LIC high return policy: नवीन आर्थिक वर्ष म्हणजे नवीन आर्थिक उद्दिष्टे ठरवण्याची आणि भविष्यासाठी भक्कम नियोजन करण्याची योग्य वेळ. केवळ टॅक्स बचत करण्यापेक्षा, कुटुंबाला आर्थिक संरक्षण देतानाच मोठा फंड तयार करून देणारी गुंतवणूक शोधत असाल, तर LIC च्या काही लोकप्रिय योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
या LIC High Return Policy लेखात आपण Jeevan Labh, Jeevan Umang, New Jeevan Anand आणि Jeevan Lakshya या LIC च्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चार योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या सर्व योजना नॉन-लिंक्ड आणि विथ-प्रॉफिट्स प्रकारातील असून, विमा संरक्षणासोबत बोनस, बचत आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची संधी देतात.
योग्य Sum Assured निवडून आणि नियमानुसार प्रीमियम भरत राहिल्यास, दीर्घकालीन कालावधीत मोठा फंड उभारण्याचे लक्ष्य साध्य करता येऊ शकते. त्यामुळे भविष्यात आर्थिक सुरक्षिततेसोबतच मोठी रक्कम मिळवण्याचा मार्गही खुला होऊ शकतो.
१. LIC Jeevan Labh : मर्यादित प्रीमियम, दीर्घकाळ वाढणारा परतावा
LIC Jeevan Labh ही नॉन-लिंक्ड, विथ प्रॉफिट्स एंडॉमेंट योजना आहे. यात संरक्षण आणि बचत दोन्ही एकत्र मिळतात. योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे मर्यादित प्रीमियम पेइंग टर्म; म्हणजे तुम्ही फक्त काही वर्षे प्रीमियम भरायचा आहे आणि संपूर्ण मुदतीपर्यंत (maturity) पॉलिसी आणि त्याचा बोनस वाढत राहतो.
ही LIC high return policy योजना करोडपती बनण्यासाठी उत्तम आहे कारण मोठ्या सम अश्युअर्ड (Sum Assured) निवडल्यास maturity वेळी प्रचंड मोठी, एकरकमी रक्कम मिळते. “With Profits” असल्याने रिव्हर्शनरी बोनस आणि फायनल ॲडिशनल बोनस मिळतात, ज्यामुळे एकूण परतावा लक्षणीय वाढतो. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी ही योजना खूप लोकप्रिय आहे. हा प्लान नवीन आर्थिक वर्षात सुरुवात केल्यास कंपाउंडिंग इंटरेस्टचा चा फायदा पूर्णपणे मिळू शकतो.
LIC high return policy उदाहरण: समजा, ३० वर्षांच्या व्यक्तीने LIC ची ₹५० लाख Sum Assured असलेली २५ वर्षांच्या मुदतीची पॉलिसी घेतली. या योजनेत त्याला संपूर्ण २५ वर्षे प्रीमियम भरावा लागत नाही, तर फक्त पहिल्या १६ वर्षांपर्यंतच प्रीमियम भरावा लागतो. त्यानंतर उर्वरित कालावधीत पॉलिसी कोणताही अतिरिक्त प्रीमियम न भरता सुरू राहते.
- वार्षिक प्रीमियम: ₹२,३८,१३८ (प्रीमियमची अचूक रक्कम पेमेंट मोड, लागू सवलत आणि इतर अटींनुसार बदलू शकते.)
- १६ वर्षांत भरलेला एकूण प्रीमियम: सुमारे ₹३८,१०,२०८
पॉलिसीची २५ वर्षांची मुदत पूर्ण झाल्यावर, म्हणजेच विमाधारकाचे वय ५५ वर्षे झाल्यावर, त्याला ₹५०,००,००० ची मूलभूत विमा रक्कम (Sum Assured) आणि ₹६१,२५,००० बोनस आणि यावरील अंतिम अतिरिक्त बोनस ₹२२,५०,००० मिळतो म्हणजेच एकूण रक्कम सुमारे ₹१,३३,७५,००० परिपक्वता लाभ (Maturity Benefit) मिळू शकतो. (मात्र, बोनसची रक्कम LIC कडून दरवर्षी जाहीर होणाऱ्या बोनस दरांवर अवलंबून बदलू शकते.)
याशिवाय, पॉलिसीच्या कालावधीत कोणत्याही टप्प्यावर विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला योजनेच्या अटींनुसार Sum Assured सोबत लागू बोनसचाही लाभ दिला जातो, ज्यामुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो.
LIC high return policy दीर्घकालीन आर्थिक नियोजन करणाऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते. विशेषतः २५ ते ३० वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी निवडल्यास भविष्यात मुलांचे उच्च शिक्षण, घर खरेदी, निवृत्ती नियोजन किंवा इतर मोठी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मोठा निधी तयार करण्यास मदत होऊ शकते.
२. LIC Jeevan Umang : आयुष्यभर हमखास उत्पन्न आणि संपूर्ण जीवन संरक्षण
नियमित उत्पन्न आणि जीवनभर सुरक्षा हवी असल्यास LIC Jeevan Umang ही सर्वोत्तम योजना आहे. ही योजना १०० वयापर्यंत संपूर्ण जीवन संरक्षण (Whole Life Cover) देते. प्रीमियम पेइंग टर्म संपल्यानंतर दरवर्षी सम अश्युअर्ड च्या ८% इतके Survival Benefit तहायत मिळत राहते.
कल्पना करा, प्रीमियम संपल्यानंतरही दरवर्षी हमखास उत्पन्न येत राहील आणि कुटुंबाचे संरक्षणही कायम राहील. उच्च सम अश्युअर्ड निवडून तुम्ही वार्षिक उत्पन्न आणि maturity रक्कम यांच्या माध्यमातून करोडपती होण्याचे लक्ष्य साध्य करू शकता. सेवानिवृत्ती नियोजन, इस्टेट प्लॅनिंग आणि कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी ही योजना अत्यंत विश्वासार्ह आहे.
LIC high return policy उदाहरण: समजा, ३० वर्षांच्या स्त्री किंवा पुरुषाने ₹१ कोटी Sum Assured असलेली LIC पॉलिसी घेतली आणि २० वर्षे प्रीमियम भरण्याचा पर्याय निवडला. अशा परिस्थितीत या योजनेअंतर्गत मिळणारे संभाव्य लाभ पुढीलप्रमाणे असू शकतात.
- वार्षिक प्रीमियम: ₹५,४३,८५० असेल, २० वर्षामध्ये एकूण ₹१,०८,७७,००० भरले जातील.
- Survival Benefit: विमाधारकाचे वय ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी ₹८ लाख (म्हणजे Sum Assured च्या ८%) Survival Benefit म्हणून मिळण्यास सुरुवात होते. हा लाभ पॉलिसीच्या अटींनुसार आयुष्यभर किंवा जास्तीत जास्त १०० वर्षांच्या वयापर्यंत मिळू शकतो. उदाहरणार्थ, ५० ते १०० वर्षे या कालावधीत दरवर्षी ₹८ लाख मिळाल्यास एकूण ₹४,८०,००,००० इतके नियमित उत्पन्न मिळू शकते.
- Maturity Benefit: पॉलिसीच्या परिपक्वतेच्या वेळी ₹१ कोटीची मूलभूत विमा रक्कम (Sum Assured) तसेच अंदाजे ₹३.७८ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक बोनस मिळू शकतो.
याचा अर्थ, केवळ २० वर्षे प्रीमियम भरल्यानंतर विमाधारकाला ५० वर्षांनंतर दरवर्षी ₹८ लाखांचे नियमित उत्पन्न मिळू शकते. याशिवाय, पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर ₹१ कोटी Sum Assured आणि लागू बोनस मिळून मोठी परिपक्वता रक्कमही प्राप्त होते.
विमाधारक ही पॉलिसी २० वर्षानंतर केंव्हाही बंद करून त्याची शिल्लक रक्कम परत घेऊ शकतो. उदा एकूण ३० वर्षानंतर (विमाधारकाच्या ६० वयाला) पॉलिसी बंद केली तर ₹८ लाख प्रतिवर्षी x १० वर्ष = ₹८०,००,००० आणि सोडकिंमत ₹३,७०,६६,००० असे एकूण ₹४,५०,००,००० मिळतील.
LIC high return policy नियमित उत्पन्न आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता या दोन्हींचा विचार करता, ही योजना रिटायरमेंट प्लॅनिंग, निवृत्तीनंतरचा खर्च भागवणे, महागाईचा प्रभाव कमी करणे आणि पेन्शनसारखा स्थिर आर्थिक प्रवाह निर्माण करण्यासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकते. तसेच, पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचे निधन झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला योजनेच्या अटींनुसार मृत्यू लाभही दिला जातो.
३. LIC New Jeevan Anand : Maturity + नंतरही Whole Life संरक्षण
“जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी” या प्रसिद्ध टॅगलाइनसह ओळखली जाणारी LIC New Jeevan Anand योजना एंडॉमेंट आणि होल लाइफ प्लॅनचा अद्भुत संयोग आहे. Maturity वेळी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही लाईफ कव्हर कायम चालूच राहते. पॉलिसीधारकाच्या निधनानंतर कुटुंबाला अतिरिक्त Sum Assured मिळते.
दीर्घ मुदतीची शिस्तबद्ध बचत आणि आकर्षक बोनस यामुळे ही योजना करोडपती ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त आहे. Maturity Benefit + बोनस यांचा एकत्रित परिणाम खूप मोठा होतो. भारतीय कुटुंबांसाठी ही एक अत्यंत विश्वासार्ह आणि लोकप्रिय योजना आहे.
LIC high return policy उदाहरण: समजा, ३० वर्षांच्या व्यक्तीने २५ वर्षांच्या पॉलिसी मुदतीसह आणि ₹५० लाख Sum Assured असलेली LIC पॉलिसी घेतली. अशा परिस्थितीत या योजनेचे संभाव्य लाभ पुढीलप्रमाणे असू शकतात.
- वार्षिक प्रीमियम: ₹२,३०,२५० x २५ वर्ष = ₹५७,५६,२५० भरले जातील.
- Maturity Benefit: पॉलिसीची २५ वर्षांची मुदत पूर्ण झाल्यावर, म्हणजेच विमाधारकाचे वय ५५ वर्षे झाल्यावर, ₹५० लाखांची मूलभूत विमा रक्कम (Sum Assured), ₹५८,७५,००० रिव्हर्जनरी बोनस आणि ₹२२,५०,००० अंतिम अतिरिक्त बोनस (Final Additional Bonus) मिळून एकूण सुमारे ₹१,३१,२५,००० परिपक्वता लाभ (Maturity Benefit) मिळू शकतो.
या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मॅच्युरिटीनंतरही विमा संरक्षण कायम राहते. पॉलिसी मॅच्युरिटी झाल्यानंतरही ₹५० लाखांचे Life Cover विमाधारकाच्या १०० वर्षांच्या वयापर्यंत सुरू राहते. या कालावधीत कोणत्याही कारणाने विमाधारकाचे निधन झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला अतिरिक्त ₹५० लाखांचा मृत्यू लाभ मिळतो. त्यामुळे मॅच्युरिटी रक्कम मिळाल्यानंतरही कुटुंबाची आर्थिक सुरक्षा कायम राहते.
एकंदरीत, ही LIC high return policy योजना दीर्घकालीन संपत्ती निर्मिती (Wealth Creation) आणि आजीवन आर्थिक संरक्षण (Long-term Life Cover) या दोन्हींचा समतोल साधणारी योजना ठरू शकते. त्यामुळे निवृत्ती नियोजन, वारसा नियोजन (Estate Planning) तसेच कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी हा एक आकर्षक पर्याय मानला जातो.
४. LIC Jeevan Lakshya : मुलांच्या भविष्यासाठी “कन्यादान” योजना
मुलांचे शिक्षण, लग्न आणि स्वप्नपूर्तीसाठी सुरक्षित भविष्य हवे असेल तर LIC Jeevan Lakshya ही आदर्श योजना आहे. पॉलिसीधारकाच्या निधनानंतरही कुटुंबाला वार्षिक उत्पन्न मिळते आणि प्रीमियम भरण्याची गरज राहत नाही. योजना आपोआप चालू राहते.
Maturity वेळी Sum Assured + बोनस यांचा समावेश असलेली रक्कम एक कोटीपर्यंत पोहोचवता येते. ही योजना पालकांसाठी “कन्यादान” सारखी मानली जाते. मुलांच्या शिक्षण आणि इतर महत्वाच्या गरजा पूर्ण होण्याची हमी देते.
LIC high return policy उदाहरण: समजा, ३० वर्षांच्या पालकांनी आपल्या ३ वर्षांच्या मुलाला किंवा मुलीला नॉमिनी ठेवून २५ वर्षांच्या पॉलिसी मुदतीची आणि २२ वर्षे प्रीमियम भरण्याच्या कालावधीची ₹५० लाख Sum Assured असलेली LIC पॉलिसी घेतली. अशा परिस्थितीत या योजनेचे संभाव्य लाभ पुढीलप्रमाणे असू शकतात.
- वार्षिक प्रीमियम: ₹२,११,०५०
- २२ वर्षांत भरला जाणारा एकूण प्रीमियम: ₹४६,४३,१००
या LIC high return policy योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, पॉलिसीच्या कालावधीत पालकाचे दुर्दैवी निधन झाल्यास, नॉमिनी असलेल्या मुलाला किंवा मुलीला दरवर्षी Sum Assured च्या १०% प्रमाणे, म्हणजेच ₹५ लाख आर्थिक लाभ मिळत राहतो. त्याचबरोबर उर्वरित सर्व प्रीमियम माफ (Premium Waiver Benefit) केले जातात, आणि सर्वात शेवटी मॅच्युरिटी वेळेस, मॅच्युरिटी रक्कम सुद्धा मिळते. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक भार पडत नाही आणि पॉलिसी पूर्ववत सुरू राहते.
पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर, मुलगा किंवा मुलगी २८ वर्षांची झाल्यावर ₹५०,००,००० ची मूलभूत विमा रक्कम (Sum Assured), ₹५८,७५,००० रिव्हर्जनरी बोनस आणि ₹२२,५०,००० अंतिम अतिरिक्त बोनस (Final Additional Bonus) मिळून एकूण सुमारे ₹१,३१,२५,००० परिपक्वता लाभ (Maturity Benefit) मिळू शकतो.
ही LIC high return policy योजना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, परदेशी शिक्षण, व्यवसाय सुरू करण्यासाठी, घराच्या डाउन पेमेंटसाठी किंवा विवाहासारख्या मोठ्या आर्थिक गरजांसाठी मोठा निधी तयार करण्यास मदत करू शकते. विशेषतः पालकांच्या अनुपस्थितीतही मुलाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावे, या उद्देशाने ही योजना उपयुक्त ठरते. त्यामुळे अनेकजण या योजनेकडे मुलांच्या भविष्यासाठी “कन्यादान” किंवा “चाइल्ड फ्युचर प्लॅनिंग” स्वरूपातील दीर्घकालीन आर्थिक नियोजन म्हणून पाहतात.
का निवडावी ही LIC पॉलिसी
- कर सवलती (Tax Benefits): आयकर कायद्यातील लागू तरतुदींनुसार, पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर कलम 80C अंतर्गत करसवलतीचा लाभ मिळू शकतो. तसेच, पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर मिळणारा Maturity Benefit किंवा विमाधारकाच्या निधनानंतर मिळणारा Death Benefit हा लागू अटी पूर्ण झाल्यास कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त असू शकतो. कर नियम वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे अंतिम निर्णयापूर्वी कर सल्लागाराचा सल्ला घेणे उचित ठरते.
- बोनसचा लाभ: ही With Profits प्रकारातील योजना असल्याने, LIC कडून जाहीर होणाऱ्या रिव्हर्जनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनसचा लाभ मिळू शकतो. कंपनीच्या कामगिरीनुसार बोनस जाहीर केला जात असल्याने, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा मिळण्याची संधी निर्माण होते. मात्र, बोनसची रक्कम निश्चित नसून LIC च्या वार्षिक घोषणेनुसार बदलू शकते. LIC high return policy
- विश्वासार्ह सुरक्षा: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह जीवन विमा संस्था मानली जाते. कंपनीचा Claim Settlement Ratio सातत्याने ९९% पेक्षा अधिक राहिल्याने, दाव्यांच्या निकाली काढण्याच्या बाबतीत ग्राहकांचा विश्वास कायम आहे.
- लिक्विडिटी (Loan Facility): आर्थिक गरज निर्माण झाल्यास पॉलिसी पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नसते. पॉलिसीच्या अटींनुसार तीन वर्षांनंतर पॉलिसीवर कर्ज (Policy Loan) घेण्याची सुविधा उपलब्ध असते, ज्यामुळे आकस्मिक आर्थिक गरजा भागविणे सोपे होते. LIC high return policy
- अतिरिक्त संरक्षण (Riders): मूलभूत विमा संरक्षणाव्यतिरिक्त, गरजेनुसार अपघाती मृत्यू लाभ (Accidental Benefit Rider), गंभीर आजार संरक्षण (Critical Illness Rider) तसेच इतर उपलब्ध रायडर्स जोडून विमा संरक्षण अधिक व्यापक करता येते. यामुळे अनपेक्षित परिस्थितीत आर्थिक सुरक्षितता आणखी मजबूत होते.
कोणता प्लॅन निवडावा?
LIC high return policy योग्य प्लॅन निवडताना सर्वप्रथम तुमचे वय, आर्थिक उद्दिष्टे आणि भविष्यातील गरजा यांचा सखोल विचार करा. तुम्हाला निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न हवे आहे का? मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी तयार करायचा आहे का? की कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी विमा संरक्षण हवे आहे? हे निश्चित करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तुमची मासिक किंवा वार्षिक प्रीमियम भरण्याची आर्थिक क्षमता आणि जोखीम स्वीकारण्याची तयारी यांचाही विचार करावा.
मोठ्या Sum Assured किंवा अधिक सानुकूलित पर्यायांसाठी जवळच्या LIC शाखेला भेट द्या किंवा www.licindia.in वर संपर्क साधा किंवा तुमच्या अधिकृत LIC विमा प्रतिनिधिचा सल्ला घ्या. त्यांच्याकडूनच योजना सुरू करा.
LIC high return policy योजना अंतिम करण्यापूर्वी ऑनलाइन प्रीमियम कॅल्क्युलेटरचा वापर करून प्रीमियम, परिपक्वता रक्कम (Maturity Benefit) आणि इतर लाभांचा अंदाज घ्या. विविध योजनांची तुलना करून तुमच्या आर्थिक नियोजनाशी सर्वाधिक सुसंगत योजना निवडल्यास दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता आणि गुंतवणुकीवर अधिक चांगला लाभ मिळू शकतो.
LIC high return policy
LIC च्या दीर्घकालीन बचत आणि विमा योजनांमध्ये वेळेवर गुंतवणूक सुरू केल्यास कंपाउंडिंगचा प्रभाव, जाहीर होणारा बोनस आणि दीर्घकालीन बचतीचा फायदा मिळून मोठा निधी तयार करण्याची संधी मिळू शकते.
नियमित प्रीमियम भरत राहिल्यास भविष्यात आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मजबूत आर्थिक आधार निर्माण होतो. या माहितीच्या आधारे तुमच्यासाठी सर्वात योग्य LIC योजना निवडणे आणि प्रभावी आर्थिक नियोजन करणे अधिक सोपे होईल.
नोट: ही LIC high return policy माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. व्यक्तिगत सल्ल्यासाठी आर्थिक सल्लागार किंवा LIC आयुर्विमा प्रतिनिधि यांच्याशी चर्चा करा.
Table of Contents
