PM Yashasvi Yojana: केंद्र सरकारची मोठी घोषणा; ₹1.25 लाख स्कॉलरशिप, ₹2 लाख फी आणि लॅपटॉप, विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक मदत.

WhatsApp Group Join Now

PM Yashasvi Yojana: देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत, ओबीसी (OBC), ईबीसी (EBC) आणि डीएनटी (DNT) प्रवर्गातील मेधावी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

केंद्र सरकारने पीएम यशस्वी योजना (PM YASASVI Scholarship 2025) अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीत बदल केल्याची अधिकृत माहिती उपलब्ध झाली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ₹1.25 लाखांपर्यंत स्कॉलरशिप, ₹2 लाखांपर्यंत शाळा व कॉलेज फी, तसेच लॅपटॉपसाठी ₹45,000 इतकी मोठी मदत दिली जाणार आहे.

केंद्र सरकारचे हे पाऊल गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मोठी संधी बनत आहे. अनेक शेतकरी, कामगार आणि सामान्य कुटुंबातील मुलांसाठी ही योजना उच्च शिक्षणाची दारे उघडणारी ठरणार आहे.

पीएम यशस्वी योजना म्हणजे काय?

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने PM YASASVI योजना सुरू केली आहे. योजनेचा पूर्ण अर्थ आहे; PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India.

या योजनेचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील विद्यार्थ्यांना 9वी च्या वर्गापासून ते पोस्ट ग्रेजुएशनपर्यंत सातत्याने आर्थिक मदत मिळते. ही योजना फक्त स्कॉलरशिप देऊन थांबत नाही, तर विद्यार्थ्यांना टॉप क्लास शाळा आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासही मदत करते.

सरकारी आकडेवारीनुसार, मागील काही वर्षांत या योजनेचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतला असून 2026 मध्ये या योजनेचा विस्तार आणखी वाढणार आहे.

PM Yashasvi Yojana
PM Yashasvi Yojana

योजनेचे उद्देश; उच्च शिक्षणासाठी सरकारची मोठी पुढाकार

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की OBC, EBC आणि DNT विद्यार्थ्यांमध्ये मोठी प्रतिभा असूनही आर्थिक कारणांमुळे अनेकांना शैक्षणिक संधी मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना 9वी ते 12वी आणि त्यानंतरच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक आधार देणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेद्वारे:

  • विद्यार्थी आर्थिक अडथळ्यांशिवाय उच्च शिक्षण घेऊ शकतील
  • प्रीमियम शाळा व कॉलेजमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होईल
  • गुणवंत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल
  • स्पर्धात्मक परीक्षा व व्यावसायिक कोर्सेससाठी आर्थिक पाठबळ मिळेल
हा लेख वाचा-  Ration card correction online: रेशन कार्डवर नाव किंवा जन्मतारीख चुकीची आहे? आता घरबसल्या करा ऑनलाइन दुरुस्ती; जाणून घ्या सोपी पद्धत.

योजनेचा प्राथमिक हेतू म्हणजे “गुण, परिश्रम आणि प्रतिभा असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जावे; आर्थिक कमीपणा अडथळा होऊ नये.”

पीएम यशस्वी योजनेतील 5 प्रमुख उपयोजना

केंद्र सरकारने या स्कॉलरशिपला पाच विभागात विभागले आहे:

Pre-Matric Scholarship (9वी–10वी): सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत केली जाते.

Post-Matric Scholarship: 10वी नंतर डिप्लोमा, डिग्री किंवा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही मदत आहे.

Top Class School Education Scheme: देशातील निवडक ‘टॉप क्लास’ शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मदत दिली जाते.

Top Class College Education Scheme: इंजिनियरिंग, मेडिकल, लॉ, मॅनेजमेंट आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ₹2 लाखांपर्यंत फी भरली जाते.

विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हॉस्टेल बांधकाम: देशभरात सुरक्षित आणि आधुनिक हॉस्टेल सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकार भर देत आहे.

पात्रता; कोण अर्ज करू शकतात?

सरकारने पात्रतेसंबंधी स्पष्ट नियम जाहीर केले आहेत:

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे
  • विद्यार्थी OBC, EBC किंवा DNT प्रवर्गातील असावा
  • एकाच वेळी दोन स्कॉलरशिप घेता येणार नाही
  • एकाच कोर्समध्ये पुन्हा प्रवेश घेतल्यास स्कॉलरशिप मिळणार नाही
  • फक्त दोन मुलांना या योजनेचा लाभ दिला जाईल

हे नियम पाळणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळण्याची संधी आहे.

स्कॉलरशिपचे फायदे; रक्कम किती मिळणार?

1) Pre-Matric विद्यार्थ्यांसाठी: ₹4,000 प्रति वर्ष

हा लेख वाचा-  E Passport of India: आता विमान प्रवास होणार अधिक Secure आणि डिजिटल, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया व फायदे!

2) Post-Matric विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप (तपशील):

ग्रुपकोर्सभत्ताट्यूशन फीएकूण रक्कम
ग्रुप 1डिग्री/PG प्रोफेशनल₹10,000₹10,000₹20,000
ग्रुप 2डिप्लोमा/सर्टिफिकेट₹8,000₹5,000₹13,000
ग्रुप 3सामान्य डिग्री₹6,000₹2,000₹8,000
ग्रुप 4नॉन-डिग्री₹5,000–₹5,000

3) Top Class School Education

  • 9वी–10वी: ₹75,000
  • 11वी–12वी: ₹1,25,000

4) Top Class College Education

  • प्रायव्हेट कॉलेज फीस: ₹2 लाखांपर्यंत संपूर्ण
  • पायलट कोर्स: ₹3.72 लाख मदत
  • राहणीमानासाठी: ₹3,000 प्रति महिना
  • पुस्तके/स्टेशनरी: ₹5,000
  • लॅपटॉपसाठी: ₹45,000

ही मदत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

स्कॉलरशिपची रक्कम खात्यात कधी जमा होते?

सरकारने स्पष्ट केले आहे की संपूर्ण रक्कम DBT (Direct Benefit Transfer) द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. दरवर्षी स्कॉलरशिपची रक्कम 15 ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना पाठवली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होताच आवश्यक खर्चासाठी पैसे उपलब्ध होतात.

अर्ज प्रक्रिया; संपूर्ण माहिती

PM YASASVI साठी अर्ज National Scholarship Portal (NSP) वर करावा लागतो.

STEP 1 – Registration

  1. NSP अधिकृत वेबसाइट उघडा: https://yashasvi.aicte.gov.in/
  2. New Registration वर क्लिक करा
  3. सर्व माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा
  4. मिळालेल्या user ID आणि password ने लॉग इन करा

STEP 2 – Application

  1. लॉग इन करून PM YASASVI Scholarship निवडा
  2. अर्ज फॉर्म भरा
  3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  4. फॉर्म सबमिट केल्यानंतर शाळा व राज्य सरकार पडताळणी करेल
PM Yashasvi Yojana
PM Yashasvi Yojana

आवश्यक कागदपत्रांची यादी

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक मार्कशीट
  • पासपोर्ट फोटो
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • निवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागल्यास)
हा लेख वाचा-  PM Fasal Bima Yojana Update: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 12% व्याजासह मिळेल पीक विमा भरपाई!

PM Yashasvi Yojana

एकूणच पाहता, PM Yashasvi Yojana ही देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, प्रतिभावान आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने दिलेली एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे.

या योजनेचा उद्देश फक्त शिष्यवृत्ती देणे नाही, तर प्रत्येक सक्षम विद्यार्थ्याला समान शिक्षणाचा हक्क मिळावा, त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा मिळावी आणि शिक्षणातील आर्थिक अडथळे पूर्णपणे दूर व्हावेत हा आहे.

अनेक वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ न मिळाल्याने त्यांच्या प्रतिभेचा उपयोग देशासाठी होऊ शकत नव्हता. याच समस्येची दखल घेऊन या योजनेद्वारे आर्थिक सहाय्याचे मजबूत जाळे उभे करण्यात आले आहे.