Digital Satbara Mahabhumi: आपला 7/12 उतारा कसा वाचावा? प्रत्येक जमीन मालकाने जाणून घ्याव्यात अशा महत्वाच्या गोष्टी समजून घ्या.

WhatsApp Group Join Now

Digital Satbara Mahabhumi: तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहात काय? किंवा तुमच्या नावावर असलेल्या जमिनीचा 7/12 उतारा कधी नीट पाहिला आहे का? अनेक लोक लाखों रुपयांचे जमीन व्यवहार करतात पण सातबारा उताऱ्यातील काही महत्वाच्या नोंदी समजून घेत नाहीत.

परिणामी मालकी हक्कावरील वाद, लपलेले कर्ज, चुकीच्या नोंदी किंवा फसवणुकीसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आशा पैकी एखाद्या नोंदीकडे दुर्लक्ष झाले तर संपूर्ण जमीन व्यवहार धोक्यात येऊ शकतो.

सातबारा उतारा हा केवळ एक सरकारी कागद नसून जमिनीचा संपूर्ण इतिहास सांगणारा महत्वाचा दस्तऐवज आहे. सर्वेक्षण क्रमांकापासून ते पीक नोंद, बोजा, फेरफार आणि खातेदारची सर्व माहितीपर्यंत अनेक महत्वाच्या गोष्टी त्यात नमूद केलेल्या असतात. मात्र या नोंदीचा नेमका अर्थ काय आहे आणि त्या कशा तपासायच्या, हे फार कमी लोकांना माहीत असते.

म्हणूनच या लेखात 7/12 उताऱ्याचा संपूर्ण उलगडा करून प्रत्येक जमीनमालक, शेतकरी आणि गुंतवणूकदाराने जाणून घ्याव्यात आशा महत्वाच्या गोष्टी, सोप्या भाषेत समजाऊन सांगितल्या आहेत.

सर्वेक्षण नंबर म्हणजे काय?

महाराष्ट्रात अनेक गावामध्ये जुन्या महसुली नोंदीमद्धे ‘भूमापण क्रमांक’ किंवा ‘सर्वेक्षण क्रमांक’ वापरला जात असे. नंतर जमीनिंचे एकत्रीकरण झाल्यानंतर अनेक ठिकाणी ‘गट क्रमांक’ प्रणाली लागू करण्यात आली. त्यामुळे आजच्या ७/१२ उताऱ्यांवर बहुतांश ठिकाणी गट क्रमांक दिसून येतो, तर जुन्या कागदपत्रांमद्धे सर्वेक्षण क्रमांक आढळून येऊ शकतो.

जमीन खरेदी करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ७/१२ उताऱ्यावर नमूद केलेला ‘गट क्रमांक; किंवा ‘सर्वेक्षण क्रमांक’ आणि खरेदी खतामधील क्रमांक हा एकाच आहे का? याची खात्री करणे. जर या क्रमांकामद्धे तफावत आढळली तर भविष्यात मालकी हक्काचे वाद, नोंदीतील चुका किंवा कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

  1. गट नंबर (Gat Number) : जमिनीची ओळख हाच नंबर ७/१२ वर असतो.
  2. भूमापन नंबर, सर्वेक्षण क्रमांक (Survy Number): जुन्या नोंदीतील नंबर

खातेदार नाव म्हणजे काय?

७/१२ उताऱ्यावर नमूद असलेले खातेदाराचे नाव हे त्या जमिनीच्या कायदेशीर मालकीचे सर्वात महत्वाचे प्रमाण मानले जाते. म्हणजेच ही व्यक्ति महसूल नोंदीनुसार त्या जमिनीची मालक मानली जाते. त्यामुळे जमीन खरेदी विक्री, वारसाहक्क, कर्ज प्रक्रिया किंवा इतर कोणत्याही कायदेशीर व्यवहारपूर्वी खातेदाराचे नाव तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

७/१२ उताऱ्यातील कॉलम क्रमांक १ मध्ये जमिनीच्या मूळ किंवा कायदेशीर मालकाचे नाव नोंदवले असते जर जमिनीचे एका पेक्षा जास्त मालक असतील, तर सर्व संबंधित व्यक्तींची नावे, त्यांचा हिस्सा येथे नमूद केलेला असतो.

Also Read:-  Maharashtra HSRP last date: जुन्या वाहनांसाठी सरकारचा मोठा इशारा; महाराष्ट्रात HSRP साठी 30 जून अंतिम मुदत, 1 जुलैपासून होणार कडक कारवाई.

कॉलम २ मध्ये ‘कुळ’ किंवा ‘भोगवटादार’ यांची नोंद असते. म्हणजेच जमीन प्रत्यक्षात कसणारी किंवा वापरणारी व्यक्ती मालका पेक्षा वेगळी असेल तर तिचे नाव इथे दिसून येते.

जर ७/१२ उताऱ्यावर अजूनही, घरातील मृत व्यक्तीचे नाव असेल तर त्याचा अर्थ वारसांची नावे नोंदविण्यासाठी आवश्यक असलेला फेरफार (Mutation Entry) अद्याप झालेली नाही. अशा परिस्थितीत वारसांनी मृत व्यक्तीचा ‘मृत्यू दाखला’ आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या आधारे फेरफार करून नवीन मालकांची नावे नोंदवून घेणे गरजेचे असते.

क्षेत्र रकाना

महाराष्ट्रात जमिनीचे मोजमाप प्रामुख्याने हेक्टर, एकर, गुंठा,चौरस फूट आणि चौरस मीटर या एकाकांमद्धे केले जाते. या एकाकांचे परस्पर संबंध माहीत असल्यास जमिनीचे खरे क्षेत्रफळ समजून घेणे सोपे जाते आणि व्यवहार करताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नाही. आपल्या जमिनीचे मोज माप नीट झाले नसेल तर फसवणूक होऊ शकते त्यासाठी जमिनीचे मोजमाप प्रमाण कसे असते याची माहीती असणे गरजेचे आहे.

महत्वाची जमीन मोजमापे: Digital SatbaraMahabhumi

  1. १ गुंठा – १,०८९ चौरस फुट
  2. १ एकर – ४० गुंठे
  3. १ हेक्टर – २.४७ एकर
  4. १ हेक्टर – १०,००० चौरस मीटर

जमिनीचे मोजमाप आणि क्षेत्रफळ याबाबतची अचूक माहिती असल्यास फसवणूक टाळता येते, जमिनीची योग्य किंमत ठरवता येते आणि भविष्यातील वादही टाळता येतात. त्यामुळे जमीनमालक आणि खरेदीदाराने जमिनीच्या मोजमापाची मूलभूत माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

इतर हक्क रकाना

इतर हक्क रकाना पूर्णपणे रिकामा असेल, तर समान्यत: त्या जमिनीवर कोणताही बोजा, तारण किंवा विशेष हक्क नोंदवलेला नसल्याचे दर्शवते. अशा परिस्थित जमीन व्यवहार तुलनेने सुरक्षित मानला जातो. मात्र तरीही इतर कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असते. परंतु या रकाण्यात बँकेचे कर्ज, तारण, न्यायालयीन आदेश किंवा इतर हक्काच्या नोंदी दिसत असतील तर विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

तसेच न्यायालयीन वाद, स्थगिती आदेश (Stay order) वारसाहक्काचे दावे किंवा इतर कायदेशीर प्रकरणे नमूद करणे असतील तर जमीन खरेदीचा निर्णय तात्पुरता थांबवणे योग्य ठरते. अशा प्रकरणामध्ये न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत व्यवहार करणे धोकादायक ठरू शकते.

पीक नोंद

पीक नोंद ही केवळ पिकांची यादी नसून जमिनीची शेतीयोग्यता, पाण्याची उपलब्धता, उत्पादन क्षमता आणि कर्जपात्रता दर्शवणारा महत्वाचा पुरावा आहे. त्यामुळे ७/१२ उतार पाहताना पीक नोंद तपासणे कधीही विसरू नका.

जर ७/१२ वरती बागायत जमीन म्हणून नोंद असेल तर साधारणपणे त्या जमिनीला सिंचनाची सुविधा किंवा पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याचे मानले जाते. अशा जमीनिंची उत्पादकता जास्त असल्यामुळे त्यांची बाजारातील किंमतही कोरडवाहू जमिणीपेक्षा अधिक असते. त्यामुळे जमीन खरेदी करताना बागायत किंवा जिरायत याची खात्री करण्यासाठी पीक नोंद उपयुक्त ठरते.

Also Read:-  Daughter Rights in Property: मुलीच्या लग्नानंतर तिचा वडिलांच्या मालमत्तेवर हक्क असत्तो? भारतीय कायदा काय सांगतो; जाणून घ्या नियम

७/१२ ऑनलाइन कसा काढायचा?

आजच्या डिजिटल युगात ७/१२ उतारा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय किंवा महसूल कार्यालयात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाइन सुविधेमुळे काही मिनिटात मोबाइल किंवा संगणकावरून ७/१२ उतरा डॉऊनलोड करता येतो. त्यामुळे जमीन मालकी, क्षेत्रफळ, पीक नोंद, बोजा आणि इतर नोंदी सहज तपासता येतात.

७/१२ काढण्यासाठी प्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाभुलेख (Mahbhulekh) पोर्टलवर जावे. तेथे जिल्हा, तालुका आणि गाव निवडून गट क्रमांक किंवा सर्वेक्षण क्रमांक टाकावा. त्यानंतर संबंधित जमिनीचा ७/१२ उतारा स्क्रीनवर दिसतो. हा उतारा पाहता किंवा डॉऊनलोड करता येतो.

ऑनलाइन ७/१२ उतारा काढण्याची प्रक्रिया: Digital Satbara Mahabhumi

  1. महाभूलेख संकेतस्थळाला भेट द्या.
  2. तुमचं विभाग निवडा (पुणे, नाशिक, सांभाजीनगर, कोकण इ.)
  3. जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
  4. गट क्रमांक/सर्वेक्षण क्रमांक किंवा खातेदाराचे नाव टाका.
  5. शोध (search) पर्यायांवर क्लिक करा.
  6. संबंधित जमिनीचा ७/१२ उतारा पहा किंवा डाउनलोड करा.

Digital satbara Mahabhumi ऑनलाइन ७/१२ मिळवण्यासाठी पुढील लंक क्लिक करून शासणाची अधिकृत वेबसाइट ओपन करा. https://bhulekh.mahabhumi.gov.in

ऑनलाइन मिळणाऱ्या ७/१२ उताऱ्यामद्धे जमिनीची मालकी, क्षेत्रफळ, पीक नोंद, बोजा, फेरफार आणि इतर महत्वाची माहिती उपलब्ध असते. जमीन खरेदी-विक्री, बँक कर्ज, वारसाहक्क किंवा इतर महसुली कामांसाठी हा उतारा उपयुक्त ठरतो.

फक्त काही क्लिक मध्ये तुमच्या जमिनीची संपूर्ण माहिती मिळू शकते. त्यामुळे कोणताही जमीन व्यवहार करण्यापूर्वी ७/१२ उतारा ऑनलाइन तपासणे ही चांगली सवय ठरू शकते.

Digital Satbara Mahabhumi

७/१२ उतारा हा केवळ जमिनीचा दस्तऐवज नसून जमिनीची मालकी वापर, पीक नोंद, बोजा आणि कायदेशीर स्थिति दर्शवणारा अत्यंत महत्वाचा पुरावा आहे. जमीन खरेदी-विक्री, वारसहक्क, कर्ज प्रक्रिया किंवा शासकीय योजनांचा लाभ घेताना ७/१२ उताऱ्याची माहिती असणे आवश्यक ठरते. त्यामुळे या दस्तऐवजातील प्रत्येक नोंद समजून घेणे आणि वेळोवेळी त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे.


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading