Gold Silver Price 4 August 2025: आठवड्याची सुरुवात ग्राहकांसाठी धक्कादायक! सोन्याचा दर गगनाला पोहचले!

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now

Gold Silver Price 4 August 2025: ऑगस्ट 2025 च्या पहिल्याच आठवड्यात सोन्याच्या किमतींनी मोठी उडी घेतली असून सामान्य ग्राहकांसाठी ही आठवड्याची सुरुवातच धक्कादायक ठरली आहे. मागील काही दिवसांत सोन्याच्या दरात थोडं स्थैर्य जाणवत होतं, विशेषतः श्रावण मास सुरू झाल्यापासून किंमती काही प्रमाणात खाली आल्या होत्या.

पण आज सोमवारच्या सकाळीच सोन्याने थेट ₹700 पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे गृहिणींपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सतत बदलणाऱ्या दरांमुळे ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून, येत्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही वाढ त्यांच्या खिशाला मोठा फटका देणारी ठरू शकते.

MCX व सराफा बाजारात सोने महागले

आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या वायद्याचा दर तब्बल ₹911 ने वाढून ₹99,698 वर पोहोचला. याआधी रविवारी हा दर ₹98,787 वर बंद झाला होता. सकाळच्या सत्रात तो ₹99,171 वर खुला झाला आणि नंतर लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

Gold Silver Price 4 August 2025
Gold Silver Price 4 August 2025

22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी ₹92,950 इतका आहे, तर 24 कॅरेट सोनं आता ₹1,01,400 च्या आसपास आहे; जी काही दिवसांपूर्वीच्या तुलनेत खूपच जास्त आहे. सराफा बाजारातही हीच स्थिती आहे. यासोबत चांदीची किंमतही वाढली असून, ती सध्या ₹1,130,000 प्रति किलो इतकी आहे.

रक्षाबंधन आणि सणासुदीचा प्रभाव

सध्या रक्षाबंधनाचा सण जवळ येत असल्याने बाजारात सोनं खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. श्रावण, रक्षाबंधन, आणि पुढे येणाऱ्या गणेशोत्सवासारख्या सणांमुळे लोक मोठ्या प्रमाणावर दागिने खरेदी करत असतात. यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होते आणि त्यामुळेच त्याच्या किमतीतही झपाट्याने वाढ होते.

Also Read:-  TVS Apache RTR 160 4V: दमदार परफॉर्मन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वैशिष्ट्येसह, किंमत पहा!

यंदा सणाचा हंगाम लवकर सुरू झाला असून, नागरिक आधीच खरेदीसाठी सरसावले आहेत. परिणामी, वाढलेल्या मागणीचा परिणाम थेट दरांवर होताना दिसतो आहे. मागणी आणि पुरवठा यातील असमतोल हे अशा वाढीचे मुख्य कारण असते.

सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम

सोनं नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, मात्र जेव्हा त्याच्या किमती सतत वाढतात, तेव्हा सामान्य वर्गासाठी त्याचा खरेदीवर परिणाम होतो. आधीच घरगुती वस्तू, खाद्यपदार्थ आणि इंधन यामध्ये महागाईने नाकी नऊ आणलेले असताना, आता दागिन्यांच्या खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

एकीकडे सणांच्या तयारीत ग्राहक उत्साहात आहेत, तर दुसरीकडे वाढत्या किमतीमुळे त्यांना खर्चात कपात करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा सण सामान्यांच्या खिशाला ‘सोन्याच्या’ नावाने चांगलाच महाग पडण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडींचा परिणाम

जागतिक पातळीवरील व्यापार तणाव, विशेषतः अमेरिका आणि चीन यांच्यातील शुल्क युद्ध यामुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणूक म्हणजेच सोन्याकडे झुकलेला आहे. यामुळेही सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. या आठवड्यात अमेरिकेतील काही महत्त्वाचे आर्थिक डेटा जाहीर होणार आहेत, जसे की रोजगार आकडे, CPI महागाई डेटा, आणि फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य धोरणांची माहिती. त्यामुळे पुढील काही दिवस सोन्याच्या दरांमध्ये मोठी अस्थिरता राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gold Silver Price 4 August 2025
Gold Silver Price 4 August 2025

दर अजून वाढतील का?

JM Financial Services चे कमोडिटी अँड करन्सी रिसर्चचे उपाध्यक्ष प्रणव मेर यांनी सांगितले की, “आगामी सप्ताहात सोन्याचे दर स्थिर असले तरी सकारात्मक ट्रेंडसह राहतील. यामागे जागतिक अर्थव्यवस्था, व्यापारात होणारे बदल आणि गुंतवणूकदारांचा मानस यांचा मोठा वाटा आहे.” ते पुढे म्हणाले की, “बाजारात अनिश्चितता वाढल्याने, सोने ही सुरक्षित संपत्ती म्हणून निवडली जात आहे. त्यामुळे दरात स्थिरता असली, तरी वरच्या दिशेने वाढीची शक्यता कायम आहे.”

Also Read:-  Insurance Surrender Value: लाईफ इन्शुरन्स पॉलिसीधारकांना 1आक्टोबर पासूनच्या नियमांमधील बदलाचा कसा फायदा होईल?

Gold Silver Price 4 August 2025

सोनं खरेदी करायचंय? तर वेळ साधा आणि दर रोज तपासासणासुदीच्या हंगामात सोन्याच्या किमती सतत चढ-उतार करत राहतात. त्यामुळे ग्राहकांनी दररोजचे दर बारकाईने पाहणं गरजेचं आहे. जर खरेदीची गरज अनिवार्य असेल, तर काही प्रमाणात लवकर खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं. मात्र, गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहता, बाजारातील अस्थिरता पाहून निर्णय घेणे योग्य ठरेल. महागाई आणि वाढते दर लक्षात घेता, यंदा सण म्हणजे आनंदासोबतच बजेटचे काटेकोर नियोजन असणार आहे!

Gold Silver Price 4 August 2025: https://www.tanishq.co.in

Leave a Comment