7kw Solar Panel System: सोलर पॅनेल बसवा, विजेच्या खर्चातून दिलासा मिळवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

7kw Solar Panel System: सध्याचे वाढणारे विजेचे दर आणि उर्जा समस्यांच्या काळात, आपल्या दैनंदिन उपयोगासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे ही सर्वोत्तम पर्यायी उपाययोजना ठरत आहे. आपल्या घराच्या छातावरती 7kW सोलर पॅनेल बसवून तुम्ही विजेच्या खर्चात मोठी बचत करू शकता परंतु, हे पॅनेल बसवण्याआधी काही तपशील समजून घेणे गरजेचे आहे.

सोलर पॅनेल्स सिस्टिम वापरात वाढ झाल्यामुळे, 7 किलोवॅट सोलर पॅनेल सिस्टिम ही घरे, छोटे व्यवसाय आणि कृषी कामासाठी एक उत्कृष्ट पर्यायी उपाययोजना ठरली आहे. त्यासोबतच भारत सरकारच्या विविध सबसिडी योजनांमुळे सौर उर्जेवर आधारित सिस्टिमची खरेदी करणे सुलभ झाले आहे. या लेखात आपण 7 किलोवॅट सोलर पॅनेल सिस्टमचे फायदे, त्याची किंमत, खर्च, सरकारचे अनुदान आणि इंस्टॉलेशन प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा व इतरांना शेअर करा.

7kw Solar Panel System म्हणजे काय?

7 किलोवॅट सोलर पॅनेल सिस्टम म्हणजे एक अशा प्रकारची सोलर सिस्टम आहे, जी दररोज सरासरी 28 ते 35 युनिट्स पर्यंत वीजनिर्मिती करू शकते. ही सिस्टम घरगुती, व्यावसायिक आणि कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. 7 किलोवॅट वीज निर्माण करणारी ही प्रणाली घरी वापरता येणारी प्रणाली असून रोजच्या विजेच्या खर्चात मोठा दिलासा देणारी आहे.

7kW सोलर सिस्टीम कधी योग्य ठरते?

तुमच्या संपूर्ण घरातील विजेची गरज सुमारे 35 युनिट प्रतिदिन असेल, तर 7kW सिस्टीम योग्य ठरू शकते. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे एसी, वॉटर हीटर, फ्रीज वॉशिंग मशीन सारखी अत्याधुनिक आणि जास्त वीज ग्रहण करणारी उपकरणे असतील, तर 7kW सोलर पॅनेल सिस्टीम बसवणे योग्य ठरते.

7KW सोलर सिस्टीमचे प्रकार

1. पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनेल

पॉलीक्रिस्टलाइन पॅनेल सुमारे ₹2,10,000 किमतीत उपलब्ध असतात. हे पॅनेल अनेक क्रिस्टल्सपासून बनलेले असून, उत्कृष्ट ऊर्जा उत्पादन क्षमता देते.

2. मोनोक्रिस्टलाइन सोलर पॅनेल

मोनोक्रिस्टलाइन पॅनेल साधारणत ₹2,50,000 किमतीत मिळतात. उच्च ऊर्जा उत्पादकता आणि कमी स्पेसमध्ये फायद्याचे असतात.

7kw Solar Panel System
7kw Solar Panel System

3. बायफेशियल सोलर पॅनेल

बायफेशियल सोलर पॅनेल सुमारे ₹3,00,000 किमतीत असतात. हे पॅनेल दोन्ही बाजूंनी सूर्यप्रकाशाचा वापर करतात, ज्यामुळे वीज निर्मिती वाढते.

सोलर पॅनेल इंस्टॉलेशनचे फायदे

7kw Solar Panel System इन्स्टॉलेशनमुळे वीज बिलात मोठी बचत होते. सुरुवातीला जरी पॅनलची किंमत जास्त असली तरी दीर्घकालात मोठा आर्थिक फायदा होतो. साधारण पाने 20 ते 25 वर्ष काही खर्च नसतो, सौर ऊर्जा वापरून तुम्ही पर्यावरण संरक्षणात योगदान देऊ शकता. त्यासचसोबत वीज निर्मिती खर्चात बचत होते पर्यावरणपूरक सामग्रीमउळे निसर्गास कोणतीही हानी पोहचत नाही. सोबत सरकारी अनुदानाची सुविधा उपलब्ध आहेत.

सबसिडी माहिती: भारत सरकारची सौर ऊर्जा सबसिडी

भारत सरकारची सौर ऊर्जा धोरण अंतर्गत विविध सबसिडी योजना उपलब्ध आहेत. उदा. सौर कुटीर योजना अंतर्गत घरगुती वापरासाठी 30% अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सबसिडी ऑन-ग्रिड सिस्टीमवर ₹78,000 पर्यंत सबसिडी मिळते. सब्सिडिचे विविध प्रकार आहेत त्यासाठी भारत सरकारची अधिकृत वेबसाईट https://mnre.gov.in/ ला भेट द्या

ऑन-ग्रिड व ऑफ-ग्रिड सिस्टीम – कोणती निवडावी?

1. ऑन-ग्रिड सिस्टीम

  • ग्रीडशी जोडलेले, त्यामुळे जास्तीत जास्त वीज निर्मिती.
  • नेट-मीटरिंगच्या मदतीने तुम्ही जास्त वीज ग्रीडला विकू शकता.

2. ऑफ-ग्रिड सिस्टीम

  • बॅटरीसह कार्यरत, ज्यामुळे सौर ऊर्जा संध्याकाळीही उपलब्ध.
  • ऑफ-ग्रिड सोलर सिस्टीमवरील अधिक माहिती यावर उपलब्ध आहे.

7kW सोलर सिस्टीमचा खर्च व परतावा

भारत सरकारच्या MNRE (Ministry of New and Renewable Energy) विभागाच्या नवीनतम माहितीनुसार, सोलर पॅनेल्सच्या किंमती कमी झालेल्या आहेत. सामान्यतः 7 किलोवॅट सोलर पॅनेल सिस्टमसाठी सुमारे ₹3 ते ₹4 लाख इतका खर्च अपेक्षित आहे, परंतु सबसिडी मिळाल्यानंतर ही किंमत कमी होते. साधारणतः 3-4 वर्षांत तुम्ही गुंतवणूक परत मिळवू शकता, त्यानंतर वीज मोफत.

सोलर पॅनेल देखभाल

  1. धूळ साफसफाई: सोलर पॅनेल स्वच्छ ठेवल्यास ऊर्जा उत्पादकता चांगली राहते.
  2. नियमित तपासणी: तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.
7kw Solar Panel System
7kw Solar Panel System

7kW सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन प्रक्रिया

  1. ठिकाण ठरवणे: पॅनेल उंच ठिकाणी आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ठेवा.
  2. तज्ज्ञांचा सल्ला: विश्वासार्ह व अधिकृत विक्रेत्यांची मदत घ्या.
  3. सौर पॅनेल्स: अंदाजे 200 ते 300 चौरस फूट जागा लागते.
  4. इन्व्हर्टर आणि बॅटरी: चांगल्या प्रतीचा इन्व्हर्टर निवडा.

निष्कर्ष: 7kw Solar Panel System

सौर ऊर्जेचा वापर हे भविष्यातील सुरक्षिततेचे पाऊल आहे. सौर ऊर्जेमुळे तुम्ही वीज बिलात बचत करू शकता, पर्यावरणाचे रक्षण करू शकता. तुम्ही तुमच्या घराच्या विजेच्या आवश्यकतेनुसार सोलर सिस्टीम निवडून, कुटुंबासाठी सतत ऊर्जा पुरवठा मिळवू शकता. 7 किलोवॅट सोलर पॅनेल सिस्टिम म्हणजे घरे, शेतकरी आणि छोटे व्यवसाय यांच्यासाठी खर्चात बचत करणारा उत्तम पर्याय आहे. सरकारच्या अनुदानामुळे हा खर्च आणखी कमी होऊ शकतो. त्यासाठी आजच सोलर पपँनेल सिस्टीम आपल्या घराच्या छतावरती बसवून घ्या.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us