Ekyc ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेचे 4 हप्ते अडकले? 31 मार्चपूर्वी e-KYC करा नाहीतर पैसे थांबतील!

WhatsApp Group Join Now

Ekyc ladki bahin yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सारकरद्वारे सुरू केलेली एक अत्यंत उपयुक्त आर्थिक सहायता कार्यक्रम आहे. या योजने मधून महाराष्ट्रातील गरजू महिलांना, दर महिन्याला रु 1,500 चे अनुदान दिले जाते.

ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आणि कुटुंब खर्चामध्ये मोठा आधार मिळतो. पण मागील काही महिन्यांपासून अनेक महिलांना त्यांच्या खात्यात हे महत्त्वाचे हप्ते जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक बेनिफिशरी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हप्ते का अडकले? मुख्य कारण

महिला आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर, जानेवारी महिन्यासहित अनेक महिला लाभार्थींच्या खात्यात अद्याप हप्ते जमा झालेली नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे इ केवायसी (ekyc). या प्रक्रियेत झालेल्या अनेक चुका किंवा तांत्रिक अडचणी आहेत.

काही महिलांनी ई केवायसी करताना योग्य प्रकारे पूर्ण केली नाही. ज्यानी ऑफलाइन दस्तऐवज अपलोड केले होते त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. आधार कार्ड किंवा बँक खाते माहितीतील विसंगतीमुळे केवायसी व्हेरिफिकेशन अपूर्ण राहिली आहे. सर्वर वरील तांत्रिक दोषामुळे ekyc लिंक अपलोड किंवा सबमिट होत नाहीये.

या सर्व अडचणीमुळे लाभार्थींच्या आर्थिक मदतीच्या हप्त्यांची प्रक्रिया अडकून पडली आहे आणि त्यामुळे महिला लाभार्थ्यांचे महत्त्वाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत.

रखडलेले हप्ते मिळण्याची शक्यता

महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतरित्या सांगण्यात येत आहे, की रखडलेले हप्ते लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खाते दिली जाईल. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे हप्ते डिसेंबर पासून मिळाले नाहीत त्यांना चार महिन्याचे हप्ते एकदम दिले जातील.

हा लेख वाचा-  Vihir Anudan Yojana: उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी अनुदान! विहिरीचे काम करा आणि फायदा मिळवा!

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे एकूण रक्कम 6,000 म्हणजे, प्रति महिना 1,500 एकाच वेळी मिळू शकतात. अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. हे एकत्रित हप्ते योजनेच्या नियमनुसार व प्रशासनिक निर्णयानुसार करण्यात येणार आहेत.

सरकारची अंतिम तारीख

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर, Ekyc मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी सरकारने अंतिम मुदत 31 मार्च 2026 अशी ठेवली आहे. याचा अर्थ असा की लाभार्थींनी आपली केवायसी माहिती योग्य आणि पूर्ण प्रकारे अपडेट करणे खूप गरजेचे आहे. 31 मार्चपर्यंत सुधारणा न केल्यास पुढील हप्ते मिळण्यास अडचणी येऊ शकतात. चुकीची किंवा अपूर्ण माहितीमुळे पुढील लाभ थांबण्याची शक्यता वाढते.

केवायसी अपडेट कशी करावी

लाभार्थी महिलांनी खालील स्टेप्स फॉलो करून आपल्या केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे: Ekyc ladki bahin yojana

  1. राज्य सरकारच्या अधिकृत “लाडकी बहीण योजनेच्या” वेबसाईटवर लॉगिन करा.
  2. “माय प्रोफाइल” किंवा “ई केवायसी” विभागात जा.
  3. आधार कार्ड, बँक खाते पासबुक, आयएफसी कोड या सारखी माहिती पुन्हा तपासा.
  4. आवश्यक दस्तऐवज पुन्हा अपलोड करा जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी.
  5. सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर मिळणारा कन्फर्मेशन मेसेज नोंदवा.

महिलांसाठी महत्त्वाची सूचना

महिला लाभयार्थ्यानी वेळेवर केवायसी पूर्ण करा. नंतर पैसे मिळण्याची प्रक्रिया गतिशील बनेल. बँक खात्याची माहिती अचूक द्या. चुकीच्या खात्यामुळे पैसे परत जाण्याची शक्यता असते. काही अडचणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची संपर्क साधा. काही तांत्रिक त्रुटी असल्यास हेल्पलाइन किंवा जिल्हा सहकारी कार्यालयात तक्रार नोंदवा.

हा लेख वाचा-  Post Office FD Calculator: पत्नीच्या नावावर ₹5 लाखांची पोष्ट ऑफिस एफ.डी. केली तर किती परतावा मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Ekyc ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेतील पैसे अडकण्यामागे मुख्य कारण ई केवायसी मध्ये झालेल्या चुका व प्रक्रियात्मक तांत्रिक अडचणी आहेत. ज्या महिलांनी ई केवायसी अपडेट पूर्ण केले नाही. त्यांना त्यांच्या हप्त्याचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर वेबसाईटवरून केवायसी करण्याची आवश्यकता आहे.

Ekyc ladki bahin yojana साठी पुढील लिंक ला क्लिक करा: https://ladakibahin.maharashtra.gov.in/