LIC Single Premium Endowment Plan: विमा बचतीचा सर्वोत्तम पर्याय, मुदतपूर्तीस घ्या, ₹35,77,500; कसे? ते इथे वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

LIC Single Premium Endowment Plan: भारतीय जीवन बिमा निगम (LIC) ने आपल्या ग्राहकांसाठी खास तयार केलेली एक दीर्घकालीन विमा योजना म्हणजे सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लान. या योजनेचा उद्देश फक्त विमा संरक्षणच नव्हे, तर बचत आणि आर्थिक स्थिरता हा आहे. ही पॉलिसी Non-Linked स्वरूपाची आहे, म्हणजेच ती शेअर बाजाराच्या हालचालींवर अवलंबून नसते आणि यामध्ये तुम्हाला एकाच वेळी प्रीमियम भरून अनेक फायदे मिळतात.

एलआयसीचा (भारतीय आयुर्विमा महामंडळ) सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लान (Plan No. 717) एक अप्रतिम विमा योजना आहे जो विमा संरक्षणासह बचतीची सुविधा देतो. या लेखामध्ये आपण या पॉलिसीची सर्वसमावेशक माहिती, त्याचे फायदे, अटी व पॉलिसी संदर्भातील सेवा या सर्वांची माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लान म्हणजे काय?

एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लान (UIN: 512N283V03) हा एक Non-Linked प्लान आहे जो Pure Risk आणि सेविंग साठी आहे. या पॉलिसीत तुम्ही एकाच वेळी प्रीमियम भरून विमा संरक्षण आणि परिपक्वता (Maturity) लाभ मिळवू शकता, याचबरोबर मुदतपूर्तीस मिळणारी रक्कम तुम्ही पेन्शन स्वरूपात घेऊ शकता.

एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लानचे महत्त्वाचे घटक

१. योजना प्रकार: ही पॉलिसी Non-Linked प्रकारातील आहे, ज्यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात.

२. विमा संरक्षण: ही योजना विमा संरक्षणासोबतच परिपक्वतेनंतर एकत्र रक्कम मिळण्याची हमी देते.

३. सिंगल प्रीमियम पद्धती: तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरायचा आहे. त्यामुळे वारंवार प्रीमियम भरण्याची काळजी तुम्हाला करावी लागत नाही. (LIC Single Premium Endowment Plan)

४. पॉलिसीची मुदत: पॉलिसीच्या मुदतीनुसार तुम्ही योजना निवडू शकता.

५. विमा रक्कम: मृत्यू लाभ रक्कम (Sum Assured on Death): जर विमाधारकाचे वय 50 वर्षांपेक्षा कमी असेल, तर मूळ विमा रक्कम किंवा प्रीमियमच्या 1.25 पट, यापैकी जास्त रक्कम दिली जाईल. जर वय 50 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर मूळ विमा रक्कम किंवा प्रीमियमच्या 1.10 पट, यापैकी जास्त रक्कम दिली जाईल.

परिपक्वता लाभ रक्कम (Sum Assured on Maturity): परिपक्वतेच्या दिवशी मूळ विमा रक्कम मिळेल, यासोबत Simple Reversionary Bonuses आणि Final Additional Bonus देखील दिला जाईल.

६. सरेंडर व्हॅल्यू: जर तुम्हाला पॉलिसी मुदतीपूर्वीच बंद करायची असेल, तर तुम्हाला Guaranteed Surrender Value किंवा Special Surrender Value यापैकी जास्त असेल ती रक्कम मिळते.

एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लानचे फायदे

१. मृत्यू लाभ (Death Benefit): विमा कालावधीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या नामनिर्देशित लाभधारकाला पुढील गोष्टी दिल्या जातात: मृत्यू लाभ रक्कम (Sum Assured on Death) Simple Reversionary Bonus Final Additional Bonus

२. परिपक्वता लाभ (Maturity Benefit): विमा कालावधीदरम्यान विमाधारक हयात असेल आणि पॉलिसी पूर्ण झाल्यावर विमाधारकाला मूळ विमा रक्कम, Simple Reversionary Bonuses, आणि Final Additional Bonus दिला जातो.

३. सुरक्षा आणि बचत: ही योजना बचतीला चालना देते आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता देते.

४. सिंगल प्रीमियमची सोय: वारंवार प्रीमियम भरण्याऐवजी एकदाच भरणा केल्याने विमाधारकांचा वेळ आणि ऊर्जा वाचते.

५. विविध पर्याय: मृत्यू लाभ हप्त्यांमध्ये घेण्याचा पर्याय: तुमच्या कुटुंबाला मृत्यू लाभ एकरकमी रक्कम न देता 5,10 किंवा 15 वर्षांच्या हप्त्यांमध्ये मिळू शकतो. परिपक्वता लाभ हप्त्यांमध्ये घेण्याचा पर्याय: एकरकमी परिपक्वता लाभ न घेता तो हप्त्यांमध्ये घेता येतो.

६. कर्ज सुविधा (Policy Loan): तुम्हाला पॉलिसीवर कर्ज घेण्याचा पर्याय मिळतो. हा कर्ज पर्याय पॉलिसी इश्यू झाल्यानंतर 3 महिन्यांनंतर किंवा फ्री-लूक कालावधी संपल्यावर उपलब्ध होतो. (LIC Single Premium Endowment Plan)

LIC Single Premium Endowment Plan
LIC Single Premium Endowment Plan

पॉलिसीची अटी व शर्ती

१. फ्री-लूक कालावधी: जर तुम्हाला पॉलिसीच्या अटींमध्ये काही समस्या वाटत असतील, तर तुम्हाला पॉलिसी रद्द करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी मिळतो.

२. मृत्यू अपवाद (Suicide Exclusion): जर विमाधारकाने पॉलिसी चालू झाल्यानंतर 12 महिन्यांच्या आत आत्महत्या केली, तर लाभधारकाला Single Premium च्या 80% रक्कम किंवा पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू दिली जाते.

३. लॅप्स आणि पुनरुज्जीवन: ही सिंगल प्रीमियम पॉलिसी असल्यामुळे लॅप्स आणि पुनरुज्जीवन लागू नाही.

उदाहरण: LIC Single Premium Endowment Plan

35 वयाच्या स्त्री किंवा पुरुष विमाधारकाने हि योजना स्वतःच्या नावावरती सुरु केली तर त्याचे फायदे पुढीलप्रमाणे असतील.

या योजनेची मुदत 15 वर्षे असेल आणि त्याच्या लाइफ कव्हर ₹22,50,000 असेल तर या साठी एकदाच प्रीमियम ₹15,06,799 इतका भरावा लागेल. 15 वर्षानंतर मुदतपूर्तीस आपणास ₹35,77,500 परत मिळतील, या एकूण रक्कम पैकी ₹13,27,500 हि रक्कम एकूण 15 मुदत वर्षाची बोनस रक्कम असेल आणि ₹22,50,000 विमा रक्कम असेल. या रकमेवरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स बसणार नाही, मिळणारी रक्कम टॅक्स फ्री (80C अंतर्गत) असेल.

एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लानसाठी आवश्यक दस्तऐवज

हि योजना सुरु करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो, वैद्यकीय चाचणी (गरज असल्यास) ई. गोष्टींची आवश्यकता आहे. (LIC Single Premium Endowment Plan)

ग्राहकांसाठी महत्त्वाचे संपर्क पर्याय: ग्राहक सेवा क्रमांक: +91-022-68276827 व्हॉट्स अप सेवा: 8976862090, SMS सेवा: “LICHELP” 9222492224 या नंबरवर पाठवा.

एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लानसाठी कोण पात्र आहे?

ज्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थिरता हवी आहे: ही योजना अशांसाठी उपयुक्त आहे ज्यांना एकत्र रक्कम मिळवायची इच्छा आहे.

ज्यांना वारंवार प्रीमियम भरण्याची इच्छा नाही: वारंवार प्रीमियम भरण्याऐवजी सिंगल प्रीमियमच्या माध्यमातून विमा संरक्षण मिळवता येते.

जोखीम कमी असलेल्या योजनेत गुंतवणूक करू इच्छिणारे: मागील अनुभवांवर आधारित एलआयसी विश्वसनीय आहे, त्यामुळे ही योजना सुरक्षित मानली जाते.

एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लानची अद्ययावत माहिती कोठे मिळेल? ग्राहकांनी नेहमी LIC अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी. यावर सर्व अद्ययावत माहिती, फॉर्म डाउनलोड लिंक, आणि शाखा स्थान शोधण्याची सुविधा आहे.

निष्कर्ष: LIC Single Premium Endowment Plan

एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लान ही दीर्घकालीन फायदे देणारी एक विश्वासार्ह योजना आहे. ही योजना विमा संरक्षणासोबतच आर्थिक स्थिरता आणि बचत देण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी विमा संरक्षणासह गुंतवणूक योजना शोधत असाल, तर एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लान नक्कीच विचारात घ्या.

टीप: पॉलिसी खरेदी करण्याआधी LIC आयुर्विमा प्रतिनिधी किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे सर्व अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचावेत.

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us