Honda Unicorn 162 CC BS6: ही बाईक भारतातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह मोटरसायकलींपैकी एक आहे. विशेषतः नवीन BS6 उत्सर्जन मानक नियमांसहीत, BS6 इंजिनसह सुसज्ज असलेली ही बाईक, तिच्या टिकाऊपणा, आरामदायी आणि शक्तिशाली कामगिरीसाठी ओळखली जाते. या बाईक मध्ये असणारी Stability, Comforts आणि Performance ग्राहकांना खूप Attractive करत आहे.
Honda ने हे मॉडेल सुधारित इंजिन BS6 उत्सर्जन मानकसह, उत्तम तंत्रज्ञान आणि इंधन कार्यक्षमतेसह अपग्रेड केले आहे, ज्यामुळे हि बाईक दैनंदिन प्रवास आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या रायडर्ससाठी एक आदर्श पर्याय बनते. या लेखा मध्ये होंडा युनिकॉर्न 162 सीसी बीएस 6 बाईकची सर्व माहिती, वैशिष्ट्ये, किंमत, मायलेज, आणि इतर सर्व काही जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला हि बाईक खरेदी करण्यासाठी योग्य निर्णय घेता येईल, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.
Honda Unicorn 162 CC BS6 ची प्रमुख वैशिष्ट्ये.
शक्तिशाली 162.7 सीसी इंजिन: होंडा युनिकॉर्न 162 सीसी मध्ये सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक 162.7CC इंजिन आहे, जे 12.9 bhp पॉवर आणि 14 Nm टॉर्क जनरेट करते. या BS6 इंजिनमुळे उत्सर्जन कमी होते आणि बाईककडून पर्यावरण पूरक नियमांचे अधिक पालन होते.
कम्फर्ट: होंडा युनिकॉर्न आपल्या आरामदायक राइडसाठी प्रसिद्ध आहे. या बाईकमध्ये ठळक वैशिष्ट्यांपैकी असलेले 240 मिमी फ्रंट डिस्क आणि 130 मिमी ड्रम ब्रेक्स सह सुसज्ज आहे, तसेच टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि मोनोशॉक रियर सस्पेंशन यामुळे बाईक चालवताना कोणत्याही रस्त्यावर कम्फर्ट, आरामदायी प्रवास आणि स्थिरता अनुभवायला मिळते.
नवीन प्रगत तंत्रज्ञान: Honda Unicorn BS6 मॉडेलमध्ये प्रोग्राम्ड फ्यूल इंजेक्शन (PGM-FI) आणि होंडा इको टेक्नोलॉजी (HET) आहे. यामध्ये इंधनाची जास्त बचत होते, केवळ इंधन कार्यक्षमता सुधारत नाही तर उत्तम थ्रोटल प्रतिसाद देखील देते. होंडा युनिकॉर्न बीएस 6 चे इंजिन कमी आवाज आणि व्हायब्रेशनसह काम करते, ज्यामुळे बाईक चालवताना शांत आणि सुरळीत अनुभव मिळतो.
Honda Unicorn 162 CC BS6 डिझाइन
क्लासिक आणि स्टायलिश लूक: होंडा युनिकॉर्न 162 सीसी बीएस 6 चे डिझाइन अगदी क्लासिक आणि आकर्षक आहे. या बाईकचे गोल्डन रिम्स, मस्क्युलर फ्यूल टँक, आणि स्लीक साइड पॅनेल्स, बाईकला एक स्टायलिश आणि मजबूत लूक प्रदान करतात.
इन्स्ट्रुमेंट क्लस्टर: युनिकॉर्नमध्ये अनोलोग इंस्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे, ज्यामध्ये स्पीडोमीटर, ओडोमीटर, फ्यूल गेज, आणि ट्रिप मीटर यासारखी महत्त्वाची माहिती असते.
हेडलाइट्स आणि टेल लाइट्स: होंडा युनिकॉर्न बीएस 6 मध्ये नॉर्मल 12 वॅट्स हेडलाइट्स आणि टेल लाइट्स आहेत, ज्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी उत्तम प्रकाश मिळतो आणि इतर वाहन चालकांना हि बाईक लक्षात येते.
इंधन कार्यक्षमता आणि मायलेज
होंडा युनिकॉर्न 162 सीसी बीएस 6 बाईकच्या इंधन कार्यक्षमतेसाठी होंडा इको टेक्नोलॉजी (HET) आणि प्रोग्राम केलेले इंधन इंजेक्शन (PGM-FI) चा समावेश आहे, ज्यामुळे बाईकला जास्त मायलेज मिळते. होंडा युनिकॉर्नला साधारणपणे 55-60 किमी प्रति लीटर चे मायलेज मिळते, ज्यामुळे हि बाईक 160CC BIKES सेगमेंट मधील उत्तम इंधन-कार्यक्षम बाइक बनवते.
ब्रेकिंग आणि सुरक्षा वैशिष्ट्ये
अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS): होंडा युनिकॉर्न 162 सीसी मध्ये सिंगल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) दिले आहे, जे बाईकचे ब्रेकिंग कार्य वाढवते, ज्यामुळे अचानक ब्रेक लागल्यावरही बाईक स्थिर राहते आणि अपघाताची शक्यता कमी होते.
मजबूत चेसिस: या बाईकच्या चेसिसला मजबूत आणि लाइटवेट बनविण्यात आले आहे, ज्यामुळे विशेषत: हाय-स्पीडने चालवताना चांगले नियंत्रण आणि स्थिरता मिळते. तसेच, या बाईकचे वजन साधारणपणे 139 किलो आहे, ज्यामुळे चालवताना ती हलकी आणि नियंत्रणात असते.
होंडा युनिकॉर्न 162 सीसी बीएस 6 ची किंमत
होंडा युनिकॉर्न 162 सीसी बीएस 6 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1,09,000 पासून सुरू होते. राज्यांनुसार ही किंमत थोडीफार बदलू शकते. या किमतीत युनिकॉर्नच्या सेगमेंटमध्ये ती एक योग्य पर्याय मानली जाते, कारण या किमतीमध्ये तुम्हाला शक्तिशाली इंजिन, कम्फर्ट, आणि आधुनिक तंत्रज्ञान मिळते.
वजन आणि डाइमेंशन्स
होंडा युनिकॉर्न 162 सीसी बीएस 6 चे एकूण वजन 139 किलो असून, लांबी 2081 मिमी, रुंदी 756 मिमी, आणि उंची 1103 मिमी आहे. बाईकची व्हीलबेस 1335 मिमी आहे, ज्यामुळे हि बाईक रायडरसाठी प्रशस्त आणि आरामदायक आहे. या बाईकचे सीट हाइट 798 मिमी आहे, ज्यामुळे ती विविध प्रकारच्या लांब प्रवासांसाठी योग्य आहे.
Honda Unicorn 162 CC BS6 ची किंमत
Honda Unicorn 162 CC BS6 भारतात एक्स-शोरूम किंमत ₹1,10,000/- पासून उपलब्ध आहे. स्थान आणि राज्य-विशिष्ट करांवर आधारित किंमत थोडी बदलू शकते. बाईकची वैशिष्ट्ये, परफॉर्मन्स आणि ब्रँड व्हॅल्यू पाहता, हि बाईक 160CC सेगमेंटमध्ये पैशासाठी उत्तम पर्याय आहे.
Honda Unicorn 162 CC BS6 मध्ये चार आकर्षक रंग पर्याय उपलब्ध आहेत: पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट एक्सिस ग्रे मेटालिक, इम्पीरियल रेड मेटॅलिक, पर्ल सायर्न ब्लू.
सर्व्हिसिंग आणि वॉरंटी
होंडा कंपनीकडून युनिकॉर्न बाईकसाठी, 3 वर्षांची वॉरंटी आणि एक वर्षाची रोडसाइड असिस्टन्स सुविधा दिली जाते. कंपनीचे संपूर्ण भारतभर विस्तृत सेवा नेटवर्क आहेत. नियमित सर्व्हिसिंगची सोय देशभरातील होंडा सर्व्हिस सेंटर्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे त्यांच्या बाइक्सची नियमित सर्व्हिसिंगसह देखभाल करणे सोपे होते.
Honda Unicorn 162 CC BS6 बाईक का खरेदी करावी?
तुम्ही रोजच्या प्रवासासाठी आरामदायी, स्थिर आणि इंधन-कार्यक्षम बाइक शोधत असाल तर, Honda Unicorn 162 CC BS6 एक परिपूर्ण निवड आहे. त्याची मायलेज आणि कमी देखभाल खर्च शहराच्या राइडसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. लांब प्रवास आणि टूरिंगसाठी ही बाईक योग्य आहे कारण तिचे सस्पेंशन सिस्टम आणि सीट आरामदायक आहे, ज्यामुळे राइडरला लांब प्रवासात त्रास होत नाही. बाईक आरामदायी आहे. प्रशस्त आसनव्यवस्था हे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आदर्श असते, तुम्ही शहरामध्ये किंवा महामार्गावर चालत असलात तरीही, होंडा युनिकॉर्न BS6 एक स्मूथ आणि आरामदायक अनुभव देते.
या बाईक मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे म्हणजे, प्रोग्राम्ड फ्यूल इंजेक्शन आणि होंडा इको टेक्नोलॉजीमुळे इंधन कार्यक्षमता जास्त आहे. आरामदायी राइड साठी सस्पेंशन आणि सीटची कम्फर्टबिलिटी बेस्ट आहे. 162.7 सीसी शक्तिशाली इंजिन मुळे उत्तम परफॉर्मन्स मिळतो. अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) मुले बेटर अँड बेस्ट सेंचुरीत्या मिळते. होंडाचे नाव आणि त्याचा दर्जा यामुळे विश्वासार्हता मिळते .
निष्कर्ष
Honda Unicorn 162 CC BS6 आधुनिक तंत्रज्ञानासह, सुरक्षितता आणि स्टायलिश डिझाइनमुळे, भारतातील सर्वोत्कृष्ट मोटरसायकल पैकी एक आहे. ही एक चांगली मोटरसायकल, तिच्या सर्व वैशिष्ट्ये आणि फायद्यांमुळे एक परिपूर्ण पर्याय आहे. जर तुम्हाला एक आरामदायक, शक्तिशाली, आणि इंधन कार्यक्षम बाईक हवी असेल तर युनिकॉर्न तुमच्यासाठी योग्य ठरेल. प्रगत वैशिष्ट्ये, स्टायलिश डिझाईन आणि उत्कृष्ट मायलेज यामुळे हि तिच्या श्रेणीतील सर्वोत्तम बाइक्सपैकी एक आहे.
तुम्हाला दैनंदिन प्रवास करण्याची किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बाईकची आवश्यकता असेल तर, होंडा युनिकॉर्न BS6 एक उत्कृष्ट निवड आहे. तुम्ही विश्वासार्ह, शक्तिशाली आणि कार्यक्षम बाइकसाठी विचार करत असाल तर Honda Unicorn 162 CC BS6 निश्चितपणे आपल्या यादीत प्रथम असेल.
या बाईक च्या अधिक माहितीसाठी आणि बाईक बुक करण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा