LIC Online Premium Payment: भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही 1956 मध्ये भारत सरकारकडून स्थापन झालेली, भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह आयुर्विमा विमा कंपनी आहे. LIC दीर्घकाळापासून आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट विमा योजना पुरवत आहे. बदलत्या काळानुसार LIC च्या कामाच्या पद्धतीमध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. विविध आर्थिक योजना आणि आयुर्विमा संरक्षण पुरवणाऱ्या या संस्थेने डिजिटल युगात प्रवेश करून पॉलिसीधारकांसाठी आवश्यक ऑनलाइन सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पॉलिसीधारकांनी निवडलेल्या विमा योजनेसाठी ठराविक कालावधीत भरणा करायचा हक्क म्हणजे प्रीमियम. एलआयसी या जमा झालेल्या रकमांचा उपयोग विविध वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करते आणि काही काळानंतर उत्पन्नाच्या स्वरूपात योजनाधारकास त्याचा परतावा दिला जातो.
डिजिटलायजेशन फायदा LIC ने सुद्धा करून घेतला आहे. आता पॉलिसीहोल्डरना, त्यांचे प्रीमियम भरण्यासाठी LIC कार्यालयात गेलेच पाहुजे असे नाही तर, LIC ने प्रीमियम भरण्यासाठी काही ऑनलाईन माध्यमांचा वापर सुरु केला. योजनाधारक आपले प्रीमियम घरी बसून, आपल्या मोबाइलला वरून भरू शकतात. या लखा मध्ये या संदर्भात सर्व माहिती दिली आहे, हा लेख संपूर्ण वाचा, आपले LIC प्रीमियम भर आणि हा लेख इतरांना शेअर करा.
एलआयसीच्या ऑनलाइन प्रीमियम भरणा सुविधेचे फायदे
१. सोयीस्कर प्रक्रिया: ऑनलाईन प्रीमियम भरण्याची सुविधा तुम्हाला कुठूनही व कधीही वापरता येते, आपण आपला प्रीमियम केंव्हाही भरू शकतो.
२. तात्काळ पावती: पैसे भरल्यानंतर लगेच आपल्या ईमेल वरती, ई-पावती मिळते, जी तुमच्या LIC व्यवहाराचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी उपयोगी ठरते.
३. विविध पेमेंट पर्याय: ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट-क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय आयडी, इ. उपलब्ध असणारे मोबाइल वॉलेट चे विविध पर्याय द्वारे आपला प्रीमियम भरू शकतो.
४. सुरक्षितता: एलआयसीची ऑनलाईन सुविधा एनक्रिप्शन आणि ऑथेंटिकेशन वापरते, ज्यामुळे तुमची माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते, हि माहिती कुठेही चोरली जात नाही.
५. २४x७ सेवा उपलब्ध: २४*७ ऑनलाईन सुविधेमुळे तुम्हाला सुट्टीच्या दिवशी किंवा रात्रीसुद्धा पेमेंट करता येईल.
एलआयसीच्या ऑनलाईन पेमेंट चॅनल्स
एलआयसी विविध डिजिटल चॅनल्सद्वारे पॉलिसीधारकांना सुविधा देते.
एलआयसीची अधिकृत वेबसाईट
एलआयसी पोर्टल वर जाऊन नेट बँकिंग, यूपीआय किंवा कार्ड वापरून प्रीमियम भरता येतो.
सहभागी बँका
Axis Bank, Corporation Bank, IDBI Bank अशा बँकांशी भागीदारी असल्याने त्यांच्यामार्फतही पेमेंट करता येते.
सरकारी पोर्टल्स
AP Online, MP Online यांसारख्या पोर्टल्सद्वारे रोखीने प्रीमियम भरण्याची सुविधा मिळते.
LIC प्रतिनिधी यांच्याद्वारे
एलआयसीच्या मान्यताप्राप्त आयुर्विमा प्रतिनिधी किंवा LIC मधील निवृत्त कर्मचारी यांच्यामार्फतही प्रीमियम भरता येतो.
ऑनलाईन प्रीमियम भरण्याची प्रक्रिया
नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी:
- एलआयसीच्या वेबसाईटवर लॉगिन करा.
- युझर आयडी, पासवर्ड, व अन्य तपशील भरा.
- आपला पॉलिसी नंबर, जन्म तारीख इ. माहिती भरा.
- पॉलिसी निवडा आणि ‘Pay Premium’ वर क्लिक करा.
- पेमेंट पूर्ण केल्यानंतर ई-पावती मिळेल.
नोंदणीकृत नसलेल्या वापरकर्त्यांसाठी:
- ऑनलाईन पेमेंट पृष्ठ उघडा.
- ‘Pay Direct’ पर्याय निवडा.
- पॉलिसी तपशील आपला पॉलिसी नंबर, जन्म तारीख इ. माहिती भरा
- सबमिट करा.
- पेमेंट पूर्ण करून ई-पावती मिळवा.
प्रीमियम भरण्यासाठी अधिक पर्याय
नेट बँकिंगद्वारे
तुमच्या बँकेच्या पोर्टलवर जाऊन एलआयसीला बिल्लर म्हणून जोडून प्रीमियम भारत येतो. हि सोपी पद्धत सुद्धा वापरता येते.
क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे
भारतातील बहुतांश प्रमुख क्रेडिट कार्ड्स प्रीमियम पेमेंट्स साठी स्वीकारले जातात. व्यवहार करताना इतर सेवा शुल्काची माहिती देखील दाखवली जाते.
यूपीआय पेमेंटद्वारे
आपल्या मोबाइलला वरून यूपीआय आयडी चा वापर करून, पॉलिसी तपशील भरल्यानंतर थेट पैसे ट्रान्सफर करता येतात. यासाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप इ. चा वापर करू शकतो.
क्यूआर कोड स्कॅन द्वारे
एलआयसीच्या वेबसाईटवर क्यूआर कोड स्कॅन करून त्वरित भरणा करता येतो.
महत्त्वाच्या टीपा
- विलंब शुल्क: देय तारखेनंतर पेमेंट केल्यास ९.५% विलंब शुल्क भरावे लागते.
- आगाऊ भरणा: काही योजना ३० दिवस आधी तर काही फक्त १५ दिवस आधी प्रीमियम भरण्याची परवानगी देतात.
- फ्री सेवा: एलआयसी अधिकृत चॅनल्समधून प्रीमियम भरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
निष्कर्ष: LIC Online Premium Payment
एलआयसीने डिजिटायझेशनच्या माध्यमातून पॉलिसीधारकांसाठी प्रीमियम भरण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. त्यांच्या ऑनलाईन सुविधा पॉलिसीधारकांसाठी जलद, सुरक्षित व सोयीस्कर ठरत आहेत. आपले विमा संरक्षण टिकवण्यासाठी आणि आयुर्विमा योजनेचे लाभ योग्य वेळी मिळण्यासाठी, वेळेवर प्रीमियम भरणे खूप गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी LIC अधिकृत वेबसाईट भेट द्या.