LIC Saving Plans: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम LIC योजना, विमा आणि Savings दोन्हीचा लाभ! जाणून घ्या टॉप 5 प्लॅन्स.

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now

LIC Saving Plans: भारतीय आयर्विमा महामंडळ (LIC of India) ही देशातील सर्वात विश्वासार्ह आणि शासन मान्यताप्राप्त सुरक्षित गुंतवणूक कंपनी आहे.

LIC च्या योजना केवळ आयुर्विमा संरक्षण पुरवतात असे नाही, तर दीर्घकालीन बचतीसाठी आणि भविष्यातील आर्थिक स्थैर्यासाठीही उत्तम पर्याय ठरतात.

आजच्या काळात गुंतवणूकदारांना अशी योजना हवी असते जी विमा संरक्षणासोबत निशचित परतावा आणि बोनस देखील देईल.

या लेखामध्ये जाणून घेऊया LIC च्या टॉप 5 बचत योजना ज्या 2025 मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात योग्य मानल्या जात आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा.

1. LIC Jeevan Anand Plan: कमी खर्चात मोठे कव्हर आणि बचत दोन्ही!

LIC Saving Plans: LIC जीवन आनंद योजना (LIC Jeevan Anand) ही अशी पॉलिसी आहे जी जीवन विमा आणि गुंतवणूक या दोन्हींचा संगम आहे. जर तुम्हाला कमी प्रीमियममध्ये मोठे विमा कव्हर आणि भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल, तर ही योजना तुमच्यासाठी आदर्श ठरते.

तुम्ही या योजनेची सुरुवात फक्त ₹49 प्रतिदिन किंवा ₹1,495 प्रति महिना इतक्या रकमेपासून करू शकता. पॉलिसी कालावधी किमान 15 वर्षे असतो आणि मुदतपूर्तीनंतर तुम्हाला संपूर्ण विमा रक्कम आणि संपूर्ण वर्षांचा बोनस सह संपूर्ण रक्कम परत मिळते.

या योजनेअंतर्गत तुम्ही ₹10 लाख विमा पोलिसी घेतलीत तर, उदाहरणार्थ, जर तुम्ही 30 वर्षांचे असाल आणि 25 वर्षांसाठी ही पॉलिसी घेतली, तर वार्षिक प्रीमियम सुमारे ₹44,225 असेल. यामध्ये तुम्हाला 25 वर्षे प्रीमियम भरायचा असतो, पण 25 वर्षांपर्यंत फायदे मिळत राहतात. आणि मॅच्युरिटी ला तुम्हाला ₹26.50 लाख मिळतील

या पॉलिसीचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, मुदतपूर्तीनंतरही ₹10,00,000 लाईफ कव्हर प्रीमियम ना भरता तहयात चालू राहते. म्हणजेच, गुंतवणूक आणि संरक्षण दोन्ही एकत्र मिळतात. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे जसे की मुलांचे शिक्षण, घर खरेदी किंवा निवृत्तीनंतर स्थैर्य यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.

2. LIC Jeevan Lakshya Plan: उच्च उत्पन्न गटासाठी प्रीमियम योजना!

LIC Saving Plans: LIC जीवन लक्ष्य (LIC Jeevan Lakshya) ही योजना विशेषतः उच्च उत्पन्न असलेल्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना गुंतवणूक कालावधी आणि दीर्घ लाभकालावधी यावर आधारित आहे. म्हणजे, तुम्ही घेतलेल्या मुदत पूर्तीच्या अगोदर तीन वर्षे प्रीमियम भरायचे ताम्बळे जातात आणि पुढील तीन वर्षांनी याची मॅच्युरिटी होते.

Also Read:-  What Is Form 16: आयटीआर भरण्यासाठी सॅलरीड कर्मचार्‍यांसाठी फॉर्म नंबर सोळा आवश्यक आहे? जाणून घ्या महत्त्व!

या योजनेअंतर्गत तुम्ही ₹10 लाख विमा पोलिसी घेतलीत तर. उदाहरणार्थ, जर तुम्ही 30 वर्षांचे असाल आणि 25 वर्षांसाठी ही पॉलिसी घेतली, तर वार्षिक प्रीमियम सुमारे ₹41,610 असेल. विशेष म्हणजे, तुम्हाला फक्त 22 वर्षे प्रीमियम भरायचा असतो, पण 25 वर्षांपर्यंत फायदे मिळत राहतात. आणि मॅच्युरिटी ला तुम्हाला ₹26 लाख मिळतील.

ही योजना उच्च दर्जाच्या बोनससह येते आणि गंभीर आजारांसाठीही आर्थिक सहाय्य देते. त्यामुळे व्यवसायिक, उच्च पगारदार आणि करबचत करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना एक उत्तम पर्याय आहे.

3. LIC New Endowment Plan: सुरक्षित गुंतवणुकीसह हमीदार परतावा!

LIC Saving Plans: LIC न्यू एंडोमेंट योजना (LIC New Endowment Plan) ही त्यांच्यासाठी आहे ज्यांना विमा पेक्षा गुंतवणुकीचा भाग अधिक महत्त्वाचा वाटतो. ही योजना सेव्हिंग्स + सिक्युरिटी अशा दुहेरी फायद्यांसह येते.

ही एक low-risk plan आहे, म्हणजेच बाजारातील चढ-उतारांचा यात परिणाम होत नाही. त्यामुळे ज्यांना स्थिर आणि हमीदार परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी ही योजना उत्तम पर्याय ठरते. मुदतपूर्तीवेळी बोनस आणि हमीदार रक्कम मिळते, तसेच अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबाला संपूर्ण विमा कव्हर दिले जाते.

या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलांचे शिक्षण, लग्न, किंवा भविष्यातील मोठ्या खर्चांसाठी सुरक्षित निधी तयार करू शकता. त्यामुळे ही योजना मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी विशेषतः उपयुक्त आहे.

4. LIC Jeevan Umang Plan: निवृत्तीनंतरही दरवर्षी मिळवा हमीदार उत्पन्न!

LIC Saving Plans: LIC जीवन उमंग योजना (LIC Jeevan Umang) ही एक अशी योजना आहे जी आयुष्यभर उत्पन्नाचे आश्वासन देते. ही योजना त्या लोकांसाठी आहे ज्यांना निवृत्तीनंतर नियमित मासिक किंवा वार्षिक उत्पन्न हवे आहे.

या योजनेत प्रीमियम कालावधी संपल्यानंतर दरवर्षी 8% Guaranteed Money Back मिळतो आणि हे उत्पन्न संपूर्ण आयुष्यभर चालू राहते. म्हणजेच, तुम्ही निवृत्तीनंतरही तुमचा खर्च स्वतः भागवू शकता.

याशिवाय, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पूर्ण विमा कव्हर मिळते. त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक स्थैर्यच नाही, तर कुटुंबासाठी सुरक्षिततेची भावना देखील देते. दीर्घकालीन निवृत्ती नियोजनासाठी ही योजना सर्वोत्तम मानली जाते.

Also Read:-  Pik nuksan bharpai: अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई लवकरच मिळणार! शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती.

5. LIC Jeevan Tarun Plan: मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खास योजना!

LIC Saving Plans: LIC जीवन तरुण योजना (LIC Jeevan Tarun) ही मुलांच्या शिक्षण, विवाह आणि भविष्यातील गरजांसाठी खास तयार करण्यात आलेली आहे. ही योजना 0 ते 12 वर्षांच्या मुलांसाठी लागू होते आणि पॉलिसी कालावधी मुलगा/मुलगी 25 वर्षांचा होईपर्यंत असतो.

20 व्या वर्षापासून मुलाला दरवर्षी ठराविक रक्कम (Money Back) मिळते आणि 25 व्या वर्षी मुदतपूर्तीनंतर मोठी रक्कम बोनससह दिली जाते. त्यामुळे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी आर्थिक ताण येत नाही.

ही योजना पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी नियमित गुंतवणुकीचा मार्ग देते आणि बचत करण्याची सवयही लावते. मुलांच्या सुरक्षित भविष्याची हमी देणाऱ्या योजनांपैकी ही सर्वाधिक लोकप्रिय आहे.

LIC Saving Plans: कोणती LIC योजना तुमच्यासाठी योग्य?

वरील सर्व LIC बचत योजना त्यांच्या उद्दिष्टांनुसार वेगळ्या प्रकारे फायदेशीर आहेत.

  • जर तुम्हाला कमी प्रीमियममध्ये मोठे कव्हर हवे असेल तर LIC Jeevan Anand योग्य.
  • उच्च उत्पन्न गटासाठी प्रीमियम योजना हवी असेल तर Jeevan Lakshya निवडा.
  • सुरक्षित गुंतवणूक आणि हमीदार परतावा हवा असेल तर New Endowment Plan सर्वोत्तम.
  • निवृत्ती नंतर नियमित उत्पन्न हवे असेल तर Jeevan Umang योग्य.
  • आणि मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित योजना हवी असेल तर Jeevan Tarun घ्या.

LIC या सर्व योजनांद्वारे केवळ आर्थिक सुरक्षितता नव्हे तर मानसिक स्थैर्य देखील प्रदान करते. म्हणूनच, आजच योग्य योजना निवडा आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक पायाभूत रचना तयार करा.

LIC Saving Plans: https://licindia.in/home

Leave a Comment