Insurance in India योजनांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होता पण आधीच अस्तित्वात असलेले रोग, गर्भधारणा, बाळंतपण, एचआयव्ही-एड्स इत्यादी गोष्टी मेडिक्लेम पॉलिसी पासून दूर ठेवण्यात आल्या होत्या.

सन 1991 मध्ये केंद्र सरकारने सर्व गोष्टींचा विचार करून नवीन आर्थिक धोरण तयार केले. यामध्ये विमा क्षेत्र खाजगी कंपन्यांकडे सोपवण्याचा विचारही होता. तसेच, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. विमा कंपन्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे आणि विमा संबंधित समस्या सोडवणे हा त्याचा उद्देश होता. ही संस्था (IRDAI) 1999 मध्ये स्थापन झाली.

आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत

आज Health Insurance in India आरोग्य विमा क्षेत्र पूर्णपणे बदलले आहे. यामध्ये अनेक खासगी कंपन्या आल्या आहेत. ग्राहकांना वैयक्तिक ते सामूहिक आरोग्य विमा दिला जातो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, 24-तास हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसते. जवळजवळ प्रत्येक रोग विम्याद्वारे संरक्षित आहे. काही आजारांमध्ये अटी आणि शर्तींचा समावेश आहे. कोविड नंतर आरोग्य विमा वाढला. शिवाय दावे आणि इतर गोष्टीही सोप्या झाल्या. आज प्रत्येक वयोगटासाठी आणि प्रत्येक वर्गासाठी आरोग्य विमा उपलब्ध आहे.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur