Health Insurance: आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासा, तुमचे पैसे वाचतील आणि तुम्हाला सर्वोत्तम सेवा मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Health Insurance: भारतात देशामध्ये अनेक गंभीर आजारांचा धोका झपाट्याने वाढत आहे. अपोलो हॉस्पिटलच्या अहवालानुसार भारताला कर्करोगाची राजधानी असेही म्हटले आहे. या अहवालानुसार, भारतात ज्या वेगाने असंसर्गजन्य आजार वाढत आहेत, ते अतिशय चिंताजनक आहे. भारत देशातील प्रत्येक तिसरा व्यक्ती हा प्री-डायबेटिसने ग्रस्त आहे आणि 3 पैकी 2 लोक प्री-हायपरटेन्सिव्ह स्थितीने ग्रस्त आहेत. याशिवाय 10 पैकी 1 व्यक्ती डिप्रेशनमधून जात आहे. असे अनेक समस्या आहेत.

असे असूनही, भारत देशामध्ये आरोग्य विमा (health insurance) खरेदी करणाऱ्यांची संख्या मात्र खूपच कमी आहे. भारतातील लोकसंख्येपैकी किती ओलकांचा आरोग्य विमा आहे याबद्दल कोणतीही अचूक माहिती किंवा आकडेवारी उपलब्ध नाही, परंतु विविध स्त्रोतांनी काढलेल्या निष्कर्षाने हे प्रमाण 35-67% दरम्यान असावे असे म्हटले आहे. विविध रोगांची वाढती संख्या पाहता, चांगला आरोग्य विमा खरेदी करणे आवश्यक आहे, जेणेकरून अडचणीच्या वेळी कोणालाही मदत करण्यासाठी, बोलावन्याची आवश्यकता उरणार नाही.

Health Insurance
Health Insurance

Health Insurance योजना कशी निवडावी?

प्रत्येकाच्या आरोग्याच्या गरजा वेग वेगळ्या असू शकतात. म्हणूनच, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रथम आपल्या गरजा समजून घ्या. आरोग्य विम्यामध्ये तुम्हाला कशाची गरज आहे आणि कशाची गरज नाही याचा विचार करूनच कोणताही निर्णय घ्या. या लेखामध्ये काही महत्वाचे मुद्दे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवू शकता आणि योग्य आरोग्य विमा खरेदी शकाल.

Health Insurance कव्हरेज

तुमच्या आरोग्य विम्यामध्ये कोण कोणत्या गोष्टींचे कव्हर आहे आणि कोणते कव्हर नाहीत याची पूर्ण माहिती घ्या जसेकी गरजेनुसार मॅटर्निटी डिलिव्हरी आणि विविध कर्करोगासारखे गंभीर आजारांना किंवा सेवांना कव्हर मिळते कि नाही हे चेक करा.

Health Insurance नेटवर्क

आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी, कॅशलेस आणि रिअम्बासमेंट सुविधांसह हॉस्पिटलचे नेटवर्क आपल्या राहत्या भागामध्ये आहे का आणि त्यांची नावे, यांचे फोन नंबर्स, त्यांचे पत्ते, त्याचबरोबर कोणत्या हॉस्पिटलला कोणकोणत्या सेवा आहेत याची माहिती घ्या.

आधीच अस्तित्वात असलेल्या आजार परिस्थिती

आपल्याया असणारे पूर्व आजार आणि विमा सुरु केल्यावर, कोणत्या आजारांना वेटिंग पिरियड किती आहे आणि त्यांचे कव्हरेज किती आहे, याबद्दलचे तपशील तपासा.

नो-क्लेम बोनस

नो-क्लेम बोनसचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही निरोगी राहिल्यास आणि कोणताही दावा करत नसल्यास, काही योजना विम्याची रक्कम वाढवून तुमचे कव्हरेज आणखी वाढवू शकतात. तुमच्या आरोग्यदायी सवयींसाठी बक्षीस म्हणून तुमच्या प्रीमियमवर कालांतराने सूट दिली जाऊ शकते.

डेकेअर आणि घरगुती उपचार

असे कोणते उपचार आहेत कि ज्यामध्ये हॉस्पिटलायझेशन आणि वैद्यकीय सेवा आवश्यक नसलेल्या उपचारांसाठी कव्हरेज, घरीच प्रदान केले जाऊ शकते. याबद्दल सविस्तर माहिती घ्या.

रुग्णवाहिका आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर

तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर आणि नंतर रुग्णवाहिकेचे शुल्क आणि खर्चाचे कव्हरेज पहा, तसेच ऍडमिट होण्याअगोदर आणि डिस्चार्ग नंतर कोणते खर्च आहेत आणि त्याबद्दलचे बिल दिली जाणार आहे कि नाही याबद्दलची पण माहिती घ्या.

अतिरिक्त फायदे

तुमच्या प्रीमियममध्ये मोठी वाढ न करता तुमचे विद्यमान कव्हरेज वाढवण्यासाठी टॉप-अप योजनांचा विचार करा. जर तुमच्या मूळ योजनेची विमा रक्कम संपली असेल तर या योजना अतिरिक्त कव्हरेज म्हणून काम करतात. संभाव्य आरोग्य समस्या लवकर ओळखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणाऱ्या योजना शोधा, ज्यामुळे भविष्यात आरोग्याच्या अधिक गंभीर समस्या टाळता येतील.

आजारांची वाढती संख्या लक्षात घेऊन, प्रत्येक भारतीयासाठी चांगला आरोग्य विमा अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. आरोग्य विमा तुम्हाला अडचणीच्या वेळी आर्थिक बळ देतो. https://nha.gov.in/

12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur