Shetkari karj mafi 2026: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांचे ₹2 लाख पर्यंतचे कर्ज माफ, नवीन कर्जमाफी योजनेला मंजूरी?

WhatsApp Group Join Now

Shetkari karj mafi 2026: महाराष्ट्रातील लाखों शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पिककर्ज माफ करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, मंत्रिमंडळातील सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत करत त्याला ऐतिहासिक पाऊल असे संबोधले आहे. महाराष्ट्र सरकारने 36,585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजूरी दिली आहे, एकूण 56 लाख शेतकाऱ्याना याचा लाभ होणार आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

या योजनेमद्धे शेतकऱ्यांना तीन प्रकारे लाभ मिळणार आहेत.

  1. कर्जमाफी (debt Relife)
  2. एकरकमी परतफेड योजना (one time settelment – OTS)
  3. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहानपर लाभ.

विशेष म्हणजे, या योजनेसाठी जमिनीच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.

2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना काय फायदा?

ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 2 लाख रुपायपर्यंत आहे, त्यांचे संपूर्ण कर्ज सरकारकडून माफ केले जाईल. त्यामुळे असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होतील. ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी 31 मार्च 2027 पर्यंत 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम भरवायची आहे. त्यानंतरच सरकारकडून त्यांच्या खात्यात 2 लाख रुपये जमा होतील.

उदा: एखाद्या शेतकाऱ्याचे कर्ज 3 लाख असेल तर त्याला 1 लाख रुपये भरावे लागतील. त्यानंतर सरकारकडून 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल.

कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजार प्रोत्साहन

शेतकाऱ्यांनी वेळेवरती कर्जफेड करावी यासाठी प्रोत्साहन म्हणून सरकारने विशेष तरतूद केली आहे. 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षात पिककर्ज घेऊन ते नियोजित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना  ₹50,000 प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल.

Also Read:-  Health Insurance: आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासा, तुमचे पैसे वाचतील आणि तुम्हाला सर्वोत्तम सेवा मिळेल.

कोणते शेतकरी पात्र असतील?

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जावर ही योजना लागू राहील.

30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले कर्ज या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

मूळ रक्कम आणि व्याज मिळून 2 लाख रुपायपर्यंत थकबाकी माफ केली जाईल.

कोणाला लाभ मिळणार नाही?

लोकप्रतीनधी आणि राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे नागरिक, सहकारी संस्थांचे अधिकारी व कर्मचारी (ज्यांचे मासिक वेतन ₹25,000 पेक्षा जास्त आहे.) अशा व्यक्तिना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थीसाठी विशेष तरतूद

2019 मधील Mahatma Jyotirao Phule Farmer Loan Waiver Scheme अंतर्गत लाभ घेतलेल्या आणि त्यानंतर नवीन पिककर्ज थकवलेल्या शेतकऱ्यांनाही या नव्या योजनेत काही अटीनुसार ₹50,000 पर्यंत मदत मिळू शकते.

कर्जमाफीसाठी आवश्यक अटी

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल:

  • आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication)
  • AgriStack प्लॅटफॉर्मवर नोंदणी
  • शासनाने विकसित केलेल्या डिजिटल पोर्टलवर आवश्यक माहिती सादर करणे

कोणत्या बँकांचे कर्ज समाविष्ट असेल?

या योजनेचा लाभ खालील वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जांना लागू असेल:

  • राष्ट्रीयीकृत बँका
  • खासगी बँका
  • प्रादेशिक ग्रामीण बँका
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका
  • प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS)
  • सहकारी संस्थांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेली कृषी कर्जे

योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष समिती

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती विविध बँकांशी चर्चा करून थकीत कृषी कर्जांबाबत सवलतींचा विचार करणार आहे.

Also Read:-  Free Aadhaar Update Child: UIDAI कडून लाखो कुटुंबांना दिलासा! मुलांच्या आधार अपडेटसाठी शुल्क रद्द.

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’च्या तिसऱ्या टप्प्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या योजनेअंतर्गत रस्ते विकासाच्या कामांसाठी Asian Infrastructure Investment Bank (AIIB) कडून 500 दशलक्ष अमेरिकी डॉलर (US$ 500 Million) कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

तसेच राज्यातील रस्त्यांच्या सुधारणा आणि उन्नतीकरणासाठी Asian Infrastructure Investment Bank (AIIB) आणि New Development Bank (NDB) या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ता सुधारणा प्रकल्पासाठी या दोन्ही बँकांकडून प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यातील रस्त्यांचे आधुनिकीकरण, दुरुस्ती आणि नवीन पायाभूत सुविधा विकासाच्या कामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Shetkari Karj Mafi 2026

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ ही महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, एकरकमी परतफेडीची सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना नव्याने आर्थिक उभारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment