LIC Amritbaal plan details: मुलांचे भविष्य आता LIC कडे सुरक्षित; मुलांसाठी खास अमृतबाल योजना; जाणून घ्या नवा प्लॅन.

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now

LIC Amritbaal plan details: भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ने आपल्या ग्राहकांसाठी म्हणजेच लहान मुलांसाठी एक नवीन विमा योजना बाजारात आणली आहे. या योजनेचे नाव आहे “अमृतबाल” (Plan No. 774). ही पॉलिसी विशेषतः अशा पालकांसाठी तयार करण्यात आली आहे जे आपल्या मुलांच्या शिक्षण, लग्न, करिअर किंवा आपत्कालीन गरजांसाठी आधीपासून आर्थिक नियोजन करू इच्छितात. अमृतबाल ही एक व्यक्तिगत बचत विमा योजना आहे ज्यामध्ये तुमच्या मुलाच्या सुरक्षित भविष्यासाठी आयुर्विमा कवच आणि दरवर्षी गॅरेंटेड बोनस लाभ दिला जातो.

अमृतबाल योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

या (LIC Amritbaal plan details) योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की पालकांनी आपल्या मुलांच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी अगोदरच तयारी करून ठेवावी. मुलाच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा अन्य आवश्यक गरजांसाठी मोठा निधी सहज उपलब्ध व्हावा, यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या पॉलिसीमुळे पालकांना मानसिक शांतता मिळते कारण LIC कडून मिळणारे सर्व लाभ निश्चित असतात आणि दरवर्षी पॉलिसीमध्ये वाढ होत राहते.

LIC Amritbaal plan details
LIC Amritbaal plan details

या योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेत तुमच्या मुलाचे वय किमान 30 दिवस आणि कमाल 13 वर्षां पर्यंत असावे लागते. म्हणजेच, तुम्ही ही पॉलिसी अगदी लहान बाळासाठी सुद्धा घेऊ शकता. पॉलिसी पूर्ण होण्याच्या वेळी म्हणजेच मॅच्युरिटीच्या वेळेस मुलाचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असावे लागते. ही वयोमर्यादा अशा प्रकारे ठरवण्यात आली आहे की मिळणाऱ्या रकमेचा उपयोग मुलांच्या योग्य वयात होऊ शकेल.

प्रीमियम पर्याय काय आहेत?

अमृतबाल योजनेत LIC ने पालकांसाठी लवचिक प्रीमियम भरण्याचे पर्याय दिले आहेत. तुम्ही ही योजना सिंगल प्रीमियम स्वरूपात एकदाच भरू शकता किंवा 5, 6, किंवा 7 वर्षे प्रीमियम भरण्याचे पर्याय निवडू शकता. कमाल प्रीमियम टर्म 10 वर्षे आहे. यापैकी तुम्ही काहीही निवडू शकता तुम्ही जी रक्कम प्रीमियम स्वरूपात भरणार आहेत त्यावरती आपली मॅच्युरिटी रक्कम अवलंबून असेल.

Also Read:-  Life Insurance New Business Premium 14% Increase: भारतीय विमा क्षेत्रात साकारत्मकतेची वाटचाल

किती विमा रक्कम घेता येते?

या (LIC Amritbaal plan details) योजनेमध्ये किमान विमा रक्कम ₹2 लाख ठेवण्यात आली आहे. कमाल विमा रकमेवर LIC ने कोणतीही मर्यादा ठेवलेली नाही, म्हणजेच तुमची आर्थिक क्षमता आणि गरजेनुसार तुम्ही मोठी रक्कमही विमा स्वरूपात घेऊ शकता. ही रक्कम भविष्यातील गरजांसाठी मोठा आधार बनते.

हमी परतावा म्हणजे काय?

या योजनेचा सर्वात खास भाग म्हणजे दरवर्षी मिळणारा हमी परतावा (Guaranteed Additions). तुम्हाला प्रत्येक वर्षी विमा रकमेच्या म्हणजेच उदा, विमा रक्कम ₹1,000 मागे ₹80 हमी परतावा मिळतो. म्हणजेच जर तुमच्याकडे ₹10,00,000 ची पॉलिसी असेल तर दरवर्षी ₹80,000 तुमच्या पॉलिसीमध्ये जमा होईल. ही रक्कम प्रत्येक वर्षी मिळत राहील आणि पॉलिसीच्या मॅच्युरिटीपर्यंत साठवली जाऊन, सर्वात शेवटी एकरकमी दिली जाते.

मॅच्युरिटी लाभ कसा मिळतो?

तुम्हाला मॅच्युरिटीवेळी एकरकमी रक्कम मिळवायची असेल तर ती पॉलिसीच्या अखेरच्या दिवशी दिली जाते. किंवा तुम्ही ती रक्कम हप्त्यांमध्येही घेऊ शकता – 5, 10 किंवा 15 वर्षांच्या अंतराने. यामुळे पालक किंवा मुलाला भविष्यातील गरजांसाठी सहज आर्थिक सहाय्य मिळते.

उदा. LIC Amritbaal plan details- एक वर्षाच्या मुलीच्या किंवा मुलग्याच्या नावावरती हि योजना 24 वर्षासाठी घेतली तर आणि याचा प्रीमियम 7 वर्ष भरणेचा पर्याय निवडला असल्यास आपणास 15,00,000 विमा रकमेसाठी 2,00,954 रुपये वार्षिक प्रीमियम पाहिल्या वर्षी भरावा लागेलं त्यानंतर दुसऱ्या वर्षी 1,96,627 रुपये प्रीमियम भरावा लागेल. सात वर्षांमध्ये 13,80,713 रुपये गुंतवले जातील तिथून पुढे प्रीमियम बंद होतील आणि घेतलेल्या 24 वर्ष मुदतीनंतर आपणास 15,00,000 विमा रक्कम आणि 28,80,000 रुपये बोनस असे एकूण 43,80,000 रुपये परत मिळतील.

जोखीम कवच कधी सुरु होते?

जर मुलाचे वय 8 वर्षांपेक्षा कमी असेल, तर विमा जोखीम (रिस्क कव्हर) दोन वर्षांनी किंवा पॉलिसीच्या वाढदिवसाच्या आसपास सुरु होते. पण जर मुलाचे वय 8 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल, तर जोखीम कवच लगेच सुरु होते. ही माहिती पालकांनी लक्षात ठेवायला हवी.

LIC Amritbaal plan details
LIC Amritbaal plan details

या पॉलिसीचे इतर फायदे कोणते?

या योजनेत विमाधारकाच्या मृत्यू झाल्यास, विमा रक्कम + हमी परतावा मिळतो. तुम्ही “प्रीमियम रिटर्न रायडर” हा पर्याय निवडल्यास, भरलेला प्रीमियम मृत्यूच्या वेळी परत मिळतो. काही वर्षानंतर काही अटींवरती कर्ज मिळण्याची सोया सुद्धा उपलब्ध आहे

Also Read:-  ePik Pahani App: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक पाहणी ॲप, डिजिटल युगाची एक नवी पायरी.

LIC Amritbaal plan details

LIC ची अमृतबाल योजना ही केवळ एक विमा योजना नाही, तर ती मुलांच्या उज्ज्वल भविष्याची खात्री आहे. दरवर्षी हमी परतावा, लवचिक प्रीमियम, मृत्यू लाभ, आणि मॅच्युरिटीवरील चांगला परतावा या सगळ्या गोष्टी या योजनेला आणखी आकर्षक बनवतात. ही योजना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर उपयोगी पडते. पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आजच पाऊल उचलावे आणि LIC Amritbaal plan details योजनेचा लाभ घ्यावा कारण उद्याच्या सुरक्षितसतेसाठी आजच निर्णय घेणे महत्वाचे आहे.

मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, ही योजना एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय आहे.

LIC Amritbaal plan details External links: www.licindia.in

Contact us