LIC New Jeevan Shanti: एलआयसीचा नवीन पेन्शन प्लॅन ‘जीवन शांती’ काय आहे? जाणून घ्या सविस्तर.

LIC New Jeevan Shanti: आजच्या धकाधकीच्या आणि वेगाने बदलणाऱ्या आर्थिक जगात प्रत्येक व्यक्तीला आपला भविष्यातील निवृत्तीचा काळ (retirement period) निश्चिंत आणि सुखकर व्हावा अशी इच्छा असते. आपल्या उमेदीच्या काळात आपण अनेक स्वप्ने पाहतो; घर खरेदी, मुलांना चांगले शिक्षण आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि सर्वात शेवटी वृद्धापकाळात आपले आयुष्य निश्चिंत जगणे यासाठी नियोजन करणे.

दररोज महागाई वाढत चालली आहे, वैद्यकीय खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत आणि नियमित उत्पन्नाचा स्रोत थांबल्यावर आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला एक असा प्लॅन हवा जो तुमचे भविष्य सुरक्षित करून देईल आणि तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी आर्थिक आधार देईल. त्यासाठी एलआयसीचा नवीन जीवन शांती प्लॅन (LIC New Jeevan Shanti) जो तुम्हाला एकदाच गुंतवणूक करून भविष्यातील काळासाठी नियमित पेन्शन देतो.

नवीन जीवन शांती प्लॅन हा एक अत्याधुनिक आणि विश्वासार्ह ॲन्युइटी प्लॅन असून तुमच्या निवृत्तीला खऱ्या अर्थाने “शांती” देतो. या योजनेत तुम्हाला डिफर्ड ॲन्युइटी म्हणजेच भविष्यात सुरू होणारी पेन्शन पेमेंट खरेदी करण्याचा पर्याय मिळतो. याचा अर्थ तुम्ही आज एकदाच गुंतवणूक करून ठेवता आणि ठराविक वर्षांनंतर तुम्हाला त्यावरून दरमहिना किंवा दरवर्षी ठरलेले उत्पन्न मिळू लागते.

यामध्ये तुम्हाला फक्त एकरकमी रक्कम जमा करावी लागते आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यभर ठराविक रकमेची पेन्शन मिळत राहते. हा प्लॅन विशेषतः त्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे जे आपल्या नोकरीच्या काळातच निधी सुरक्षित करून ठेवू इच्छितात आणि निवृत्तीनंतर आरामशीर आणि चिंता‑मुक्त जीवन जगू इच्छितात.

LIC New Jeevan Shanti
LIC New Jeevan Shanti

डिफर्ड ॲन्युइटी प्लॅन का खरेदी करायचा?

निवृत्तीनंतर किंवा आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर आपल्यासाठी निश्चित उत्पन्नाचे साधन उपलब्ध असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. डिफर्ड ॲन्युइटी प्लॅन खरेदी केल्याने तुम्हाला तुमच्या भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहता येते. हा प्लॅन अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की तुम्ही तुमच्या वयाच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा निवृत्तीनंतर ठराविक निधी साठवू शकता आणि या साठवलेल्या रकमेवर आधारित तुम्हाला नियमित मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन मिळत राहते.

या LIC New Jeevan Shanti योजनेमुळे केवळ आर्थिक सुरक्षा मिळत नाही, तर आयुष्यभरासाठी स्थिर उत्पन्नाची खात्री मिळते, ज्यामुळे वृद्धापकाळात हा एक मोठा आधार ठरतो.

निवृत्ती उत्पन्न; तुमच्या आयुष्याची सुरक्षितता

निवृत्ती हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. नोकरी किंवा व्यवसायातून उत्पन्न थांबल्यानंतरही आपली जीवनशैली कायम ठेवण्यासाठी नियमित उत्पन्न गरजेचे असते. डिफर्ड ॲन्युइटी प्लॅन घेतल्यास तुम्ही कामकाजाच्या काळात केलेली गुंतवणूक निवृत्तीच्या वेळी तुमच्या हाती आजीवन उत्पन्न म्हणून परत येते. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, वैद्यकीय खर्चासाठी किंवा दैनंदिन गरजांसाठी हा निधी उपयोगी पडतो. हा प्लॅन म्हणजे तुम्हाला वृद्धापकाळातही आर्थिक स्वावलंबनाची ताकद देतो.

सिंगल प्रीमियम पेमेंट

अनेक डिफर्ड ॲन्युइटी प्लॅन (Deferred Annuity Plans) मध्ये प्रीमियम भरण्याबाबत लवचिकता दिली जाते. काही योजनांमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीपर्यंत हप्त्यांमध्ये प्रीमियम भरावे लागतात, तर काही योजनांमध्ये फक्त एकदाच एकरकमी रक्कम भरून योजना सुरू करता येते.

LIC New Jeevan Shanti
LIC New Jeevan Shanti

एलआयसीचा नवीन जीवन शांती प्लॅन (LIC New Jeevan Shanti Plan) ही दुसऱ्या प्रकारातील योजना आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच सिंगल प्रीमियम भरावा लागतो. एकदा ही रक्कम भरल्यानंतर तुम्हाला पुढील हप्ते भरण्याची गरज नसते. तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार तुम्ही कमी किंवा जास्त रक्कम निवडू शकता.

म्हणजेच, ही योजना तुम्हाला गुंतवणुकीसाठी स्वातंत्र्य देते. तुम्ही कितीही रक्कम गुंतवली तरी ती एकदाच भरायची आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण आयुष्यभरासाठी निश्चित आणि नियमित पेन्शन मिळत राहते. यामुळे भविष्यातील आर्थिक नियोजन करणे अधिक सोपे व सुरक्षित होते.

काही सेवानिवृत्ती योजनांमध्ये वार्षिक गुंतवणुकीची मर्यादा असते, पण डिफर्ड ॲन्युइटी प्लॅनमध्ये साधारणपणे अशी मर्यादा नसते. तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार, हवे तेवढे प्रीमियम भरून रक्कम जमा करता येते. (No contribution limits; invest as much as you want) त्यामुळे ज्यांना जास्तीत जास्त निवृत्ती निधी जमा करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना आदर्श ठरते.

Also Read:-  Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातानंतर LIC चा मोठा निर्णय; मृतांचे क्लेम सेटलमेंट तातडीने पूर्ण होणार.

आयुष्यभर उत्पन्न; वृद्धापकाळाचा खरा आधार

डिफर्ड ॲन्युइटी प्लॅन म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यभरासाठी आर्थिक सुरक्षितता मिळवून देणारा साथीदार. अनेक लोक वृद्धापकाळात आपली बचत संपेल या भीतीने घाबरलेले असतात, पण या LIC New Jeevan Shanti योजनेतून मिळणारे आजीवन पेमेंट त्यांना मनःशांती देते. तुम्ही कितीही जगलात तरी हा प्लॅन तुमच्या आयुष्यभर नियमित उत्पन्न देत राहतो.

₹15 लाख गुंतवणुकीचे उदाहरण

समजा, तुम्ही एलआयसीचा नवीन जीवन शांती प्लॅन एकरकमी घेण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही त्यात ₹15,00,000 इतकी रक्कम गुंतवली.

LIC New Jeevan Shanti
LIC New Jeevan Shanti

या रकमेवर आधारित, LIC तुमच्यासाठी ठराविक कालावधीनंतर पेन्शन देण्यास सुरुवात करते. उदाहरणार्थ, जर तुम्ही आज हा प्लॅन खरेदी केला आणि डिफर्ड कालावधी म्हणजे वेटिंग पिरियड (पेन्शन सुरु होण्याचा कालावधी) 5 वर्षे ठेवला, तर आजपासून 5 वर्षांनंतर LIC तुम्हाला दर महिन्याला किंवा दर वर्षाला आजची ठरलेली पेन्शन देऊ लागेल.

LIC नवीन जीवन शांती प्लॅन; 2025 चे पेन्शन दर

डिफर्ड कालावधी (Deferment Period)वार्षिक पेन्शन
(Yearly Pension)
सहामाही पेन्शन
(Half-Yearly
Pension)
त्रैमासिक पेन्शन (Quarterly Pension)मासिक पेन्शन (Monthly Pension)
1 वर्ष6.80%6.66%6.60%6.53%
2 वर्षे7.29%7.14%7.07%7.00%
3 वर्षे7.80%7.64%7.57%7.49%
4 वर्षे8.35%8.18%8.10%8.02%
5 वर्षे8.62%8.45%8.36%8.28%

गुंतवणूक तपशील (उदाहरण)

  • एकरकमी गुंतवणूक: ₹15,00,000
  • डिफर्ड कालावधी: 5 वर्षे (तुम्ही निवडू शकता)
  • पेन्शन पर्याय: मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक

किती उत्पन्न मिळेल?

या LIC New Jeevan Shanti चा 8.62% वार्षिक 2025 चा पेन्शन दर आहे, तर आज पासून 5 वर्षानंतर: ₹15,00,000 × 8.62% = ₹1,29,300 वार्षिक पेन्शन म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला ₹10,344 मिळू लागेल.

या उदाहरणातून काय समजते?

एकदा तुम्ही ₹15 लाख गुंतवले, की तुम्हाला पुढील आयुष्यभर नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळतो. वृद्धापकाळात नोकरी न करताही तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम मिळत राहते. डेथ बेनिफिटमुळे तुमच्या कुटुंबालाही संरक्षण मिळते.

₹15,00,000 गुंतवणुकीचे पुढील 1, 2, 3, 4, 5 वर्ष डिफर्ड कालावधीचे उदाहरण.

(टीप: हे उदाहरण वय 35 च्या स्त्री किंवा पुरुष विमाधारकासाठी आहे. हे दर वार्षिक पेन्शन, सहामाही पेन्शन, त्रैमासिक पेन्शन आणि मासिक पेन्शनसाठी स्वतंत्र आहेत. तुम्ही जितका जास्त deferment period निवडता, तितका पेन्शन दर वाढतो. प्रत्यक्ष दर आणि अंतिम रक्कम जाणून घेण्यासाठी LIC आयुर्विमा प्रतिनिधी/एजंटशी संपर्क करा)

डेथ बेनिफिट; कुटुंबासाठी सुरक्षितता

या LIC New Jeevan Shanti योजनेचा अजून एक मोठा फायदा म्हणजे डेथ बेनिफिट. जर पॉलिसी चालू असताना म्हणजेच पॉलिसीधारकास पेन्शन मिळू लागल्यानंतर कोणत्याही कारणाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील ठरवलेल्या व्यक्तीला (नॉमिनीला) पॉलिसीधारकाने भरलेली रक्कम (या उदा. मधील ₹15,00,000) परत मिळते. यामुळे पॉलिसीधारक नसतानाही कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. म्हणजेच हा प्लॅन फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबासाठीही सुरक्षिततेची हमी देतो.

LIC New Jeevan Shanti

एलआयसीचा नवीन जीवन शांती प्लॅन हा केवळ एक साधा गुंतवणूक पर्याय नाही, तर तुमच्या भविष्यासाठी तयार केलेली एक मजबूत आर्थिक ढाल आहे. या योजनेमुळे निवृत्तीनंतर तुम्हाला हमी उत्पन्न मिळते, करसवलतीचे लाभ मिळतात आणि तुमच्या कुटुंबासाठीही सुरक्षिततेची खात्री मिळते.

आपल्या कमवण्याच्या काळात जमा केलेल्या निधीचे आजीवन फायदे मिळवायचे असतील, तर हा LIC New Jeevan Shanti प्लॅन तुमच्यासाठी एक परिपूर्ण निर्णय ठरू शकतो. आजच पाऊल उचला, तुमच्या LIC आयुर्विमा प्रतिनिधी/एजंटशी संपर्क साधा आणि तुमच्या भविष्याला नवी दिशा द्या!

LIC New Jeevan Shanti link: https://licindia.in/jeevan-shanti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment