LIC Jeevan Anand Policy: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या सर्वच योजना लोकांना सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन्ही साठी आवडतात. अशा अनेक योजना आहेत, ज्यात तुम्ही अल्प रक्कम गुंतवून मोठा निधी उभा करू शकता. LIC ची अशीच एक खास योजना म्हणजे, जीवन आनंद योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त ४७ रुपये गुंतवून २७ लाखांपर्यंतची रक्कम घेऊ शकता.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जीवन आनंद योजनेबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आपण हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.

LIC Jeevan Anand Policy
या योजनेत इतरही अनेक फायदे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये चार प्रकारचे रायडर्स उपलब्ध आहेत. या चार रायडर्समध्ये अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर, अपघात लाभ रायडर, न्यू टर्म इन्शुरन्स रायडर आणि नवीन क्रिटिकल बेनिफिट रायडर यांचा समावेश आहे. पॉलिसीधारकाच्या मृत्यूवर १२५% मृत्यू लाभ नॉमिनीला दिला जातो किंवा योजनाधारकाला पॉलिसी मॅच्युरिटी झाल्यावर तहयात विमा संरक्षण दिल जाते.
४७ रुपये भरून २७ लाख कसे मिळवायचे?
समजा तुमचे वय ३० वर्षे आहे तर, तुम्हाला ही पॉलिसी ५,५०,००० रुपयांच्या विमा रकमेसाठी घ्यावी लागेल. तुम्हाला १,४१० रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल, कि जो दररोजचा प्रीमियम सुमारे ४७ रुपये असेल. हि योजना तुम्हाला ३५ वर्षांसाठी घ्यावी लागेल, म्हणजेच याची एकूण मुदत ३५ वर्षे असेल. ३५ वर्षांनंतर तुम्हाला २७ लाख रुपये मिळतील.
या २७ लाखांपैकी ५,५०,००० रुपये हि तुमची विमा रक्कम असेल आणि बाकीची रक्कम बोनस, व्याज असेल. ८,८५,५०० रुपये बोनस म्हणून आणि सुमारे १२,६५,००० रुपये अंतिम अतिरिक्त बोनस म्हणून दिला जाईल. अशा प्रकारे विमा रक्कम आणि बोनस रक्कम अशी एकूण २७,००,००० रुपये योजनाधारकास मिळणार आहेत. आणि त्यानंतर तहयात ५,५०,००० चे विमा संरक्षण मिळेल. या दरम्यान योजनाधारकास कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही.
जीवन आनंद पॉलिसी अंतर्गत इतर कोणते फायदे मिळतील?
या LIC Jeevan Anand Policy मध्ये पॉलिसीधारकाला किमान ६,८७,५०० रुपयांचे लाईफ कव्हर मिळेल. या मध्ये १५ वर्षे ते ३५ वर्षे या पैकी कोणतीही मॅच्युरिटी मुदत तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता. या पॉलिसीमध्ये दोनदा बोनस दिला जातो, परंतु यासाठी तुमची पॉलिसी १५ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. यामध्ये किमान विमा रक्कम १ लाख रुपये आहे. कमाल मर्यादा नाही. पॉलिसीमध्ये होणाऱ्या गुंतवणुक रकमेवरती आयकर कायदा १९६१, ८०क नुसार कर सूट मिळते. तीन वर्षानंतर कर्ज उपलब्ध आहे. मॅच्युरिटी रक्कम इनकम टॅक्स फ्री आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या LIC शाखा कार्यालय किंवा अधिकृत वेबसाईट www.licindia.in ला क्लिक करा किंवा तुमच्या आयुर्विमा प्रतिनिधींशी या योजनेबाबत चर्चा करा आणि आजच योजना सुरु करा.
Table of Contents