LIC Aadhaar Shila Plan: भारतातील आघाडीची आयुर्विमा कंपनी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ यांच्या योजनांमधील बहुतेक गुंतवणुकीस बाजारातील जोखमीचा सामना करावा लागत नाही. या कारणास्तव लोकांना एलआयसीच्या अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडते. या लेखामध्ये आपण एलआयसीच्या अशाच एका खास योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत, जी योजना विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु केली आहे. या ‘एलआयसी आधार शिला पॉलिसी’ योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करून, दीर्घकाळामध्ये भरघोस असा परतावा मिळवू शकता.
LIC Aadhaar Shila Plan/ एलआयसी आधार शिला पॉलिसी
LIC OF INDIA भारतातील आयुर्विमा ग्राहकांच्या विविध गरजांसाठी अनेक प्रकारच्या योजना बाजारामध्ये आणत असते. याच पद्धतीची ‘आधार शिला योजना’ कमी उत्पन्न असणाऱ्या स्त्रियांच्या गटासाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. ही योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.
LIC Aadhaar Shila Plan ही एक नॉन-लिंक केलेली, वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. या योजनेत मुदतपूर्तीनंतर निश्चित मॅच्युरिटी पेमेंट केले जाते. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान दुर्दैवी परिस्थितीत योजनाधारकाचे निधन झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. या पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर गुंतवणूकदार महिलांना निश्चित रक्कम मिळते तर पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.
आधार शिला योजना पात्रता अटी काय आहेत?
- ही योजना 8 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांसाठी उपलब्ध आहे.
- पॉलिसीची मुदत 10 ते 20 वर्षे आहे.
- किमान विमा रक्कम ₹2,00,000 आणि कमाल विमा रक्कम ₹5,00,000 आहे.
- प्रिमियम वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक पैकी कोणत्याही पद्धतीने भरू शकतो.
- किमान दोन वर्षांचे प्रिमियम भरल्यानंतर ऑटो कव्हरची सुविधा उपलब्ध आहे.
LIC आधार शिला योजन उदाहरण
30 वयाच्या महिलेसाठी, 20 वर्षांच्या कालावधीसाठी आणि ₹5,00,000 विमा रकमेच्या योजनेसाठी मॅच्युरिटी रक्कम अंदाजे काय असेल हे पाहूया. यासाठी आपणास वार्षिक ₹19,156 रुपये प्रीमियम पहिल्या वर्षी भरावा लागेल, ₹18,743 रुपये प्रीमियम दुसरे वर्ष आणि तिथून पुढची वर्षे भरावा लागेल, 20 वर्षाच्या एकूण कालावधीमध्ये मुद्दल स्वरूपात ₹3,75,273 रुपये LIC मध्ये डिपॉजिट होईल, मुदत संपल्यावरती योजनाधारक महिलेस विमा रक्कम आणि बोनस असे एकूण ₹6,62,500 रुपये एवढी एक रकमी रक्कम मिळेल.

LIC आधार शिला योजनेचे फायदे
LIC Aadhaar Shila Plan योजनेचा मुख्य फायदा म्हणजे लाईफ कव्हर. पॉलिसी मुदतीत पॉलिसीधारकाच्या मृत्यू झाल्यास, नामिनीला विमा रक्कम आणि बोनस दिला जाईल, ज्यामुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते त्याचबरोबर अपघाती फायदा रायडर उपलब्ध आहे.
पॉलिसीची मुदत संपल्यानंतर पॉलिसीधारकाला परिपक्वता लाभ मिळतो, विमा रक्कम आणि जमा झालेला रिव्हर्सनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल, ज्यात विमा रक्कम रक्कम आणि जमा झालेला बोनस समाविष्ट असतात. हे भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी मोठी मदत ठरू शकते.
ही योजना रिव्हर्सनरी बोनससाठी पात्र आहे. तसेच, अंतिम अतिरिक्त बोनस देखील परिपक्वता किंवा मृत्यूवर दावा वरती मिळतो, ज्यामुळे एकूण परतावा वाढतो.
पॉलिसीधारक त्यांच्या पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक गरजांच्या वेळी ही सुविधा योजनेची लवचिकता आणि उपयुक्तता वाढवते.
या योजनेअंतर्गत भरलेले प्रिमियम आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीस पात्र आहेत. शिवाय, परिपक्वता रक्कम कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त आहे.
आधार शिला योजना महिलांसाठी त्यांच्या भविष्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि बचतीसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. आकर्षक वैशिष्ट्ये आणि फायदे असलेली ही योजना विश्वासार्ह आणि लाभदायक गुंतवणूक ठरू शकते. आपण आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी किंवा दीर्घकालीन उद्दिष्ट साधण्यासाठी ही योजना निवडून आपल्या आर्थिक पोर्टफोलिओला वाढ देऊ शकता.
या LIC Aadhaar Shila Plan योजनेची बारकाईने माहिती समजून घेतल्यास आणि तिच्या वैशिष्ट्यांचा लाभ घेतल्यास, आपल्या आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठीचा योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. या योजनेच्या अधिक माहिती साठी www.licindia.in ला भेट द्या किंवा आपल्या नजीकच्या शाखा कार्यालयास भेट द्या किंवा तुमच्या विमा प्रतिनिधीशी त्वरीत संपर्क साधून, योग्य ती माहिती घेऊन, योजनेची सुरुवात करा.
Table of Contents