Maharashtra rain update: महाराष्ट्रात मान्सूनची दमदार हजेरी! शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा?

WhatsApp Group Join Now

Maharashtra rain update: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून मान्सूनची वाटचाल संथ गतीने होत असल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या होत्या.

अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवरच धूळ पेरणी केली होती, मात्र पाऊस वेळेत न आल्याने बियाणे खराब होण्याची आणि उगवण कमी होण्याची भीती निर्माण झाली होती. आता मात्र, मान्सून ने जोरदार पुनरागमन करत राज्यभर पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन-तीन दिवसापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळण्यास मदत होणार असून, खरीप हंगामातील पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कृषी क्षेत्रासह जलसाठे, पिण्याचे पाणी आणि भूजलपात्रे यांनाही या पावसाचा फायदा होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.

अवघ्या चार दिवसात पावसाची मोठी वाढ

राज्यात २० जून रोजी सरासरी २९.५ मीमी पावसाची नोंद झाली होती, मात्र २४ जून पर्यंत हीच सरासरी ४२.९ मीमी पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच केवळ ९६ तासांच्या कालावधीत राज्यात सरासरी १३.४ मिलिमीटर अतिरिक्त पाऊस झाला आहे. या वाढीमुळे महाराष्ट्रामध्ये हंगामातील सरासरी पावसाच्या सुमारे २५.८ टक्के चा टप्पा गाठला आहे.

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार राज्यातील विविध विभागांमध्ये पावसाचे प्रमाण सातत्याने वाढत असून, आगामी काही दिवसात ही स्थिती आणखी सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या तुटीचा मोठा भाग भरून निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने विदर्भात सह राज्यातील अनेक जिल्ह्यासाठी पुढील २४ ते ७२ तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे २६ ते २८ जून दरम्यान अनेक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आली आहे.

शेतकऱ्यानी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नवीन पेरणी करावी तसेच शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा, बियाण्यांचे संरक्षण आणि खत व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. Maharashtra rain update

Also Read:-  Top 10 Post Office Schemes: जाणून घ्या, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांबद्दल, सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय!

शेतकऱ्यांना मोठा दिलासा: धूळपेरण्या वाचल्या

यंदा पावसाच्या उशिरामुळे, अनेक शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर पिकांची धूळपेरणी केली होती. मात्र पाऊस लांबल्याने बियाण्यांची उगवण होणार का? याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता होती.

आत्ता झालेल्या दमदार पावसामुळे, जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे धूळ पेरण्या वाचण्यास मदत होणार असून पिकांच्या उगवणी साठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. Maharashtra rain update

विदर्भात मान्सूनची धुवाधार एंट्री

अल निनोच्या चर्चांमुळे आणि पावसाच्या विलंबामुळे विदर्भातील शेतकरी सर्वाधिक चिंतेत होते, मात्र २३ जून पासून मान्सूनने विदर्भात जोरदार प्रवेश करत अवघ्या २४ तासात संपूर्ण विभाग व्यापला. बुधवारी बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात सकाळपर्यंत ४०.४ मिलिमीटर पाऊस पडला होता, तर दिवस अखेरीस हा आकडा जवळपास ७० मिलिमीटर पर्यंत पोहोचला. Maharashtra rain update

वर्धा जिल्ह्यात ५९ मिलीमीटर, चंद्रपूर मध्ये ५१.९ मिलिमीटर तर भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सरी कोसळल्या. यवतमाळ जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी २३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आठ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळामध्येही अतिवृष्टी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मराठवाडा विभाग पावसात अव्वल

यंदाच्या हंगामात सर्वाधिक सरासरी पाऊस मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात नोंदवण्यात आला आहे. २० जून रोजी या विभागात ४१.३ मिलिमीटर सरासरी पाऊस होता, तो आता ४७.८ मिलीमीटर पर्यंत वाढला आहे. Maharashtra rain update

या विभागांनी सरासरी ४४.६ टक्के पावसाचा टप्पा गाठला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू झाल्या आहेत. शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर खरीप पेरणीसाठी तयारी करत आहेत.

मुंबईत जूनच्या निम्म्याहून अधिक पाऊस

राजधानी मुंबईतही मानसून ने दमदार हजेरी लावली आहे. हवामान अभ्यासाकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री अकरा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंतच्या अवघ्या पाच तासात जून महिन्याच्या सरासरी पावसाच्या तब्बल ५२% पावसाची नोंद झाली.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम असून, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्येही मुसळधार सरी कोसळत आहेत. याचा सकारात्मक परिणाम धरणांच्या पाणी साठयावर दिसू लागला आहे.

Also Read:-  Ladki Bahin Yojana eKYC: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना e-KYC ची अंतिम तारीख वाढली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय.

नागपूर आणि अमरावती विभागाला मोठा फायदा

पूर्व विदर्भातील नागपूर विभागात गेल्या चार दिवसात पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. येथे सरासरी पाऊस २४.६ मिलीमीटर वरून थेट ३७.३ मिलिमीटर पर्यंत पोहोचला आहे. अमरावती विभागात पावसाची सरासरी १९.१ मिलिमीटर वरून ३१.२ मिलिमीटर पर्यंत वाढले आहे. Maharashtra rain update

कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब मानली जात आहे. पिकांच्या उगवणी साठी आवश्यक ओलावा उपलब्ध झाल्याने उत्पादनाच्या दृष्टी सकारात्मक संकेत मिळत आहेत.

जून अखेर पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता

मान्सूनपूर्व पावसाने दांडी मारल्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात ५० ते ८०% पर्यंत पावसाची तूट निर्माण झाली होती, मात्र गेल्या काही दिवसात मान्सून सक्रिय झाल्यामुळे ही तूट मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. Maharashtra rain update

जून महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जुलै च्या सुरुवातीचा कालावधीत राज्यात अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, या काळात चांगला पाऊस झाल्यास, खरीप हंगाम अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra rain update

उशिरा का होईना पण मान्सून आता पूर्ण ताकतीने सक्रिय झाला आहे. त्यामुळे रखडलेल्या पेरण्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. धूळपेरणी वाचल्याने शेतकऱ्यांशी संबंध येणार असून, खरीप हंगामाला नव संजीवनी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

राज्यभर पडत असलेल्या या पावसामुळे शेती, पाणीपुरवठा, धरण साठा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला असून, आगामी काही दिवसातील पावसाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading