LIC Combination Plans: उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली, एलआयसी जीवन लाभ आणि मनी बॅक प्लान कॉम्बिनेशन.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

LIC Combination Plans: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) आपल्या प्रिय आयुर्विमा ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या विमा योजना प्रदान करत असते, या योजना ग्राहकांच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा, उद्दिष्टे आणि जीवनाच्या विविध टप्प्यांना ध्यानात ठेवून डिझाइन केलेल्या असतात. या काही योजना पैकी, एलआयसी जीवन लाभ आणि एलआयसी मनी बॅक प्लान हे त्यांच्या अनोख्या फायद्यांसाठी आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखलया जाणाऱ्या योजना आहेत.

LIC Combination Plans या दोन्ही योजना एकत्र घेतल्यास तुमची आर्थिक सुरक्षा, बचत आणि मनी बॅक निश्चित करणारे भविष्यातील संपूर्ण नियोजनाचे समाधान मिळते. या लेखामध्ये, आपण LIC जीवन लाभ आणि LIC मनी बॅक प्लानच्या कॉम्बिनेशनची वैशिष्ट्ये, फायदे, सेविंग चार्ट आणि या योजना एकमेकांना कशा पद्धतीने पूरक ठरतात हे समजून सांगितले आहे त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि समजून घ्या.

LIC Combination Plans
LIC Combination Plans

एलआयसी जीवन लाभ योजना काय आहे?

एलआयसी जीवन लाभ ही एक नॉन-लिंक्ड, विथ-प्रॉफिट, मर्यादित प्रीमियम पेमेंट असलेली एंडोमेंट योजना आहे, जी संरक्षण आणि बचत यांचे संयोजन प्रदान करते. ही योजना पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या बाबतीत कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते. पॉलिसीधारकाने निवडलेल्या पॉलिसी कालावधीच्या शेवटी, मॅच्युरिटी वेळी, एकत्रित विमा रक्कम आणि बोनस दिला जातो. LIC Combination Plans

एलआयसी जीवन लाभच्या मुख्य वैशिष्ट्ये:

  1. मर्यादित प्रीमियम पेमेंट कालावधी: पारंपारिक विमा योजनांमध्ये, पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीसाठी प्रीमियम भरावे लागतात. परंतु एलआयसी जीवन लाभमध्ये मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरण्याची सोय आहे, जे आर्थिकदृष्ट्या सोपे जाते.
  2. मृत्यू लाभ: पॉलिसी कालावधी दरम्यान पॉलिसीधारकाच्या मृत्यू झाल्यास, नॉमिनी व्यक्तीला डेथ सम अश्युअर्ड, रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस (असल्यास) डेथ क्लेम म्हणून मिळतो.
  3. मॅच्युरिटी लाभ: पॉलिसी कालावधी सम्पल्यावरती शेवटी पॉलिसीधारकास मॅच्युरिटी म्हणून सम अश्युअर्ड, रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस दिला जाईल.
  4. कर्ज सुविधा: योजना सुरु केल्यापासून तीन वर्षानंतर, पॉलिसीमध्ये कर्ज सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे आर्थिक अडचणीच्या काळात मदत मिळू शकते.
  5. उच्च सम अश्युअर्डवर सूट: हाय सम अश्युअर्ड निवडल्यास, पॉलिसीधारकांना प्रीमियममध्ये सूट मिळते, ज्यामुळे ही योजना अजून फायदेशीर ठरते.
  6. कर फायदे: LIC जीवन लाभ अंतर्गत भरलेले सर्व प्रीमियम आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीस पात्र आहेत, आणि मॅच्युरिटी रक्कम कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त आहे.

एलआयसी मनी बॅक योजना काय आहे?

एलआयसी मनी बॅक योजना ही एक नॉन-लिंक्ड, नफ्यामध्ये सहभागी असलेली पॉलिसी आहे, जी पॉलिसी कालावधीत काही ठराविक अंतराने मनी बॅक लाभ म्हणून काही टक्केवारीच्या स्वरूपात पैसे देते. यामुळे तरलता मिळते आणि विमा संरक्षण आणि मनी बॅक परताव्याची आवश्यकता पूर्ण होते. LIC Combination Plans

एलआयसी मनी बॅक योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:

  1. नियतकालिक परतावे: पॉलिसी कालावधीत निश्चित टक्केवारीमध्ये सम अश्युअर्डच्या रूपात नियतकालिक परतावे दिले जातात, ज्यामुळे तरलता सुनिश्चित होते आणि अल्पकालीन काळात लागणाऱ्या आर्थिक गरजा पूर्ण होतात.
  2. मृत्यू लाभ: पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या बाबतीत, नॉमिनी व्यक्तीला आधी दिलेल्या मनी बॅक लाभाची वाजवत न करता पूर्ण विमा रक्कम आणि बोनस दिला जातो.
  3. मॅच्युरिटी लाभ: पॉलिसी कालावधी संपल्यानंतर पॉलिसीधारकास मनी बॅक रक्कम सोडून, उर्वरित सम अश्युअर्ड, रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस दिला जातो.
  4. बोनस सुविधा: ही योजना महामंडळाच्या नफ्यात सहभागी आहे आणि बोनससाठी पात्र आहे, ज्यामुळे एकूण परतावा रकमेमध्ये वाढ होते.
  5. कर्ज सुविधा: योजना सुरु केल्यापासून तीन वर्षानंतर, पॉलिसीमध्ये कर्ज सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे आर्थिक अडचणीच्या काळात मदत मिळू शकते.
  6. कर फायदे: इतर LIC योजनांप्रमाणे, LIC मनी बॅक योजनेअंतर्गत भरलेले सर्व प्रीमियम कलम 80C अंतर्गत कर कपातीस पात्र आहेत आणि मॅच्युरिटी लाभ कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त आहेत.
LIC Combination Plans
LIC Combination Plans

एलआयसी जीवन लाभ आणि एलआयसी मनी बॅक योजनेचे कॉम्बिनेशन फीचर्स.

एलआयसी जीवन लाभ आणि एलआयसी मनी बॅक योजना यांचे कॉम्बिनेशन दीर्घकालीन बचत आणि अल्पकालीन तरलता सुनिश्चित करणारी एक ठोस आर्थिक योजना आहे. या योजना एकत्र कशा काम करतात हे पाहूया:

आर्थिक सुरक्षा: LIC जीवन लाभ दीर्घकालीन बचत आणि मॅच्युरिटी लाभ प्रदान करते, तर LIC मनी बॅक योजना नियमित मनी बॅक देते जी तात्काळ आर्थिक गरजांसाठी वापरता येतात. या कॉम्बिनेशनमुळे तुम्हाला पॉलिसी कालावधीत कायम, ठराविक पैसे परत मिळतात, तसेच भविष्यासाठी एकत्रित रक्कम मिळते.

लाइफ कव्हर :दोन्ही योजनांमध्ये मृत्यू लाभ फायदा उपलब्ध आहे, त्यामुळे पॉलिसीधारकाच्या अचानक मृत्यूच्या बाबतीत, कुटुंबाला दोन्ही योजनांमधून मोठ्या प्रमाणात पेमेंट मिळते, ज्यामुळे त्यांना संपूर्ण आर्थिक सुरक्षा मिळते.

लवचिक प्रीमियम पेमेंट: LIC जीवन लाभच्या मर्यादित प्रीमियम पेमेंट कालावधीमुळे तुम्ही तुमची रक्कम अधिक प्रभावीपणे मॅनेज करू शकता, तर LIC मनी बॅक योजनेच्या नियमित मनी बॅक परताव्यांमुळे गरज पडल्यास, प्रीमियम पेमेंटसाठी सहाय्य होऊ शकते.

कर : या योजनांचे संयोजन करून, तुम्ही आयकर कलम 80C आणि 10(10D) अंतर्गत तुमच्या कर बचतीचे अधिकतम लाभ घेऊ शकता, ज्यामुळे तुमची एकूण कर योजना अधिक चांगली होते.

कर्ज सुविधा: या दोन्ही योजना कर्ज सुविधा देतात, याचा अर्थ तुम्हाला तुमच्या बचतींचे कोण्याही पद्धतीचे नुकसान न करता आपत्कालीन परिस्थितीत काही ठराविक निधी मिळू शकतो.

LIC Combination Plans Saving Chart

LIC Combination Plans LIC जीवन लाभ आणि LIC मनी बॅक योजनेच्या संयोजनाचा फायदा कसा होतो हे समजण्यासाठी एक उदा. बचत चार्ट पाहूया. हा चार्ट एका 30 वर्षीय पॉलिसीधारकासाठी आहे, ज्याने LIC जीवन लाभ पाच लाख विमा रक्कम साठी 25 वर्षांची पॉलिसी कालावधी आणि LIC मनी बॅक पाच लाख इमा रक्कम योजनेसाठी 25 वर्षांची पॉलिसी कालावधी निवडली आहे, दोन्हींचे एकत्रित सम अश्युअर्ड INR 10,00,000 आहे.

LIC Combination Plans या कॉम्बिनेशन साठी जीवन लाभ योजनेमध्ये 16 वर्षे हप्ता भरायचा आहे आणि मनी बॅक योजनेसाठी 20 वर्ष हप्ता भरायचा आहे. एकत्रित मिळून, एकूण 9,75,000/- रु. प्रीमियम अनुक्रमे 16 आणि 20 वर्षे कालावधीमध्ये आपणास भरायचा आहे

वर्षLIC जीवन लाभ (परिपक्वता + बोनस)LIC मनी बॅक (money back)एकत्रित लाभ (क्यूम्यलेटिव्ह)
575,000 (15% SA)1st money back
1075,000 (15% SA)2st money back
1575,000 (15% SA)3st money back
2075,000 (15% SA)4st money back
25(SA + बोनस)2,00,000 (40% SA) + बोनस
At Maturity after 25 years5,00,000 + 5,87,500 + 2,25,000= 13,12,500/-2,00,000 + 5,12,500 + 1,12,500 = 8,25,000/-
(4 money back amount already taken)
13,12,500 + 8,25,000 = 21,37,500/- (+ 4 money back amount 75,000 * 4 = 3,00,000, exact total 24,37,500/-)
LIC Combination Plans

टीप: वरील आकडे प्रतीकात्मक आहेत आणि प्रत्यक्ष लाभ LIC द्वारे घोषित केलेल्या बोनस आणि पॉलिसीच्या अटींवर अवलंबून असतील.

कॉम्बिनेशनचे फायदे

LIC Combination Plans या दोन्ही प्लॅन कॉम्बिनेशन मुळे तुम्हाला वाढीव संरक्षण मिळते आणि तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळतो. मनी बॅक परतावे आणि दीर्घकालीन मॅच्युरिटी लाभ एकत्र करून, तुम्ही तुमच्या वित्तीय गरजा अधिक लवचिकतेने पूर्ण करू शकता. उच्च सम अश्युअर्डसह दोन्ही योजना निवडून, तुम्ही तुमच्या कर बचतीचे लाभ अधिकतम करू शकता. या दोन्ही योजना सुरु करून, तुम्ही तुमच्या जोखीम वाढवता आणि एकाच योजनांवर अवलंबून राहत नाही. LIC जीवन लाभ आणि LIC मनी बॅक योजना दोन्हींचे कॉम्बिनेशन तुम्हाला अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आर्थिक समाधान देते.

LIC Combination Plans निष्कर्ष

LIC जीवन लाभ आणि LIC मनी बॅक योजना यांचे संयोजन आर्थिक सुरक्षा आणि वृद्धीचा एक संतुलित दृष्टिकोन सादर करते. दीर्घकालीन बचतीपासून तर मनी बॅक तरलतेपर्यंत, हे कॉम्बिनेशन तुमच्या आर्थिक भविष्याची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करू शकते. एलआयसीच्या या योजनांच्या मदतीने तुमचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करा आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी या संधीचा लाभ घ्या.

एलआयसीच्या अधिक माहितीसाठी https://licindia.in/web/guest/products येथे क्लिक करा!

एलआयसी LIC Combination Plans योजनांची निवड करणे ही तुमच्या आर्थिक भविष्याची सर्वात महत्वाची गुंतवणूक आहे. योग्य निवड करून तुमच्या आणि तुमच्या प्रियजणांच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली ठरवा.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur