Jeevan Umang Plan In Marathi: 1.10 लाख वाचावा 20 वर्ष, मॅच्युरिटीला घ्या 86 लाख, सोबत पेन्शनचा लाभ, जाणून घ्या सर्व माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

jeevan umang plan in marathi: प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या टप्प्यांत आर्थिक नियोजनाची आवश्यकता असते. स्वतःचे नवीन घर, मुलांचे शिक्षण, त्यांचे लग्न, स्वतःची निवृत्तीची सोय, यासारखे अनेक खर्च आणि भविष्यातील प्लॅनिंगचे अगोदरच नियोजन करून ठेवणे खूपच गरजेचे असते. यासाठीच्या आर्थिक नियोजनासाठी प्रत्येक महिना काही ठराविक रक्कम बाजूला काढून ती कोणत्याही एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवणे अपरिहार्य आहे.

आपल्या देशात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये आपली रक्कम खात्रीशीर रित्या सुरक्षित राहू शकते. सरकारी बँक मधील सेविंग्स, पोष्ट आफिस स्कीम्स, सोने गुंतवणूक किंवा जमीन खरेदी इ. गुंतवणूक योजना मध्ये पैसे गुंतवू शकतो. या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर त्यावरती मिळणाऱ्या नफ्याची निश्चित उत्पन्न मिळेल याची शाश्वती कमीच आहे. या साठी सर्वात खात्रीची आणि फायदेशीर गुंतवणूक म्हणजे LIC आयुर्विमा योजनांमधील गुंतवणूक होय. LIC मधील योजनांची निवड करून, आपण भविष्यातील आर्थिक गरजांची पूर्तता करू शकतो.

jeevan umang plan in marathi
jeevan umang future planning

या jeevan umang plan in marathi लेखामध्ये आपणास LIC OF INDIA च्या अशा एका योजनेसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही रक्कम गुंतवल्यावरती खात्रीशीर उत्पन्न तर मिळेलच त्याचबरोबर आपली रक्कम सुद्धा सुरक्षित राहणार आहे. या योजनेमधून काही वर्षे पेन्शन मिळेल आणि सर्वात शेवटी मॅच्युरिटी रक्कम मिळेल. पेन्शन आणि मॅच्युरिटी रक्कम एकूण ₹86,61,600 मिळेल. यासाठी आपणास प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक महिना ठराविक रक्कम बाजूला काढून, या योजनेमध्ये भरावी लागेल. LIC च्या या योजनेचे नाव आहे ‘जीवन उमंग योजना’ या योजनेची माहिती समजून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

jeevan umang plan in marathi: जीवन उमंग पॉलिसी म्हणजे काय?

जीवन उमंग ही एलआयसीची एंडोवमेंट आणि whole life’s पद्धतीची आयुर्विमा योजना आहे. आपण घेतलेल्या मुदतीमध्ये प्रीमियम भरायचे आहेत. प्रीमियम भरण्याची मुदत संपल्यावरती वार्षिक पेन्शन चालू होते आणि लाईफ कव्हरसह मॅच्युरिटीच्या वेळी एकरकमी रक्कम मिळते. म्हणजेच, योजनाधारक हयात असेपर्यंत त्याला विमा संरक्षण मिळत राहते, पेन्शन मिळते आणि पॉलिसी मुदत पूर्ण झाल्यावर त्याला रक्कम दिली जाते. याशिवाय, जर विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला मृत्यू लाभ मिळतो.

जीवन उमंग पॉलिसी – कोणासाठी फायदेशीर?

ज्यां व्यक्तींना दीर्घकालीन आर्थिक नियोजन करायचे आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. मुलांचे शिक्षण, लग्न, घराचे बांधकाम, निवृत्ती नंतरच्या आयुष्याची पेन्शन यासारख्या खर्चाची तरतूद करण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा निर्माण करण्यासाठी ही योजना मदत करते. या योजनेद्वारे स्वतःसाठी किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी गुंतवणूक करून भविष्यात आर्थिक पाठबळ मिळवता येते. jeevan umang plan in marathi

जीवन उमंग पॉलिसी – वैशिष्ट्ये आणि फायदे

योजना मुदत पूर्ण होईपर्यंत विमाधारकाला जीवन विमा संरक्षण मिळते. जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नामांकित व्यक्तीला (Nominee) मृत्यू लाभ मिळतो.

पॉलिसी मुदत पूर्ण झाल्यावर विमाधारकाला विमा रक्कम आणि बोनस मिळतो.

विमाधारक 15, 20, 25 किंवा 30 वर्षांची पॉलिसी मुदत निवडू शकतो.

विमाधारक आपल्या बजेटनुसार किमान रक्कम गुंतवूनही या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

या योजनेमध्ये तीन वर्षाचे प्रीमियम भरल्यानंतर सरेंडर व्हॅल्यूच्या (Surrender Value) आधारे कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे

विमाधारकाला गुंतवणूक केलेल्या रकमेवर आणि मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80C आणि 10(10)D अंतर्गत कर सूट मिळते. (पॉलिसीच्या अटी आणि नियम अनुसार)

jeevan umang plan in marathi
jeevan umang plan pension

पात्रता निकष

हि jeevan umang plan in marathi योजना कोणतेही स्त्री आणि पुरुष आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांच्या नावे घेऊ शकतात. जीवन उमंग योजनेत सामील होण्यासाठी काही पात्रता निकष आवश्यक आहेत. योजना घेतेवेळी किमान वय 9 वर्षं असावे आणि कमाल वय 55 वर्षं असावे, किमान विमा रक्कम 2 लाख रुपये घ्यावी लागेल, कमाल विमा रक्कम अमर्याद आहे. योजनाधारकाला त्याचा विमा हप्ता वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक यापैकी कोणत्याही एका पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

jeevan umang plan in marathi: उदाहरण

जर तुमचं वय 30 वर्षं असेल आणि तुम्हाला ₹20 लाख रुपयांची विमा रक्कम निवडायची असेल, तर तुम्हाला पहिल्या वर्षी ₹1,10,893 वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. दुसऱ्या वर्षी हाच प्रीमियम ₹1,08,506 असेल. हे प्रीमियम एकूण 20 वर्ष भरायचे आहेत. हे गणित तुमच्या वयोमानानुसार आणि विमा रक्कमेनुसार बदलू शकते.

या संपूर्ण कालावधीमध्ये प्रीमियम स्वरूपात भरली जाणारी एकूण रक्कम असेल ₹21,72,507. प्रीमियम पेइंग टर्म संपल्यावरती ₹20 लाख रकमेसाठी योजनाधारकास ₹1,60,000 वार्षिक पेन्शन सुरु होईल. हि पेन्शन वयाच्या 50 वर्षांपासून सुरू होईल आणि 60 वयापर्यंत असेल. संपूर्ण 11 वर्षांमध्ये पेन्शनस्वरूपात योजनाधारकास एकूण ₹17,60,000 एवढी रक्कम मिळेल. वयाच्या 60 व्या वर्षी हि योजना बंद करायची आहे, त्यावेळी त्याची सरेंडर व्हॅल्यू रक्कम ₹69,01,600 हि LIC कडून योजनधारकास परत मिळेल.

म्हणजेच पेन्शन स्वरूपात मिळणारी रक्कम ₹17,60,000 आणि सरेंडर व्हॅल्यू ₹69,01,600 अशी एकूण रक्कम ₹86,61,600 योजनाधारकास मिळणार आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये ₹40 लाख रकमेचे लाईफ कव्हर सुद्धा योजनाधारकास दिले जाणार आहे.

जीवन उमंग योजनेचे महत्व

जीवन उमंग योजना ही एक उत्कृष्ट योजना आहे, जी विमाधारकांना दीर्घकाळासाठी आर्थिक सुरक्षा आणि नियमित उत्पन्नाची खात्री देते. आपल्या आर्थिक भविष्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळवू शकता. जीवन उमंग योजना तुमच्या आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

jeevan umang plan in marathi
jeevan umang plan fund

हा jeevan umang plan in marathi लेख केवळ तुमच्या माहितीसाठी आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी किंवा तुमच्या विशिष्ट आवश्यकतांसाठी अधिकृत LIC विमा प्रतिनिधी किंवा जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. LIC ची अधिकृत वेबसाईट https://licindia.in/lics-jeevan-umang-plan-no.-945-uin-no.-512n312v02- ला भेट द्या.

जीवन उमंग योजनेच्या माध्यमातून तुम्ही आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळवू शकता. आजच एलआयसीच्या जीवन उमंग योजनेत सामील व्हा आणि आपल्या आर्थिक भविष्यासाठी सुरक्षितता मिळवा.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur