PM-SYM Pension Scheme: दरमहा गुंतवा ₹५५ आणि ६० वयानंतर मिळवा ₹३००० महिना! केंद्र सरकारची गॅरेंटेड पेन्शन योजना, जाणून घ्या काय आहे?

WhatsApp Group Join Now

PM-SYM Pension Scheme: वृद्धपकाळात नियमित उत्पन्नाची सोय असावी, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, शेतमजुर, लहान शेतकरी, एमआयडीसी वर्कर्स यांच्याकडे निवृत्तीनंतर आर्थिक आधार नसतो.

ही गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने “प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन” (PMSYM) ही पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेत अगदी महिन्याला फक्त ₹५५ पासून गुंतवणूक करून, वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ₹३००० गॅरंटेड पेन्शन मिळवता येते. विशेष म्हणजे तुम्ही जितके पैसे जमा करता तितकेच पैसे केंद्र सरकारही तुमच्या खात्यात जमा करते.

PM-SYM योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन (PM-SYM) ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारची स्वैच्छिक पेन्शन योजना आहे. या योजनेचा उद्देश, वृद्ध काळात आर्थिक सुरक्षितता देणे हा आहे. या योजनेत नियमित मासिक योगदान केल्यानंतर, साठ वर्षे पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याला दरमहा किमान ₹३००० पेन्शन दिली जाते.

कोण अर्ज करू शकतो?

या योजनेसाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे

  • अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे
  • मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असावे

असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजूर, लहान शेतकरी, एमआयडीसी वर्कर्स किंवा लहान आणि सीमांत शेतकरी, पळविक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार, घरकामगार, चालक, प्लंबर, धोबी, बिडी कामगार, हातमाग आणि यंत्रमाग कामगार, मध्यान्ह भोजन योजनेतील कामगार, इतर रोजंदारीवर काम करणारे इतर पात्र व्यक्ती अर्ज करू शकतात.

मासिक हप्ता किती भरावा लागतो

योजनेत भरावयाचे मासिक योगदान प्रवेशाच्या वयानुसार ठरते. जितक्या कमी वयात योजना सुरू कराल तितका मासिक हप्ता कमी असेल. वय वाढेल तसा मासिक हप्ता वाढतो.

प्रवेशाच्या वेळी वय आणि मासिक अंशदान

१८ वर्षे ₹५५
१९ वर्षे ₹५८
२० वर्षे ₹६१
२१ वर्षे ₹६४
२२ वर्षे ₹६८
२३ वर्षे ₹७२
२४ वर्षे ₹७६
२५ वर्षे ₹८०
२६ वर्षे ₹८५
२७ वर्षे ₹९०
२८ वर्षे ₹९५
२९ वर्षे ₹१००
३० वर्षे ₹१०५
३१ वर्षे ₹११०
३२ वर्षे ₹१२०
३३ वर्षे ₹१३०
३४ वर्षे ₹१४०
३५ वर्षे ₹१५०
३६ वर्षे ₹१६०
३७ वर्षे ₹१७०
३८ वर्षे ₹१८०
३९ वर्षे ₹१९०
४० वर्षे ₹२००

Also Read:-  Gratuity Rules in India: सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार रिटायरमेंटवर बंपर ग्रेच्युटी? जाणून घ्या; नवीन सरकारी नियम काय आहेत.

सरकारही करते तितकेच योगदान

PM-SYM ही एक सहभागी (Co-contribute) योजना आहे. यामध्ये लाभार्थी जितके पैसे भरतो, तितकेच पैसे केंद्र सरकार ही जमा करते. यामुळे पेन्शन साठी आवश्यक निधी तयार होण्यास मदत होते.

६० वर्षानंतर मिळते ₹३००० मासिक पेन्शन

या योजनेत नियमित योगदान देत राहिल्यास, साठ वर्षे पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याला दरमहा किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळते. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

कुटुंबालाही मिळतो लाभ

PM-SYM योजनेत कुटुंबासाठी ही संरक्षणाची तरतूद आहे

  • सदस्याचा साठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर, त्याच्या जोडीदार उर्वरित हप्ते भरून, योजना सुरू ठेवू शकतो आणि नंतर पेन्शनचा लाभ घेऊ शकतो.
  • सदस्याचा पेन्शन सुरू झाल्यानंतर मृत्यू झाल्यास पती किंवा पत्नीला मासिक पेन्शनच्या ५०% रक्कम कौटुंबिक पेन्शन म्हणून मिळते.

मधेच योजना बंद केल्यास काय

काही कारणास्तव योजना सोडायची असल्यास किंवा बंद करायची असल्यास पुढील प्रमाणे नियम आहेत.

  1. दहा वर्षांपूर्वी योजना सोडल्यास, भरलेली रक्कम आणि बचत खात्याच्या व्याजदरानुसार, व्याज परत मिळते.
  2. दहा वर्षानंतर पण साठ वर्षांपूर्वी योजना बंद केल्यास, भरलेली रक्कम आणि योजनेनुसार लागू असलेले व्याज परत दिले जाते.
  3. काही हप्ते भरायचे राहिले तर थकबाकी आणि व्याज भरून योजना पुन्हा सुरू करता येते.

या योजनेसाठी कोण पात्र नाही

पुढील व्यक्तींना पीएमएस लाभ मिळणार नाही, EPFO चे सदस्य, ESIC चे सदस्य, NPS चे सदस्य, आयकर भरणारे नागरिक.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना, आधार कार्ड, बचत बँक खाते किंवा जनधन खाते, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्र आवश्यक आहेत.

अर्ज कसा करावा

पीएमएस साठी अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करा.

  1. जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) ला भेट द्या
  2. आधार कार्ड सादर करा बँक किंवा जनधन खात्याची माहिती द्या
  3. मोबाईल क्रमांक नोंदवा
  4. पहिला मासिक हप्ता भरा
  5. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला श्रम योगि कार्ड दिले जाते.
Also Read:-  MahaDBT tractor subsidy: कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठं अनुदान; पहा संपूर्ण माहिती.

हेल्पलाइन क्रमांक: योजनेबाबत अधिक माहितीसाठी सरकारचा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक: 1800-267-6888

PM-SYM योजना का महत्त्वाची आहे?

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, लाखो कामगार आणि शेतमजुरांसाठी ही योजना वृद्ध काळातील आर्थिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार ठरू शकते. अगदी कमी मासिक योगदान, सरकारकडून तितकीच आर्थिक मदत आणि साठ वर्षानंतर मिळणारी गॅरेंटेड पेन्शन योजना, यामुळे ही योजना भविष्य साठी फायदेशीर पर्याय मानली जाते.

PM-SYM Pension Scheme

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही कमी उत्पन्न असलेल्या असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त पेन्शन योजना आहे. महिन्याला केवळ रुपये ५५ पासून सुरू होणाऱ्या या योजनेत, सरकार ही समान योगदान देते. वयाच्या ६० वर्षानंतर दरमहा रुपये ३००० हमी पेन्शन मिळते. भविष्यातील आर्थिक सुरक्षित सुरक्षिततेसाठी पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करावा.

टीप– हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. योजनेचे नियम, पात्रता, योगदानाची रक्कम वेळोवेळी केंद्र सरकारकडून बदलली जाऊ शकते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PM-SYM संकेतस्थळ किंवा जवळच्या सीएससी केंद्र येथे अद्ययावत माहिती तपासावी.


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading