Aadhar Card Download: आधार कार्ड डाऊनलोड करा पूर्णपणे मोफत, अशा प्रकारे फक्त 2 मिनिटात.

Aadhar Card Download: भारतातील कोणत्याही व्यक्तीला, मोबाईलचा वापर करून, दोन मिनिटाच्या कालावधीत घरबसल्या स्वतःचे व कुटुंबातील इतर व्यक्तींचे आधार कार्ड डाउनलोड करता येऊ शकते. ही खूपच सोपी अशी प्रक्रिया आहे. आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे ही प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. खाली दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन केल्यास तुम्हाला आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी मदत होईल. त्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा. आपले स्वतःचे व त्याचबरोबर आपल्या इतर नातेवाईकांचे सुद्धा आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी त्यांना मदत करा.

आजच्या डिजिटल युगामध्ये भारतासारख्या देशात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज बनले आहे. आधार कार्ड हे केवळ ओळखीचा पुरावा नाही, तर विविध सरकारी आणि गैरसरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असे डॉक्युमेंट आहे. यामध्ये व्यक्तीचे नाव पत्ता जन्मतारीख, पत्ता, बायोमेट्रिक डेटा यासारखे महत्त्वाचे तपशील असतात ज्यामुळे आधार कार्ड हे एक विश्वसनीय ओळखपत्र  बनले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना, जन धन योजना आणि अटल पेन्शन योजना यासारख्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकजण आधार कार्ड वापरतो. अशा पद्धतीच्या सर्व योजनांसाठी तसेच बँकेतील व्यवहार, शाळा, कॉलेज, स्पर्धा परीक्षा, शेतीच्या कामासाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते.  

Aadhar Card Download
Aadhar Card Download

केंद्र आणि राज्य शासनाने, मुलांच्या शाळा मध्ये प्रवेशासाठी सुद्धा आधार कार्ड हे बंधनकारक केले असल्यामुळे अगदीच लहान वयामध्ये मुलांचे आधार कार्ड काढणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळेला काढलेले आधार कार्ड आपल्या कामासाठी लगेच मिळतं असं नाही. काही कारणाने ते गहाळ होते, अनेक वेळी आपण दस्तऐवज कुठे ठेवतो हे लक्षात नसतं, त्यामुळे विनाकारण अडचणी येतात.

आता या सर्व गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही, कारण तुम्ही तुमचे आधार कार्ड केव्हाही आहे आणि कधीही फक्त दोन मिनिटांमध्ये घरी बसून डाऊनलोड करू शकता आणि ते तुमच्या योग्य कामासाठी वापरू शकता.

जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल किंवा गहाळ झाले असेल किंवा फाटले असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही कारण, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDIA) तुम्हाला तुमचे आधार कार्ड मोफत डाऊनलोड करण्याचे सुविधा देत आहे.

Aadhar Card Download करण्याची सोपी प्रक्रिया

तुमचे Aadhar Card Download करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDIA अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल ज्याची लिंक या लेखाच्या खाली, सर्वात शेवटी दिलेली आहे.

अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ‘माय आधार’ या बटनावरती क्लिक करावं लागेल.

त्यानंतर आधार कार्ड डाउनलोड करा हा पर्याय निवडावा लागेल.

हे केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा 16 अंकी UID क्रमांक टाईप करा त्यानंतर अर्जदाराचे नाव आणि जन्मतारीख टाईप करा

हे केल्यानंतर स्क्रीन वरती दिसणारा सिक्युरिटी कोड कॅपच्या भरा.

त्यानंतर समोरील ‘GET OTP’ या बटनावरती क्लिक करा.

थोड्याच वेळा नंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी स्क्रीन वरती टाईप करा आणि क्लिक करा.

तुम्ही क्लिक करताच तुमच्या आधार कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल. हे आधार कार्ड PDF किंवा JPG या दोन्हीपैकी कोणत्याही एका स्वरूपात डाउनलोड करू शकता.

आधार कार्ड डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागणार नाही आणि असे तुम्ही कितीही वेळा करू शकता.

आपले Aadhar Card Download करण्यासाठी समोरील लिंक ला क्लिक करा https://uidai.gov.in/en/about-uidai.html

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now