PM Kisan Samman Nidhi Yojana: नविन सरकार कडून शेतकर्‍यांना मोठी भेट, 17 वा हप्ता जाहीर.

PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ चा रुपये 2000 चा 17 व्या हप्ता संदर्भात मोठी घोषणा झाली असून, हा हप्ता 18 जून 2024 ला भारतातील लाभार्थी शेतकर्‍यांच्या सेविंग बँक अकाउंट वरती जमा होईल. आपल्या मोबाईल द्वारे तुम्ही या निधीचा स्टेटस चेक करू शकता.

10 जून ला हा आदेश केंद्र सरकारकडून दिला असून, दोन हजार रुपये चा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट वर्ग केला जाईल. केंद्रीय किसान कल्याण मंत्री, नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले हा 17 वा हप्ता भारतातील शेतकऱ्यांना मान्सून मध्ये आर्थिक मदत करेल आणि आपल्या शेतीच्या नांगरणी, पेरणी आणि इतर कामासाठी मदत होईल.

PM Kisan Sanman Nidhi
PM Kisan Sanman Nidhi

आमच्या माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना एक मोठी भेट देत, पीएम किसान सन्मान निधी योजना चा 17 वा हप्ता जाहीर केला आहे. हा निर्णय मोदी सरकारच्या नवीन कार्य काळाच्या पहिल्या दिवशीच घेण्यात आला आणि देशभरातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

नविन सरकार कडून शेतकर्‍यांना मोठी भेट 17 वा हप्ता जाहीर

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊनच हा सतरावा हप्ता काही काळासाठी आचारसंहितेच्या कारणामुळे लांबवला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जाहीर केला. या योजनेअंतर्गत 20,000 करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट दिले गेले आहेत. देशभरातील 9.3 करोड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल.

PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana च्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये केंद्र शासनाकडून दिले जातात. हा निधी दोन हजार रुपयांच्या टप्प्यामध्ये वर्षातून तीन वेळा दिला जातो. ही योजना 2018 मध्ये सुरू सुरू केली होती आणि त्याचा एकमेव उद्देश असा होता की देशभरातील छोटे आणि कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी मदत करणे.

PM Kisan Samman Nidhi Yojana योजना स्टेटस चेक करण्याचे प्रोसेस

या योजनेची स्टेटस चेक करण्याची प्रोसेस पुढील प्रमाणे आहे. सर्वात अगोदर लाभार्थी शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधी च्या अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ वर जावं लागेल. या वेबसाईटची लिंक लेखाच्या सर्वात शेवटी आम्ही दिली आहे.

अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर आपणास किसान कॉर्नर हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा

त्यानंतर आपणास आपली स्थिती पहा हा ऑप्शन दिसेल त्यावर ती क्लिक करावे लागेल त्याच्या नंतर तुमचा आधार नंबर किंवा रजिस्टर नंबर टाकावा लागेल हे सर्व झाल्यानंतर सर्च बटन वरती क्लिक करा

ही सर्व प्रोसेस केल्यानंतर आपणाला स्क्रीन वरती स्वतःचा स्टेटस दिसेल आणि त्याचबरोबर हप्ता संदर्भात इतर माहिती सुद्धा मिळेल

अधिक माहिती साठी या लिंक ला क्लीक करा https://pmkisan.gov.in

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now