LIC Jeevan Kiran: भविष्य सुरक्षित करण्याचा सोपा मार्ग, कमी प्रीमियममध्ये उच्च सुरक्षा मिळवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

LIC Jeevan Kiran: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही भारतीय विमा क्षेत्रातील एक विश्वसनीय आणि सुरक्षित विमा योजना प्रदान करणारी मुख्य संस्था आहे. LIC ने नेहमीच लोकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन विमा योजना विकसित केल्या आहेत आणि आपल्या ग्राहकांना सेवा पुरवत आहेत. याच अंतर्गत LIC ने नवीन प्युअर टर्म इन्शुरन्स योजना सुरु केली आहे जिचे नाव आहे, LIC जीवन किरण योजना. हा प्लान विशिष्ट कालावधीसाठी आयुर्विमा कवच देतो आणि विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार प्रदान करतो.

ही LIC Jeevan Kiran योजना कमी प्रीमियममध्ये उच्च विमा रक्कम मिळवण्याचा उत्तम पर्याय आहे. या लेखामध्ये आपण LIC जीवन किरण योजनेच्या वैशिष्ट्यांपासून, फायदे, अर्हता, प्रीमियम आणि मॅच्युरिटी लाभांपर्यंत सर्व माहिती मिळवणार आहोत. तसेच, ₹1 कोटी रकमेच्या विमा संरक्षण उदाहरणासह प्रीमियम आणि संरक्षण कसे मिळते ते देखील समजावून घेणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा, समजून घ्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा.

LIC Jeevan Kiran प्लान काय आहे?

LIC जीवन किरण ही एक शुद्ध टर्म इन्शुरन्स योजना आहे. या योजनेचा उद्देश केवळ विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक संरक्षण देणे हा आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग टर्म इंश्युरन्स योजना आहे, जी कमी प्रीमियममध्ये जास्त विमा संरक्षण पुरवते. जीवन किरण योजना सुरु केल्यापासून, घेतलेल्या मुदतीपर्यंत, विमाधारक हयात असेल तर, संपूर्ण टर्म मध्ये भरलेले प्रीमियम मुदत संपल्यानंतर योजनाधारकास मॅच्युरिटी अमाऊंट म्हणून परत दिले जातील, जे इतर कोणत्याही प्युअर टर्म इन्शुरन्स मध्ये परत मिळत नाहीत.

LIC Jeevan Kiran
LIC Jeevan Kiran

LIC Jeevan Kiran योजना अशा लोकांसाठी उपयुक्त आहे, ज्यांना त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याची सुरक्षितता विचारात घेऊन मोठी विमा रक्कम कवच, कमी प्रीमियममध्ये हवे आहे. विमाधारकाच्या मृत्यूनंतर, नामनिर्देशित व्यक्तीस मिळालेली विमा रक्कम दिली जाते, ज्यामुळे कुटुंबाचे भविष्यातील आर्थिक आव्हानांपासून संरक्षण होते.

LIC जीवन किरण योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे.

कमी प्रीमियममध्ये उच्च विमा संरक्षण: LIC जीवन किरण योजना मोठ्या रकमेचे संरक्षण कमी प्रीमियममध्ये देते, ज्यामुळे ही योजना सर्वसामान्यांना परवडणारी ठरते. जास्त विमा रकमेची योजना घेतल्यास प्रीमियम सवलत मिळते, ज्यामुळे ही योजना अजून किफायतशीर होते.

मृत्यूनंतरच्या लाभाचे पर्याय: पॉलिसीधारकाला कुटुंबासाठी मृत्यूनंतर एकरकमी रक्कम किंवा टप्प्याटप्प्याने मिळणारे पेमेंट्स निवडण्याचा पर्याय आहे.

कर लाभ: या योजनेत भरलेले प्रीमियम आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत करमुक्त असतात, तसेच मृत्यूनंतर (किंवा मॅच्युरिटी च्या वेळेस मिळणारी रक्कम) मिळणारे लाभ 10(10D) अंतर्गत करमुक्त असतात.

उच्च विमा रकमेवर प्रीमियम सवलत: ₹50 लाख किंवा त्यापेक्षा जास्त विमा रक्कम घेतल्यास प्रीमियमवर विशेष सवलत मिळते.

मृत्यूनंतरचा लाभ: पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला विमा रक्कम मिळते, ज्यामुळे त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित राहते.

मॅच्युरिटी: या योजनेत विमा रकमेवरती बोनस दिला जात नाही, मॅच्युरिटी तारखेपर्यंत विमेदार हयात असेल तर भरलेले सर्व प्रीमियम परत मिळण्याची सोय या योजनेमध्ये आहेत.

कमी प्रीमियम: टर्म इंश्युरन्स योजना असल्यामुळे, या योजनेचे प्रीमियम साधारण योजना तुलनेत खूप कमी असतात.

अतिरिक्त रायडर: या योजनेसोबत अपघाती मृत्यू लाभ पर्याय उपलब्ध आहे.

लवचिक पेमेंट पर्याय: एकरकमी रक्कम किंवा टप्प्याटप्प्याने मिळणारे लाभ कुटुंबासाठी निवडता येतात.

LIC जीवन किरण योजनेसाठी पात्रता

  • किमान वय: 18 वर्षे.
  • कमाल वय: 65 वर्षे.
  • किमान विमा रक्कम: ₹25 लाख.
  • कमाल विमा रक्कम: कमाल मर्यादा नाही. (LIC च्या अंडररायटिंगनुसार)
  • पॉलिसी मुदत: 10 ते 40 वर्षे.
  • प्रीमियम पद्धत: वार्षिक किंवा सहामाही (योजनाधारकांच्या वय आणि निवडलेल्या टर्म नुसार)
  • प्रीमियम भरण्याची मुदत: निवडलेल्या पोलिसी टर्म पर्यंत किंवा सिंगल प्रीमियम मोड.

LIC जीवन किरण उदाहरण

LIC Jeevan Kiran ₹1 कोटी विमा रक्कमसह योजनेचा प्रीमियम आणि लाभ समजण्यासाठी पुढील उदाहरण दिले आहे. हि योजना ₹1 कोटी, नैसर्गिक विमा संरक्षण आणि ₹2 कोटी रुपये अपघाती मृत्य लाभ साठी असेल: वय: 40 वर्षे, विमा रक्कम: ₹1 कोटी, पॉलिसी मुदत: 40 वर्षे, प्रीमियम पेमेंट मुदत: 40 वर्षे, प्रीमियम भरण्याची पद्धत: वार्षिक

40 वर्षांच्या वयोगटातील कोणत्याही स्त्री किंवा पुरुष विमाधारकासाठी, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीसाठी, ₹1 कोटी विमा रकमेचा प्रीमियम: पहिल्या वर्षी वार्षिक ₹70,970 (विमा तपासणीवर अवलंबून) असेल. दुसऱ्या वर्षांपासून वार्षिक प्रीमियम ₹69,442 असेल. एकूण 40 वर्षाच्या पॉलिसी मुदतीमध्ये ₹25,16,560 रक्कम प्रीमियम स्वरूपात भरली जाईल.

मृत्यूनंतरचा लाभ: संपूर्ण 40 वर्षाच्या कालावधीमध्ये विमाधारकाचा केंव्हाही, कोणत्याही कारणाने नैसर्गिक मुत्यू झाला तर नॉमिनीला ₹1 कोटीची रक्कम मिळेल आणि अपघाती मृत्यू स्वरूप प्राप्त झाले तर ₹2 कोटी रक्कम नॉमिनीला दिले जातील. हि रक्कम नॉमिनी सिंगल रक्कम मध्ये घेऊ शकतो किंवा पुढच्या काही वर्षांसाठी टप्प्या टप्प्याने घेऊ शकतो.

मॅच्युरिटी लाभ: योजनाधारकाने घेतलेली मुदत संपेपर्यंत म्हणजेच मॅच्युरिटी तारखेपर्यंत विमेदार हयात असेल तर भरलेले सर्व प्रीमियम (अतिरिक्त रायडर चा प्रीमियम वगळून) मॅच्युरिटी अमाऊंट म्हणून परत मिळण्याची सोय या योजनेमध्ये आहे. LIC जीवन किरण योजना संपूर्ण पॉलिसी मुदतीत जोखीम कवच प्रदान करते. विमाधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला संपूर्ण विमा रक्कम दिली जाते.

LIC Jeevan Kiran
LIC Jeevan Kiran

LIC जीवन किरण योजना कोणासाठी उपयुक्त आहे?

  • कमी प्रीमियममध्ये जास्त विमा संरक्षण शोधणारे.
  • कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता शोधणारे.
  • वित्तीयदृष्ट्या अवलंबून असणारे जसे की जोडीदार, मुले, वृद्ध पालक.
  • कर सवलती शोधणारे.

LIC जीवन किरण योजना का निवडावी ?

  1. लाइफ कव्हर: कमी प्रीमियममध्ये मोठे विमा संरक्षण मिळते.
  2. विश्वसनीयता: LIC चा उत्तम क्लेम सेटलमेंट रेशो आहे.
  3. सुलभ प्रीमियम: शुद्ध टर्म योजना असल्यामुळे प्रीमियम कमी आहे.
  4. लवचिक पेमेंट पर्याय: एकरकमी किंवा वार्षिक, सहामाही पेमेंट पर्याय.

LIC Jeevan Kiran निष्कर्ष

LIC जीवन किरण ही योजना कमी प्रीमियममध्ये जास्त संरक्षण शोधणाऱ्यांसाठी उत्कृष्ट आहे. ₹1 कोटी विमा रक्कमेच्या उदाहरणातून वार्षिक ₹70,970 चा प्रीमियम भरून कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळवू शकता. तुमच्या गरजेनुसार ही योजना निवडता येते, आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करता येते.

LIC Jeevan Kiran अधिक माहितीसाठी आपल्या LIC आयुर्विमा प्रतिनिधींशी संपर्क करा आणि हि योजना अजून चांगल्या पद्धतीने समजून घ्या किंवा जवळच्या LIC शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. LIC अधिकृत वेबसाईट https://licindia.in/lic-sjeevan-kiran-plan-no-870-uin-no-512n353v01 ला भेट द्या.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024 waterfalls near kolhapur