LIC Jeevan Utsav Yojana: भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने वेळोवेळी आपल्या ग्राहकांच्या आर्थिक गरजांसाठी नवनवीन योजना मार्केट मध्ये आणल्या आहेत. LIC ची नवीन योजना, ‘जीवन उत्सव’ (Jeevan Utsav Plan) ही एक अशा योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दिवसाला फक्त ₹260 रुपये भरून आयुष्यभरासाठी वार्षिक ₹1,50,000 रुपयांची पेन्शन मिळवू शकता. ही योजना विशेषतः त्यांच्या साठी आहे जे आपले भविष्य सुरक्षित करू इच्छितात आणि आपल्या निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य प्राप्त करू इच्छितात.
योजना कशी कार्य करते?
‘जीवन उत्सव’ ही योजना एक प्रकारची आजीवन लाईफ कव्हर असलेली, एन्डॉवमेंट पद्धतीची, पेन्शन देणारी योजना आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 16 वर्षे दररोज ₹260 रुपये, याप्रमाणे ₹7,800 प्रत्येक महिना भरावयाचे आहेत. या 16 प्रीमियम पेमेंट काळानंतर, दोन वर्षे वेटिंग पिरियड असेल. त्यानंतर ग्राहकांना दरवर्षी ₹1,50,000 रुपये आयुष्यभरासाठी पेन्शन म्हणून दिली जाते. ही योजना एक प्रकारे तुमच्या भविष्यातील आर्थिक स्वावलंबनाचे मोठे साधन बनेल.
LIC Jeevan Utsav Yojana योजनेचे उदाहरण
हि LIC Jeevan Utsav Yojana योजना कोणत्याही 35 वर्षाच्या स्त्री किंवा पुरुष विमाधारक व्यक्तींसाठी कशी काम करते, ते पुढील उदाहरणामध्ये पाहूया. या योजनेमध्ये विमाधारकास, नैसर्गिक मृत्यू रिस्क कव्हर म्हणून 15 लाख रकमेचे विमा संरक्षण दिले जाते, जे प्रत्येक वर्षी वाढत जाऊन 24 लाख पर्यंत वाढत जाते त्याचबरोबर अपघाती मृत्यू रिस्क कव्हर 30 लाख दिले जाते जे प्रत्येक वर्षी वाढत जाऊन 40 लाख पर्यंत जाते.
प्रति दिवस प्रीमियम: ₹260 रुपये, ₹260 रुपये x ₹365 दिवस = ₹94,900 रुपये, कालावधी: 16 वर्षे, एकूण गुंतवणूक: ₹94,900 रुपये x 16 वर्षे = ₹15,188,400 रुपये
या योजनेमध्ये प्रीमियम 16 वर्षे भरल्यानंतर 2 वर्षांच्या वेटिंग पिरियड असेल 19 व्या वर्षापासून योजना धारकास ₹1,50,000 ही रक्कम पेन्शन म्हणून आयुष्यभर मिळते.
कोणासाठी आहे ही योजना?
LIC Jeevan Utsav Yojana विशेषतः त्यांच्या साठी उपयुक्त आहे जे, नोकरीत असलेले लोक त्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करू इच्छितात. स्वयंरोजगार करणारे जे नियमित उत्पन्नाची सोय शोधत आहेत. मध्यमवर्गीय ज्यांना कमी प्रीमियममध्ये अधिक फायदे मिळवायचे आहेत. निवृत्त लोक ज्यांना आपल्या बचतीवर आधार न ठेवता नियमित उत्पन्न हवे आहे, अशा सर्वांसाठी हि योजना खूप फायदेशीर आहे.
जीवन उत्सव योजनेची वैशिष्ट्ये:
लहान प्रीमियम, मोठा लाभ: दिवसाला फक्त ₹260 भरल्यास तुम्ही दरवर्षी ₹1,50,000 रुपये पेन्शन मिळवू शकता. आयुष्यभर सुरक्षा: निवृत्तीनंतर दरवर्षी तुमच्या खात्यात निश्चित रक्कम जमा होते. अधिक फायद्यांसह किफायतशीर गुंतवणूक: या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे निवृत्तीचे दिवस आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवू शकता. टॅक्स फायदे: तुम्हाला आयकर कायद्यांतर्गत गुंतवणुकीवर करसवलत मिळते
योजनेचे फायदे:
- आयुष्यभर वार्षिक पेन्शन: निवृत्तीनंतर तुम्हाला वार्षिक ₹1,50,000 रुपये पेन्शन दिले जाते, जे तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे. निवृत्तीच्या काळात अनेकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत संपतात, पण जीवन उत्सव योजनेद्वारे तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळते.
- विमा संरक्षण: योजनेमध्ये 15 लाख रुपयांचे नैसर्गिक मृत्य लाभ आणि 30 लाख अपघाती मृत्यू लाभ उपलब्ध आहे.
- भविष्याची सुरक्षितता: 16 वर्षे प्रीमियम भरल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यभरासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होता. तुमचे संपूर्ण आयुष्य तुम्हाला या योजनेमुळे आर्थिक आधार मिळतो.
- करसवलत (Tax Benefits): LIC जीवन उत्सव योजनेवर गुंतवणुकीत तुम्हाला 80C अंतर्गत करसवलत मिळते. त्यामुळे तुमच्या कर भारातही बचत होते. तसेच, निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात मिळणारी रक्कम करमुक्त आहे.
- वारसांसाठी लाभ: तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या वारसांना जीवन उत्सव योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला भविष्यात आर्थिक आधार मिळतो.
- कर्ज: योजना सुरु केल्यापासून तीन वर्षानंतर काही अटींवरती कर्ज मिळण्याची सोया उपलब्ध आहे.
- सरेंडर: या योजनेमध्ये पेन्शन सुरु झाल्यानंतर केंव्हाही हि पोलिसी बंद करून, पेन्शन बंद करून तुम्ही सरेंडर व्हॅल्यू रक्कम घेऊ शकता.
योजनांशी संबंधित महत्वाचे मुद्दे:
कमीत कमी वय: LIC Jeevan Utsav Yojana सामील होण्यासाठी कमीत कमी वय साधारणतः 18 वर्षे असावे लागते. जास्तीत जास्त वय: योजना घेण्यासाठी जास्तीत जास्त वय 45 वर्षे असावे लागते. मेडिकल चाचणी: काही वयोगटांसाठी मेडिकल चाचणी आवश्यक असू शकते.
योजना घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड, ओळखपत्र (Voter ID, Passport), पत्ता पुरावा (Electricity Bill, Ration Card), जन्मतारीख पुरावा (Birth Certificate, 10th Certificate), पासपोर्ट साइज फोटो
जीवन उत्सव योजनेचे तुलनात्मक फायदे:
LIC Jeevan Utsav Yojana अन्य निवृत्तीवेतन योजनांपेक्षा जीवन उत्सव योजना ही अधिक फायद्याची मानली जाते. इतर निवृत्तीवेतन योजनांमध्ये प्रीमियम जास्त असू शकते किंवा पेन्शन कमी असू शकते. जीवन उत्सव योजनेत कमी प्रीमियममध्ये मोठा पेन्शन लाभ मिळतो, ज्यामुळे सामान्य कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते.
जीवन उत्सव योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
1. ही योजना कोणासाठी उपयुक्त आहे?
ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी उपयुक्त आहे, विशेषतः ज्यांना निवृत्तीनंतर नियमित पेन्शनची गरज आहे.
2. प्रत्येक वर्षी किती पेन्शन मिळते?
16 वर्षे प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला दरवर्षी ₹1,50,000 रुपये पेन्शन मिळते.
3. ही योजना किती काळ चालते?
प्रीमियम भरण्याचा कालावधी 16 वर्षांचा आहे. त्यानंतर आयुष्यभर दरवर्षी पेन्शन मिळते.
4. माझ्या मृत्यूनंतर कुटुंबाला काही लाभ मिळेल का?
होय, तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या वारसांना पेन्शनचे लाभ मिळतील.
5. कर फायदे काय आहेत?
या योजनेवर गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 80C अंतर्गत करसवलत मिळते.
निष्कर्ष:
LIC जीवन उत्सव योजना ही एक आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारी योजना आहे. कमी प्रीमियममध्ये अधिक फायदा देणारी ही योजना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य शोधणाऱ्या सर्वांसाठी आदर्श आहे. आपले भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि निवृत्तीनंतरचे जीवन आनंदी करण्यासाठी ‘जीवन उत्सव’ योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
आपल्या गरजेनुसार ही LIC Jeevan Utsav Yojana योजना निवडणे आणि वेळेत गुंतवणूक करणे हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच LIC जीवन उत्सव योजनेबद्दल तुमच्या आयुर्विमा प्रतिनिधी कडून अधिक माहिती घ्या. हि योजना सविस्तर समजून घ्या आणि आपल्या निवृत्तीचे दिवस आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवा.