Auto Rickshaw Drivers Grant: महाराष्ट्रातील रिक्षा चालकांसाठी ₹10,000 अनुदान जाहीर, चालक कल्याण बोर्ड स्थापनेसह, अभिनव योजना लागू.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Auto Rickshaw Drivers Grant: महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी 65 वर्षांवरील जेष्ठ रिक्षा चालकांसाठी ₹10,000 अनुदान योजना जाहीर केली आहे. ही योजना राज्यातील वृद्ध चालकांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना असणार आहे. या योजनेंतर्गत, 5 वर्षांहून अधिक काळ नोंदणी केलेल्या ज्येष्ठ रिक्षा चालकांना एकत्रित ₹10,000 इतके अनुदान दिले जाणार आहे.

हि योजना राज्यातील किमान 14,387 चालकांसाठी फायद्याची होणार आहे. या योजनेमध्ये 65 वर्षांवरील जेष्ठ चालकांचा समावेश आहे, जेणेकरून त्यांच्या कष्टांची योग्य कदर केली जाऊ शकते. महाराष्ट्रात ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांची मोठी संख्या आहे, ज्यामुळे ही योजना महत्वाची ठरत आहे.

ऑटो रिक्षा चालकांसाठी नवा कल्याण बोर्ड

महाराष्ट्र सरकारने नुकतेच “धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याण बोर्ड” स्थापन केला आहे. 27 जानेवारी 2025 रोजी या बोर्डाची स्थापना करण्यात आली, राज्य परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी याविषयी माहिती दिली कि या बोर्डाचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील रिक्षा व टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याण योजनांची अंमलबजावणी करणे हे असेल.

Auto Rickshaw Drivers Grant
Auto Rickshaw Drivers Grant

या बोर्डाचे कार्यक्षेत्र विस्तृत आहे आणि या द्वारे राज्यातील टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांना आरोग्य विमा, जीवन विमा, अपंगत्व विमा अशा विविध लाभांचा पुरवठा करण्याचा शासनाचा मानस आहे. या अनुदान योजनेचे उद्दीष्ट वृद्ध रिक्षा चालकांचा सन्मान आणि त्यांचा जीवनमान सुधारण्याचा आहे. वयोवृद्ध चालकांना आर्थिक मदतीसह त्यांच्या कार्याचा आदर करण्यात येणार आहे. यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाचे भविष्य अधिक सुरक्षित होईल.

वृद्ध चालकांसाठी आवश्यक अटी

वृद्ध चालकांना ₹10,000 अनुदान मिळवण्यासाठी काही सोप्या अटी आहेत. ती म्हणजे चालकांनी किमान 5 वर्षे अधिकृत नोंदणी केलेली असावी, या अटी नुसार एकूण 14,387 चालकांना या अनुदानाचा लाभ घेता येईल.

जाहीर केलेल्या या योजनेंतर्गत, 65 वर्षांवरील चालकांना ₹10,000 चा “ऑनरियम फंड” मिळेल. यामुळे त्यांच्या वृद्धापकाळातील जीवन अधिक सुरक्षित होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

ऑनलाइन नोंदणी व शिफारसी

Auto Rickshaw Drivers Grant साठी, ऑटो रिक्षा चालक 500 रुपये नोंदणी फी आणि 300 रुपये वार्षिक फी भरून ते चालक कल्याण बोर्डाशी जोडले जाऊ शकतात. यासाठी एक ऑनलाइन पोर्टल उपलब्ध आहे, ज्यामुळे रिक्षा चालकांना आपल्या मोबाइल फोनद्वारे सहजपणे नोंदणी करता येईल.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक नवीन पुरस्कार योजना सुद्धा जाहीर केली आहे. यामध्ये उत्कृष्ट रिक्षा चालक, आदर्श चालक संघटना, आणि सर्वोत्तम रिक्षा स्थानकांना पुरस्कार दिले जाणार आहेत. यामुळे चालकांची कामाची प्रेरणा वाढेल आणि त्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे यथायोग्य मान सन्मान प्राप्त होईल.

Auto Rickshaw Drivers Grant
Auto Rickshaw Drivers Grant

महाराष्ट्र सरकारचे पुढील पाऊल

महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या जीवनमानात सुधारणा होईल. या बोर्डाची स्थापना व विविध योजनांची अंमलबजावणी, ही राज्य सरकारच्या सामाजिक कल्याणासाठी एक महत्त्वाची दिशा आहे. महाराष्ट्र सरकारने या बोर्डाच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांचा निधी वापरण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आरोग्य, जीवन, अपंगत्व विमा यासारख्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी केली जाईल. हे पाऊले राज्यातील रिक्षा चालकांसाठी एक आश्वासन आहे की राज्य सरकार त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे.

Auto Rickshaw Drivers Grant

महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी घेतलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. सरकारच्या या कल्याण कारी योजनांमुळे वृद्ध रिक्षा चालकांच्या जीवनात मोठा बदल होईल. येणाऱ्या काळात विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी चालकांच्या जीवनमानात सुधारणा करेल. ऑनलाइन नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us