LIC Plans: भारतातील सर्वात मोठी आयुर्विमा सेवा देणारी कंपनी लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सर्व योजना लोकांच्या मध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सर्वच योजनांच्या मध्ये असणारी लवचिकता, उच्च प्रतीचा परतावा आणि LIC च्या सोबत असणारी भारत सरकारची सार्वभौम हमी (sovereign guarantee). या सर्व गोष्टी मुळे LIC ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह आयुर्विमा कंपनी बनली आहे.
LIC च्या या विविध योजने पैकी एका खास योजनेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. जिच्या मध्ये आपण कमी कालावधीमध्ये आणि कमी पैसे भरून जास्त फायदा करून घेऊ शकतो. त्यासाठी आपणास पुढच्या काही वर्षांचे संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करावे लागेल. काही ठराविक रक्कम जाणीवपूर्वक बाजूला काढून त्याचे हप्ते भरावे लागतील.
या लेखामधे LIC स्वप्न योजनेबद्दलची सर्व माहिती सविस्तर देत आहोत. कृपया हा लेख संपूर्ण व काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या.

LIC Plans: स्वप्न योजना
LIC च्या लोकप्रिय योजनेपैकीच ही एक योजना आहे. सर्व योजना कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखल्या जातात, त्यांना विशिष्ट टेबल नंबर सुद्धा असतो. त्यापैकी ही एक योजना आहे. या योजनेला स्वप्न योजना हे आम्ही दिलेले नाव आहे. कारण या योजनेमध्ये पैसे गुंतवल्यामुळे आपणास मुदतपूर्तीनंतर मिळणार्या रकमेतूनच आपली सर्व स्वप्ने खरी होण्यास खूप मोलाची मदत होणार आहे. खरेतर या योजनेचे नाव आहे LIC ची जीवन लाभ योजना, चला तर मग ही योजना कशी आहे ते पाहूया.
ही योजना कशी आहे? या मध्ये किती पैसे गुंतवावे लागतील? या योजनेतून आपणास कसा व किती फायदा होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास खालील उदाहरणातून स्पष्ट मिळतील.
हे उदाहरण 35 वयाच्या स्त्री किंवा पुरुष यांच्या साठी आहे. 12,00,000/- रुपये विमा संरक्षण पॉलिसी साठी 35 वयाच्या व्यक्तीसाठी 25 वर्षे, 21 वर्षे किंवा 16 वर्षे मुदतीसाठी ही योजना निवडली तर आपणास खालील प्रमाणे मुदतपूर्तीस रक्कम मिळेल.
LIC Plans: 16 वर्षे हप्ते भरा आणि घ्या 31,50,000/- रु.
या योजने मध्ये आपण 16 वर्षे हप्ता भरावयाचा आहे. आपणास मुदतपूर्तीनंतर 31,50,000/- रु. मॅच्युरिटी बेनिफीट मिळणार आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी आपल्याला योजनेची मुदत 25 वर्षे घ्यावी लागेल. 25 वर्ष मुदत घेऊन आपणास 16 वर्षे हप्ते भरावयाचे आहेत. सोळा वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंत असा नऊ वर्षे आपला वेटिंग पिरियड असेल. या योजनेमध्ये 25 वर्षे विमा संरक्षण सुद्धा घ्यावे लागेल.
म्हणजेच आपल्याला 31,50,000/- रुपयांची मॅच्युरिटी रक्कम ही आजपासून पंचवीस वर्षानंतर मिळणार आहे. त्याचा जो हप्ता असेल तो फक्त सोळा वर्षेच भरायचा आहे. सोळा वर्षांमधील आपली रक्कम 9,09,265/- रु. भरली जाईल. या योजनेमध्ये चोवीस लाख रुपयांचे विमा संरक्षण सुद्धा आपणास मिळेल.
या योजनेमध्ये पंचवीस वर्षांमधील व्याजाची पूर्ण रक्कम म्हणजेच बोनसची रक्कम 22,40,735/- रु. होईल. एलआयसी कडून मुदतपूर्तीस आपणास, हप्ता स्वरूपामध्ये भरलेली रक्कम 9,09,265/- रु. आणि बोनसची रक्कम 22,40,735/- रु. अशी एकूण रक्कम 31,50,000/- रु. एकत्रित रित्या आज पासून 25 वर्षानंतर मिळणार आहे.
LIC Plans: 15 वर्षे हप्ते भरा आणि घ्या 24,28,800/- रु.
या योजनेमध्ये आपण 15 वर्षे हप्ता भरावयाचा आहे. आपणास मुदतपूर्ती नंतर 24,28,800/- रुपये मॅच्युरिटी बेनिफीट मिळणार आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी आपल्याला योजनेची मुदत 21 वर्षे घ्यावी लागेल. 21 वर्ष मुदत घेऊन आपणास 15 वर्षे हप्ता भरावयाचा आहे. पंधरा वर्षापासुन ते एकवीस वर्षापर्यंत असा सहा वर्षे आपला वेटिंग पिरियड असेल. या योजनेमध्ये 21 वर्षे विमा संरक्षण सुद्धा घ्यावे लागेल.
म्हणजेच आपल्याला 24,28,800/- रुपयांची मॅच्युरिटी रक्कम ही आजपासून एकवीस वर्षानंतर मिळणार आहे. त्याचा जो हप्ता असेल तो फक्त पंधरा वर्षेच भरायचा आहे. पंधरा वर्षांमधील आपली रक्कम 9,99,715/- रु. भरली जाईल. या योजनेमध्ये चोवीस लाख रुपयांचे विमा संरक्षण सुद्धा आपणास मिळेल.
या योजनेमध्ये एकवीस वर्षांमधील व्याजाची पूर्ण रक्कम म्हणजेच बोनसची रक्कम 14,29,085/- रु. होईल. एलआयसी कडून मुदतपूर्तीस आपणास, हप्ता स्वरूपामध्ये भरलेली रक्कम 9,99,715/- रु. आणि बोनसची रक्कम 14,29,085/- रु. अशी एकूण रक्कम 24,28,800/- रु. एकत्रित रित्या आज पासून 21 वर्षानंतर मिळणार आहे.
LIC Plans: 10 वर्षे हप्ते भरा आणि घ्या 19,98,000/- रु.
या योजनेमध्ये आपण 10 वर्षे हप्ता भरावयाचा आहे आणि आपणास मुदतपूर्ती नंतर 19,98,000/- रु. मॅच्युरिटी बेनिफिट मिळणार आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी आपल्याला योजनेची मुदत 16 वर्षे घ्यावी लागेल. 16 वर्षे मुदत घेऊन आपणास 10 वर्षे हप्ता भरावयाचा आहे. सोळा वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत असा सहा वर्षे आपला वेटिंग पिरियड असेल. या योजनेमध्ये 16 वर्षे विमा संरक्षण सुद्धा घ्यावे लागेल.
म्हणजेच आपल्याला ही 19, 98,000/- रुपयांची मॅच्युरिटी रक्कम आजपासून सोळा वर्षानंतर मिळणार आहे. त्याचा जो हप्ता असेल तो फक्त दहा वर्षेच भरायचा आहे. दहा वर्षांमधील आपली रक्कम 10,34,561/- रु. भरली जाईल. या योजनेमध्ये चोवीस लाख रुपयांचे विमा संरक्षण सुद्धा आपणास मिळेल.
या योजनेमध्ये सोळा वर्षांमधील व्याजाची पूर्ण रक्कम म्हणजे बोनसची रक्कम 9,63,439/- रु. होईल. एलआयसी कडून मुदतपूर्तीस आपणास, हप्ता स्वरूपामध्ये भलेले रक्कम 10,34,561/-रु आणि बोनसची रक्कम 9,63,439/- रु. एकत्रित रीत्या आज पासून 16 वर्षानंतर मिळणार आहे.

LIC Plans: हप्ते स्वरूपात किती रक्कम भरावी लागेल?
आज पासून 25 वर्ष मुदत साठी व 12,00,000/- लाख विमा रक्कम साठी, 35 वयाच्या स्त्री किंवा पुरुष साठी, एलआयसी योजना धारकांकडून पहिल्या वर्षाचा 58,000/- रुपये वार्षिक हप्ता घेईल. दुसर्या वर्षापासून 56,751-/ रुपये वार्षिक हप्ता भरावा लागेल. हे हप्ते एकूण फक्त 16 वर्षे भरायचे आहेत.
आज पासून 21 वर्ष मुदत साठी व 12,00,000/- लाख विमा रक्कम साठी, 35 वयाच्या स्त्री किंवा पुरुष साठी, एलआयसी योजना धारकांकडून पहिल्या वर्षाचा 68,015/- रुपये वार्षिक हप्ता घेईल. दुसर्या वर्षापासून 66,550/- रुपये वार्षिक हप्ता भरावा लागेल. हे हप्ते एकूण फक्त 15 वर्षे भरायचे आहेत.
आज पासून 16 वर्ष मुदत साठी व 12,00,000/- लाख विमा रक्कम साठी, 35 वयाच्या स्त्री किंवा पुरुष साठी, एलआयसी योजना धारकांकडून पहिल्या वर्षाचा 1,05,500/- रुपये वार्षिक हप्ता घेईल. दुसर्या वर्षापासून 1,03,229/- रुपये वार्षिक हप्ता भरावा लागेल. हे हप्ते एकूण फक्त 10 वर्षे भरायचे आहेत.
LIC Plans: सोबत मिळणाऱ्या सुविधा आणि वैशिष्ट्य काय आहेत?
- ही योजना चालू करून तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काही कारणासाठी, थोड्या कागद पत्रांवर कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
- आपल्याकडून भरले जाणारे सर्व विमा हप्ते 80C अंतर्गत आयकर सवलतीसाठी पात्र असतील.
- मुदतपूर्तीनंतर मिळणारी मॅच्युरिटी अमाऊंट इन्कम टॅक्स फ्री असेल.
- विमा हप्त्यासोबत थोडा जास्त हप्ता भरून अपघाती फायदा, अपंगत्वचा फायदा, टर्म रायडर ई. फायदा घेता येतो.
- ही योजना वय वर्ष 8 पासून ते 59 वर्षापर्यंत कोणत्याही स्त्री किंवा पुरुषांना घेता येते.
- हप्ते भरण्यासाठी वार्षिक, सहामाही, तीमाई, मासिक किंवा ईसीएस द्वारे प्रकार उपलब्ध आहेत.
Table of Contents
for more details click on www.licindia..in