मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना: महिलांना दरवर्षी 18,000 रु. मिळणार, महाराष्ट्र राज्याचा महत्वाचा निर्णय,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत असतात. महिलांचे श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. या परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना 28 जून 2024 पासून सुरु केली आहे.

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण”/ Majhi Ladki Bahin Yojana योजनेचा उद्देश

महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ऍनिमिया चे प्रमाण 50 पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्के वारी 59.10 टक्के व स्त्रीयांची टक्के वारी 28.70 टक्के इतकी आहे. ही वस्तुस्तिथी लक्षात घेता, महिलांची आर्थिक आणि आरोग्य परिस्थिती सुधारणा करणे आवश्यक आहे. राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन, रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलाना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींच्या सशक्तीकरणास चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्यास मदत करणे. हा उद्देश समोर ठेऊनच राज्यसरकारने या Majhi Ladki Bahin Yojana योजनेची सुरुवात केली आहे.

योजनेचे स्वरुप काय आहे?

Majhi Ladki Bahin Yojana: पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक, पात्र महिलेला स्वतःच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये (Direct Benefit Transfer द्वारे) दरमहा रु.1,500/- रक्कम दिली जाईल.

योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता महिला पात्र आहेत.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे?

Majhi Ladki Bahin Yojana साठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची कायम रहिवाशी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता निराधार महिलेचे किमान वय 21 वर्ष पूर्ण आणि कमाल 60 वर्ष पूर्ण असावेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

योजनेसाठी कोण पात्र नाही?

ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. ज्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम / कंत्राटी कामगार म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, असे कामगार व कर्मचारी अपात्र असतील.

सदर Majhi Ladki Bahin Yojana लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती महिला अपात्र असेल.

ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असतील किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य असतील तर या महिला अपात्र असतील.

ज्यांच्या संयुक्त कुटुंबातील सदस्यांची एकत्रितरित्या पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) आहेत अशा महिला अपात्र असतील.

योजनेसाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.

योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य), सेविंग बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.

अर्ज करण्याची पद्धत

योजनेचा अर्ज पोर्टल/मोबाइल ॲपद्वारे/सेतू सुविधा केंद्र द्वारे, ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया असेल. सदर योजनेसाठी वेब पोर्टल व मोबाईल अप्लिकेशन तयार करण्याची जबाबादारी आयुक्त महिला व बाल कल्याण विकास, पुणे यांची राहील.

पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल तर, त्यांनी अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी केंद्र/बाल विकास प्रकल्प अधिकारी कायालये इ. मध्ये संपर्क करावा.

वरील ऑनलाईन भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन सबमिट केला जाईल, त्याचबरोबर सबमिट केलेल्या अर्जाची योग्य पोच पावती दिली जाईल. हा अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

अर्जदार महिलेने अर्ज भरताना स्वतः आपल्या सर्व कागद्पत्रांसहित उपस्थित असणे आवश्यक आहे, जेणेकरून अर्जदार महिलेचा ऑनलाईन फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल.

अ.क्र.उपक्रमकालमर्यादा
1योजना अर्ज सुरुवात1 जुलै, 2024
2अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक15 जुलै, 2024
3तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक16 जुलै, 2024
4तात्पुरत्या यादीवरील तक्रार/हरकती प्राप्त करण्याचा कालावधी16 जुलै, 2024 ते
20 जुलै, 2024
5तक्रार/हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी21 जुलै, 2024 ते
30 जुलै, 2024
6अंतिम यादी प्रकाशन दिनांक01 ऑगष्ट, 2024
7लाभार्थ्याचे बॅके मध्ये E-KYC करणे.10 ऑगष्ट, 2024
8लाभार्थी निधी हस्तांतरण14 ऑगष्ट, 2024
9त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांकप्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत
Majhi Ladki Bahin Yojana

सदर शासन निर्णय दि .28.06.2024 रोजीच्या मा.मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णय नुसार घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in वेबसाईट उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक 202406281814018230 असा आहे.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur