Ayushman bharat card benifits: आयुषमान भारत कार्डचे मोठे फायदे! कोणते आजार आणि उपचार मोफत मिळतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

WhatsApp Group Join Now

Ayushman bharat card benifits: देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंब यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र सरकारने आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. ही भारतातील सर्वात मोठ्या सरकारी आरोग्य विमा योजनपैकी एक असून पात्र लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण दिले जाते.

अनेक नगरिकांकडे आयुषमान कार्ड असेल तर या योजनेअंतर्गत नेमके कोणते आजार, शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत मिळतात याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात जाण्यापूर्वी योजनेचा लाभ आणि मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे.

आयुषमान भारत योजनेसाठी कोण पात्र आहे?

आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(PM-JAY) ही आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ खालील पात्र लाभार्थी यांना मिळतो.

पात्र लाभार्थी: Ayushman bharat card benifits

  1. सामाजिक आर्थिक व जात जनगणना (SECC) 2011 मध्ये नोंद असलेली कमी उत्पन्न असलेली कुटुंबे.
  2. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील पात्र कुटुंबे.
  3. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे, जसे की भूमिहीन मंजूर, रोजनदारी करणारे कामगार आणि कच्या घरामध्ये राहणारी कुटुंबे.
  4. शहरी गरीब कुटुंबे ज्यामध्ये कचरा वेचणारे, फेरीवाले, घरकाम करणारे, स्वच्छता कर्मचारी आणि SECC मध्ये नमूद केलेल्या इतर पात्र श्रेणीच्या समावेश होतो.
  5. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना (RSBY) आणि इतर सरकारी कल्याणकारी योजनांचे विद्यमान लाभार्थी आपोआप या योजनेत समाविष्ट केले जातात.

महत्त्वाच्या अटी व फायदे: Ayushman bharat card benifits

  1. प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपायपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जाते.
  2. हा लाभ रुग्णालयात दाखल होऊन कराव्या लागणाऱ्या दुय्यम आणि तृतीय उपचारांसाठी लागू असतो.
  3. लभार्थीनी वैध आयुषमान कार्डच्या आधारे आणि योजनेशी संलग्न रुग्णालयामद्धे कॅशलेस उपचार मिळतात.
  4. देशभरातील नोंदनिकृत सरकारी व खासगी रुग्णालयामद्धे उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

आयुषमान भारत योजनेत काय कव्हर होते.

PM-JAY योजनेचा मुख्य उद्देश रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च कमी करणे हा आहे. त्यामुळे रुग्णालयात भारती होऊन कराव्या लागणाऱ्या उपचारांचा खर्च या योजनेत समाविष्ट आहे. यामध्ये (Ayushman bharat card benifits) सामन्यात: खालील खर्च समाविष्ट आहे.

रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च, शास्त्रक्रियेचा खर्च, डॉक्टरांचे शुल्क, नर्सिंग आणि देखभाल खर्च, उपचारदारम्यान दिली जाणारी औषधे, आवश्यक वैदकीय तपासण्या, पॅकेज नुसार पूर्व आणि पश्चात उपचार खर्च. पात्र लाभार्थी देशभरातील नोंदनिकृत सरकारी आणि खासगी रुग्णालयामद्धे कॅशलेस उपचार मिळू शकतात.

Also Read:-  PM Kisan Samman Nidhi: हप्ता उशीर का? शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढतोय; 19व्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी सोपी प्रक्रिया.

ह्रदयविकारांवरील उपचारही मोफत

ह्रदयविकारांवरील उपचारांचा खर्च अनेकदा लाखों रुपयापर्यंत जातो. त्यामुळे आयुषमान भारत योजना या बाबतीत मोठा दिलासा देते. योजनेतील खालील ह्रदयाविकर उपचारांचा समावेश आहे.

ह्रदयविकार झटका (हार्ट अटॅक) उपचार, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, गंभीर ह्रदयाविकर उपचार, उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या ह्रदयाशी संबंधित गुंतागुंतीचे उपचार.

कर्करोग उपचारासाठी मोठी मदत

कर्करोगाचे उपचार सामान्य कुटुंबासाठी आर्थिकदृष्ट्या मोठे आव्हान असतात. आयुषमान भारत योजने अंतर्गत अनेक प्रकारच्या कर्करोग उपचारांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये.

केमोथेरपी, रेडियएशन थेरपी, कर्करोग शस्त्रक्रिया, स्तन कर्करोग उपचार, फुप्फुसाच्या कर्करोगावरील उपचार, तोंडाचे कर्करोग उपचार, पंचनसंस्था संबंधित कर्करोग उपचार यासारख्या विविध उपचारांचा लाभ मिळू शकतो.

मेंदू आणि मज्जासंस्था विकारांवरील उपचार

न्यूरोलॉजीकल आजारावरील उपचारही या योजनेत समाविष्ट आहेत, गंभीर मेंदू विकरांवरील मोठा खर्च येतो, परंतु आयुषमान कार्डधारकांना याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये खालील आजार समाविष्ट आहेत.

ब्रेन स्ट्रोक, ब्रेन ट्यूमर, पार्किन्सन्स रोग, एपीलेप्सी (अपस्मार) काही न्यूरोसर्जरी उपचार.

किडनी आणि यकृत आजार लाभ

किडनी आणि लिव्हरच्या गंभीर आजार संबंधित योजनासाठी आर्थिक मदत देते, यामध्ये डायलेसिस सेवा, दीर्घकालीन किडनी विकार उपचार, लोवहार सिरोसिस, हिपॅटायटीस बी उपचार, हिपॅटायटीस सी उपचार, किडनी आणि लिव्हरच्या काही शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.

हाडे आणि सांधे उपचार

वृद्ध व्यक्तिना तसेच अपघातग्रस्त रुग्णांना या योजनेचा मोठा फायदा होतो, यामध्ये फ्रॅक्चर उपचार, हिप रिपलेसमेंट, गुडघा प्रत्यारोपण, विविध अरथोपेडईक ओरथोपेडिक शस्त्रक्रिया, गंभीर संधिवात उपचार यांचा समावेश होतो.

माता आणि बाल आरोग्य सेवा

महिला आणि बालक यांच्यासाठी आयुषमान भारत योजना महत्वाची आहे. यामध्ये सामान्य प्रसूती, सिझेरियन डिलिव्हरी, नवजात बालक अतिदक्षता दक्षता सेवा, गंभीर बालरोग उपचार, नवजात शिशु आरोग्य सेवा यांचा समावेश आहे.

कोणते उपचार योजनेत समाविष्ट नाहीत

आयुषमान भारत योजनेत अनेक महत्वाचे उपचार समाविष्ट असले तरी काही सेवा या योजनेच्या बाहेर आहेत. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी आरोग्य खर्चाचा मोठा भार कमी करणारी महत्वाची योजना आहे. पात्र लाभार्थीना लाखों रुपयांच्या उपचारांचा लाभ पूर्णपणे कॅशलेस पद्धतीने मिळू शकतो. सामन्यात: खालील उपचारांचा खर्च स्वत: करावा लागतो.

OPD तपासणी, नियमित डॉक्टर भेट, सामान्य आरोग्य तपासणी, कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरी, IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी उपचार, नियमित दंत उपचार, विटामीन आणि सपलीमेन्टस, काही व्यसनमुक्ती उपचार, रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसलेले किरकोळ आजार इ. साठी

Also Read:-  How to lock Aadhaar card: आधार कार्ड लॉक आणि अनलॉक कसे करावे? लॉक करण्याचे महत्त्व आणि गरज.

उपचार कुठे मिळतात?

आयुषमान कार्डचा लाभ फक्त योजनेअंतर्गत नोंदनिकृत रुग्णालयामध्येच मिळतो. त्यामुळे उपचार घेण्यापूर्वी संबंधित रुग्णालय PM-JAY नेटवर्कमध्ये आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. हा लाभ घेण्यासाठी आयुषमान कार्ड, आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र इ. कागदपत्रे जवळ ठेवावीत.

देशभरात 36,000 हून अधिक रुग्णालयांचा समावेश

सध्या देशभरात 36,000 पेक्षा अधिक सरकारी आणि खासगी रुग्णालये आयुषमान भारत योजनेशी जोडली गेली आहेत. त्यामुळे लाभार्थी आपल्या राज्याबाहेर उपचार घेऊ शकतात.

उपलब्ध रुग्णालयाचे प्रकार: Ayushman bharat card benifits

सरकारी रुग्णालये : जिल्हा रुग्णालये, वैदकीय महाविद्यालये, विविध सार्वजनिक आरोग्य संस्था.

खाजगी रुग्णालये : मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटि हॉस्पिटल, प्रगत शस्त्रक्रिया सुविधा असलेली रुग्णालये.

ट्रस्ट व धर्मादाय रुग्णालये : PM-JAY मान्यता प्राप्त सेवाभावी संस्था.

जवळचे आयुषमान रुग्णालय कसे शोधल?

तुमच्या परिसरातील आयुषमान भारत योजनेअंतर्गत नोंदनिकृत रुग्णालय शोधण्यासाठी PM-JAY च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, Find Hospital पर्याय निवडा, राज्य, जिल्हा, आणि रुग्णालायचा प्रकार निवडा. उपलब्ध रुग्णालयाची यादी पहा.

यादी पाहण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा – https://beneficiary.nha.gov.in

याशिवाय 14555 किंवा 1800-11-4477 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधूनही माहिती मिळवता येते.

Ayushman bharat card benefits

आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही देशातील कोट्यवधी कुटुंबासाठी आरोग्य सुरक्षेचे महत्वपूर्ण कवच ठरत आहे. विविध प्रकारच्या महागड्या उपचरांसाठी दरवर्षी 5 लाख रुपायपर्यंतचे संरक्षण मिळत असल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाणा मोठा आर्थिक दिलासा मिळतो.


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading