LIC Agents: IRDIA च्या नवीन नियमांमुळे विमा क्षेत्रामध्ये खळबळ, 14 लाख LIC एजंट्स आंदोलनाच्या तयारीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

LIC Agents: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी ने आपल्या एजंटचे कमिशन कमी केले आहे त्यामुळे एलआयसी एजंट नाराज झाले आहेत. अनेक एजंट असोशियनने एलआयसी शाखा समोर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आयआरडीआय ने नवीन लागू केलेल्या धोरणानुसार भारतातील प्रत्येक आयुर्विमा कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनामध्ये बदल केले आहेत. यामध्ये आघाडीवरती असणारी आयुर्विमा कंपनी, भारतीय जीवन बिमा निगम (LIC) एलआयसीने सुद्धा आपली आयुर्विमा उत्पादनाने आणि काही नियमामध्ये बदल केले आहेत.

या सर्व गोष्टींचा परिणाम ग्राहकांवरती होणार आहे, त्याच बरोबर आयुर्विमा प्रतिनिधी यांच्या उत्पनावरती, पर्यायाने LIC च्या व्यवसावरती सुद्धा होण्याची श्यक्यता आहे. अलीकडेच कमी केलेल्या लाभांच्या विरोधात आणि नवीन नियमांच्या विरोधात भारतातील सर्व आयुर्विमा एजंट्स संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. नवीन ‘स्पेशल सरेंडर व्हॅल्यू’ नियमांमुळे मिळणारे लाभ कमी होण्याची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक एजंट्समध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एलआयसीच्या नवीन बदलांमुळे एजंट्सची कमाई घटण्याची शक्यता असून, यामुळे एलआयसीच्या शाखांवर मोठे आंदोलन घडू शकते.

नवीन नियम आणि आयोगातील बदल

1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार, पॉलिसीधारकांनी फक्त पहिला प्रीमियम भरल्यानंतरही काही प्रमाणात सरेंडर व्हॅल्यू मिळू शकते. या बदलामुळे एलआयसीने आपली योजनांची आयोगाची रचना बदलली आहे, ज्यामुळे एजंट्सचा मिळणारा लाभ कमी होणार आहे. यावर अनेक एजंट्स संघटनांनी एलआयसीच्या या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे.

एलआयसीच्या निर्णयांवर प्रतिक्रिया देत, लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (LIAFI) ने आपल्या सदस्यांना एलआयसीवर दबाव आणण्यासाठी आंदोलनाची तयारी करण्यास सांगितले आहे. एलआयसीने कोणत्याही संघटनाशी चर्चा न करता निर्णय घेतला असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

‘क्लॉबॅक’ तरतुदीवर एजंट्सची चिंता.

या नवीन नियमांमुळे सर्वात मोठी चिंता ‘क्लॉबॅक’ तरतुदीची आहे, जर पॉलिसीधारकाने पहिल्या वर्षीचा प्रीमियम भरून पॉलिसी सरेंडर केली तर एलआयसी एजंट्सला पहिल्या वर्षात मिळालेला लाभ परत करावा लागू शकतो. यावर अजूनही एलआयसीने अंतिम निर्णय घेतला नसल्याचे एजंट्सच्या एकमतानुसार दिसत आहे. मात्र, या नियमामुळे एजंट्सची कमाई कमी होण्याचा धोका जास्त आहे.

इरडाचे सरेंडर व्हॅल्यू नियम लागू.

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने मार्च 2024 मध्ये नवीन पॉलिसी नियम लागू केले होते, ज्याची अंमलबजावणी 1 आक्टोबर 2024 नंतर होणार होती, त्यानुसार सर्व खाजगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी आणि LIC ना हे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यानुसार पॉलिसीधारकांना पॉलिसी सरेंडर केल्यानंतर प्रीमियमचा काही भाग परत मिळणार आहे. पूर्वीच्या तुलनेत सरेंडर व्हॅल्यू वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे एजंट्सच्या कमिशन स्ट्रक्चरमध्ये मोठे बदल झाले आहेत.

LIC Agents मागणी आणि पुढील आंदोलन

एलआयसीच्या नवीन नियमांविरोधात एजंट्सने त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी चालवली आहे. एलआयसीला आपल्या निर्णयांचा फेरविचार करण्याची मागणी केली जात आहे, अन्यथा देशभरातील शाखांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

एलआयसीच्या एन्डोमेंट प्लॅनमध्ये बदल.

एलआयसीने 1 ऑक्टोबर 2024 पासून आपले नवीन नियम लागू केले असून, यामध्ये न्यू एन्डोमेंट प्लॅन, न्यू जीवन आनंद, जीवन लक्ष्य यासह विविध पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. नवीन एन्डोमेंट प्लॅनसाठी प्रवेश वयोमर्यादा 50 वर्षे करण्यात आली आहे. पॉलिसीधारकांना यामुळे कमी वयात जास्त फायदे मिळण्याची संधी असेल, मात्र वृद्ध लोकांसाठी हे नियम जास्त कठीण ठरू शकतात.

LIC Agents आर्थिक हानी.

LIC ची स्थापना 1956 मध्ये झाली तेंव्हापासून एजंट्सना मिळणाऱ्या लाभ स्ट्रक्चर मध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत पण हे नवीन बदल 2024 मध्ये लागू झाले आहेत. नवीन नियमांमुळे एलआयसी एजंट्सच्या कमाईवर परिणाम होणार आहे. प्रीमियम दरात सुमारे 7-8% वाढ करण्यात आली असून, सम अशुर्ड देखील 1 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये करण्यात आली आहे. या बदलांमुळे एजंट्सला त्यांच्या कमिशनमध्ये घसरण येऊ शकते.

निष्कर्ष: LIC Agents

एलआयसीच्या नवीन नियमांनी एजंट्समध्ये अस्वस्थता पसरवली असून, याविरोधात देशभरात आंदोलन घडू शकते. एलआयसीने आपले निर्णय पुन्हा एकदा तपासून पाहावे, अशी एजंट्सची मागणी आहे, अन्यथा आंदोलन तीव्र होईल.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur