FASTag Annual Pass 2025: भारतातील महामार्ग प्रवासात मोठा बदल घडवणारी योजना आता सुरु होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने FASTag Annual Pass सुरू करण्याची घोषणा केली असून, ती 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे.
या योजनेअंतर्गत खासगी वाहनधारकांना फक्त ₹3,000 च्या एकदाच भरलेल्या रकमेवर 200 टोल क्रॉसिंग किंवा एक वर्षाचा प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे वारंवार महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना वेळ, पैसा आणि ऊर्जा तिन्ही बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे.
FASTag Annual Pass म्हणजे काय?
FASTag वार्षिक पास हा पूर्व-भरलेला (Prepaid) टोल प्लॅन आहे, जो फक्त नॉन-कमर्शियल खासगी वाहनांसाठी म्हणजेच कार, जीप आणि व्हॅन यांच्यासाठी लागू होणार आहे. या अंतर्गत, वाहनधारकाला एकदाच ₹3,000 भरावे लागतील. यामध्ये तुम्ही 200 टोल क्रॉसिंग किंवा संपूर्ण एका वर्षाचा प्रवास; यापैकी जे आधी पूर्ण होईल तेवढा लाभ घेऊ शकता.

सड़क परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, हा पास मुख्यतः 60 किमीच्या अंतरात असलेल्या टोल नाक्यांमुळे प्रवाशांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आणला आहे. यामुळे;
- टोल नाक्यावर होणारी गर्दी कमी होईल,
- वाद विवाद टळतील,
- आणि प्रवास अधिक जलद व सुलभ होईल.
कुठे लागू होणार हा पास?
- फक्त राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या एक्सप्रेसवेवर (MoRTH) लागू.
उदाहरणार्थ: दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे, मुंबई–नाशिक महामार्ग, मुंबई–सुरत महामार्ग, मुंबई–रत्नागिरी महामार्ग इ. - राज्य महामार्ग किंवा नगरपालिकेच्या टोल रस्त्यांवर हा पास लागू होणार नाही. अशा ठिकाणी नेहमीप्रमाणे FASTag चा नियमित चार्ज लागेल.
उदाहरणार्थ: मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, मुंबई–नागपूर एक्सप्रेसवे (समृद्धी महामार्ग), अटल सेतू, आग्रा–लखनौ एक्सप्रेसवे, बेंगळुरू–मैसूर एक्सप्रेसवे, अहमदाबाद–वडोदरा एक्सप्रेसवे इ.
FASTag Annual Pass ची वैशिष्ट्ये
- ऑनलाइन रिचार्जची गरज नाही; एकदाच पैसे भरून संपूर्ण कालावधीसाठी प्रवासाची सोय.
- फक्त त्या वाहनाच्या नोंदणीकृत FASTag साठीच वैध, दुसऱ्या वाहनाला ट्रान्सफर करता येणार नाही.
- फक्त खासगी वाहनांसाठी; कमर्शियल वाहनांना लागू नाही.
- स्वयंचलित नूतनीकरण (Auto Renewal) नाही; एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा 200 ट्रिप संपल्यानंतर पुन्हा अर्ज करावा लागेल.
FASTag Annual Pass कसा खरेदी करायचा?
- राजमार्ग यात्रा (Rajmarg Yatra) ऐप्लिकेशन किंवा NHAI/MoRTH अधिकृत वेबसाइट उघडा.
- वाहन क्रमांक आणि FASTag ID टाकून लॉगिन करा. (तुमचा FASTag सक्रिय आणि योग्यरित्या वाहनावर बसवलेला असावा.)
- ₹3,000 ची रक्कम UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे भरा.
- हा पास तुमच्या विद्यमान FASTag ला जोडला जाईल.
- 15 ऑगस्टपासून पास सक्रिय झाल्याचा SMS तुम्हाला मिळेल.
नियम व अटी
- 1 ट्रिप = 1 टोल क्रॉसिंग (NHAI किंवा MoRTH अंतर्गत).
- 200 ट्रिप पूर्ण झाल्यानंतर किंवा १ वर्ष संपल्यानंतर पुन्हा नियमित FASTag पेमेंट पद्धत लागू होईल.
- नॉन-ट्रान्सफरेबल; दुसऱ्या वाहनावर वापरता येणार नाही.
- नॉन-रिफंडेबल; एकदा पैसे भरल्यानंतर परत मिळणार नाहीत.

थोडक्यात फायदा: जर तुम्ही रोजच्या रोज किंवा आठवड्यातून अनेक वेळा महामार्गावरून प्रवास करत असाल, तर वारंवार टोल रिचार्ज करण्याची चिंता संपेल आणि प्रवासात वेळ व पैशांची बचत होईल.
FASTag Annual Pass 2025
थोडक्यात सांगायचे झाले तर, FASTag Annual Pass 2025 ही योजना वारंवार महामार्ग प्रवास करणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय ठरणार आहे. फक्त एकदाच रक्कम भरून वर्षभर टोलची चिंता मिटणार असून, टोल नाक्यावर वेळेची बचत, गर्दी टाळणे आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुखद बनवणे हे योजनेचे मोठे फायदे आहेत.
राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या एक्सप्रेसवेमुळे मिळणारा हा दिलासा, नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी नक्कीच सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल.
FASTag Annual Pass 2025: https://www.npci.org.in
Table of Contents