Krushi Purskar 2024: महाराष्ट्र शासनाच्या कृषी पुरस्कारांमध्ये भरघोस वाढ, पुरस्कार्थींना मिळतील लाखोंची बक्षिसे.

Krushi Purskar 2024: महाराष्ट्र राज्यात दरवर्षी शेती आणि शेतीपूरक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थेला कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत दिला जाणाऱ्या कृषी पुरस्कारामध्ये 2024 पासून, भरघोस अशी वाढ केली आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार दिले जातात, त्या पुरस्कारांची बक्षीसांची रक्कम ही मर्यादित स्वरूपाची होती. यावर्षी म्हणजेच, 2024 पासून सर्वच पुरस्कारांमध्ये भरघोस अशी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ‘कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग’ मार्फत दरवर्षी राज्यातील प्रगतशील शेतकरी आणि संस्था यांना त्यांच्या शेतीमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. अशा पुरस्कारांच्या मुळे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते, शेतीची व्यापकता अजून वाढते, शेती पिकांच्या मध्ये वाढ होण्यास मदत होते, यासाठी या पुरस्कारांची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली आहे.

krushi purskar 2024
krushi purskar 2024

Krushi Purskar 2024 पुरस्कार निवड समिती

हे पुरस्कार देण्यासाठी शासनाच्या निवड समितीमार्फत राज्यभरातून शेतीमध्ये विशेष आणि उल्लेखनीय काम करत असलेल्या शेतकऱ्यांची आणि शेती संदर्भात काम करत असणाऱ्या विविध संस्थांची माहिती मागवली जाते. निवड समितीच्या नियम, अटी, निकष, स्वरूप यामध्ये व्यवस्थित बसणाऱ्या शेतकऱ्यांचीं व संस्थांची विविध पुरस्कारांसाठी प्रत्येक वर्षी निवड केली जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ह्या पुरस्काराचे वितरण एका मोठ्या समारंभांमध्ये केले जाते.

कृषी पुरस्काराबद्दल शासन निर्णय

शासनाने घेतलेल्या निर्णयाद्वारे हे Krushi Purskar 2024 विविध पुरस्कार आणि त्यांचे निकष, स्वरूप, पुरस्काराची एकूण रक्कम, निवड समिती व कार्यपद्धती या सर्वांना मान्यता देण्यात आलेली आहे. सदर पुरस्काराच्या रकमेमध्ये तसेच पुरस्कारांच्या त्यांच्या दैनिक आणि प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतले आहेत.

विविध कृषी पुरस्कारांची संख्या व पुरस्कारांच्या सुधारित रकमा पुढीलप्रमाणे

अ.क्र.पुरस्काराचे नावपुरस्कारांची संख्यापुरस्काराची सध्याची रक्कम
पुरस्काराची सुधारित रक्कम
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार७५०००/-३०००००/-
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार५००००/-२०००००/-
जिजामाता कृषी भूषण पुरस्कार५००००/-२०००००/-
कृषी भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार५००००/-२०००००/-
वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार३००००/-१२००००/-
युवा शेतकरी पुरस्कार३००००/-१२००००/-
उद्यान पंडित पुरस्कार२५०००/-१०००००/-
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्व साधारण गट३४११०००/-४४०००/-
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट११०००/-४४०००/-
१०पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार१०
११उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार
krushi Purskar 2024

सोबत मिळणारे आणखी काही फायदे

Krushi Purskar 2024 पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी द्यावयाची दैनिक आणि प्रवास खर्च भत्याच्या रकमेत सुद्धा वाढ वाढ करण्यात आली आहे. दैनिक आणि प्रवास  भत्ता ची रक्कम प्रति पुरस्कार रुपये 15000 इतकी  देण्यात येईल. सदर दैनिक व प्रवास भत्ते विहित कार्यपद्धतीनुसारच देण्यात येणार आहेत.

सदर शासन निर्णयानुसार पुरस्काराच्या रकमामध्ये तसेच दैनिक व प्रवास भत्त्याच्या रकमेत होणारी वाढ सन 2020 पासून च्या विविध कृषी पुरस्कार, त्यांच्या निवडीसाठी लागू राहिली आहेत व ती इथून पुढे सुद्धा लागू राहील.

सदरचा Krushi Purskar 2024 शासन निर्णय वित्त विभागाच्या अनुक्रमांक 361/2023 अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून तसेच माननीय उपमुख्यमंत्री(वित्त), उपमुख्यमंत्री (गृह) व माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दिलेल्या मान्यतेनुसार देण्यात येणार आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन ज्या वेबसाईटवर https://www.maharashtra.gov.in/Site/1603/Government-Decisions उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक अनुक्रमांक 202402071814474501 आहे

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now