LIC Smart Pension Plan benefits: भारतामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच असा प्रश्न पडतो; आपली बचत कुठे गुंतवावी आणि निवृत्त झाल्यावर दरमहा किंवा दरवर्षी ठरलेली रक्कम कशी मिळवावी? सध्या बँकांचे व्याजदर कमी झाले आहेत, त्यामुळे सुरक्षित आणि खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या योजना शोधणे खूप गरजेचे आहे.
अशाच पार्श्वभूमीवर भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) यांनी एक नवी योजना आणली आहे. ही योजना आहे; LIC Smart Pension Plan. ही योजना खास त्या लोकांसाठी आहे जे एकदाच मोठी रक्कम गुंतवू इच्छितात आणि त्या गुंतवणुकीवर आयुष्यभर पेन्शन म्हणजेच निश्चित उत्पन्न मिळवू इच्छितात. म्हणजेच, एकदाच पैसे गुंतवा आणि पुढील अनेक वर्षे ठराविक रक्कम तुमच्या हातात येत राहील.
ही नवी योजना 18 फेब्रुवारी 2025 पासून संपूर्ण देशात सुरू झाली आहे. आता या योजनेची खास वैशिष्ट्ये, गुंतवणुकीचे पर्याय आणि ₹10 लाख गुंतविल्यास किती पेन्शन मिळते, हे आपण पुढे सविस्तर पाहूया.
LIC स्मार्ट पेन्शन योजना म्हणजे काय?
ही योजना एक Single Premium Immediate Annuity Plan आहे. म्हणजेच तुम्ही एकदाच ठरावीक रक्कम भराल आणि त्यानंतर लगेच पेन्शन सुरू होईल. ही योजना Non-Linked आहे म्हणजे शेअर बाजारातील चढ-उताराचा या योजनेवर काही परिणाम होत नाही. तसेच ही Non-Participating आहे म्हणजे बोनससारखी अतिरिक्त रक्कम यात मिळत नाही.

ही योजना एकल व्यक्तीसाठी तसेच पती-पत्नी किंवा कुटुंबातील दोन सदस्यांना विचारात घेऊनही घेता येते. एकदा गुंतवणूक केल्यानंतर दरमहा किंवा दरवर्षी ठराविक पेन्शन मिळत राहते.
कोण लाभ घेऊ शकतात?
ही योजना विशेषतः 50 वर्षे व त्यापुढील वयोगटातील वरिष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे. मात्र, जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला किंवा इतर कुटुंबातील सदस्याला देखील त्याच पेन्शनचा लाभ द्यायचा असेल, तर Joint Life Annuity पर्याय निवडता येतो. त्यामुळे पती-पत्नी दोघेही निश्चिंत राहू शकतात.
उदाहरणार्थ, जर एखाद्या 50 वर्षांच्या व्यक्तीने ही योजना घेतली आणि त्यांच्या पत्नीचे वय 45 असेल, तर पतीच्या निधनानंतर पत्नीला पेन्शन मिळत राहते. यामुळे घरातील एकूण उत्पन्न सुरक्षित राहते.
योजनेतील प्रमुख पर्याय (Annuity Options)
LIC ने या योजनेत अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही खालीलपैकी कोणताही पर्याय निवडू शकता –
🔹 Single Life Annuity (फक्त एका व्यक्तीसाठी)
- साधी पेन्शन: फक्त पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळते.
- तय कालावधीसाठी + आयुष्यभर पेन्शन: 5, 10, 15 किंवा 20 वर्षे निश्चित पेन्शन, त्यानंतरही जिवंत असेपर्यंत पेन्शन चालू.
- दरवर्षी वाढणारी पेन्शन: 3% किंवा 6% वार्षिक वाढीसह आयुष्यभर पेन्शन.
- मृत्यूनंतर गुंतवलेली रक्कम परत: पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर उरलेली गुंतवणूक नॉमिनीला परत मिळते.
🔹 Joint Life Annuity (पती-पत्नी किंवा दोन सदस्यांसाठी)
- प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याला 50% किंवा 100% पेन्शन मिळत राहते.
- यामध्येही 3% किंवा 6% वार्षिक वाढीचे पर्याय आहेत.
- काही पर्यायांमध्ये दोघांच्या मृत्यूनंतर गुंतवलेली संपूर्ण रक्कम नॉमिनीला परत मिळते.
मृत्यूनंतर नॉमिनीला मिळणारे पर्याय
जर पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर अजून काही रक्कम शिल्लक राहिली असेल, तर ती रक्कम नॉमिनीला मिळते. LIC कडून नॉमिनीला पुढीलपैकी एक पर्याय निवडण्याची मुभा दिली जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक दिलासा मिळतो आणि त्यांचे भविष्यातील नियोजन सोपे होते.
1️⃣ एकरकमी रक्कम (Lump Sum): नॉमिनीला संपूर्ण शिल्लक रक्कम एकाच वेळी मिळते. यामुळे कुटुंबातील आर्थिक गरजा तात्काळ पूर्ण करता येतात, जसे की कर्ज फेडणे, उपचार खर्च भागवणे किंवा इतर तातडीच्या गरजा.
2️⃣ हप्त्यांमध्ये पैसे (Installments): नॉमिनीला हवे असल्यास तो/ती तीच रक्कम हप्त्यांमध्ये घेऊ शकतो. ठरलेल्या कालावधीत दरमहा किंवा दरवर्षी ठरलेली रक्कम नॉमिनीच्या खात्यात जमा होत राहते. हे पर्याय निवडल्यास एकदम मोठी रक्कम हातात येण्याऐवजी नियमित उत्पन्नासारखा लाभ मिळतो.
3️⃣ त्या रक्कमेवर पुन्हा एन्युटी सुरू करून पेन्शन: नॉमिनीला हवे असल्यास, उरलेल्या रकमेवर पुन्हा एक नवी पेन्शन योजना सुरू करता येते. त्यामुळे भविष्यातही खात्रीशीर मासिक किंवा वार्षिक पेन्शन मिळत राहते आणि कुटुंबाला दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळते.

विशेष फायदे
- Higher Purchase Price Incentive: जास्त रक्कम गुंतवली तर अतिरिक्त पेन्शनचा लाभ.
- Loyalty Benefit: आधीपासून LIC पॉलिसीधारक असाल किंवा मृत पॉलिसीधारकाचे नॉमिनी असाल, तर अतिरिक्त सूट मिळते.
- Liquidity Option: काही पर्यायांमध्ये इमर्जन्सीमध्ये आंशिक पैसे काढण्याची सोय.
- Tax Benefit: आयकर कायद्यानुसार गुंतवणुकीवर व पेन्शनवर लागू कर लाभ मिळू शकतात.
₹10 लाख गुंतवणुकीवर किती पेन्शन?
समजा तुमचे वय 50 वर्षे आहे आणि तुम्ही LIC Smart Pension Plan मध्ये ₹10 लाख गुंतवले, तर खालीलप्रमाणे तुम्हाला दरवर्षी पेन्शन मिळू शकते (सिंगल लाइफ पर्यायात):
सिंगल लाइफ ॲन्युटी (Single Life Annuity) पर्यायांमध्ये मिळणारी वार्षिक पेन्शन
- Option A – आयुष्यभरासाठी स्थिर पेन्शन: ₹85,000
- Option B1 – 5 वर्षांसाठी निश्चित पेन्शन, नंतर आयुष्यभर: ₹84,500
- Option B2 – 10 वर्षांसाठी निश्चित पेन्शन, नंतर आयुष्यभर: ₹83,200
- Option B3 – 15 वर्षांसाठी निश्चित पेन्शन, नंतर आयुष्यभर: ₹81,400
- Option B4 – 20 वर्षांसाठी निश्चित पेन्शन, नंतर आयुष्यभर: ₹79,200
- Option C1 – दरवर्षी 3% वाढीसह आयुष्यभर पेन्शन: ₹66,200
- Option C2 – दरवर्षी 6% वाढीसह आयुष्यभर पेन्शन: ₹54,800
- Option D – आयुष्यभर पेन्शन + उरलेला प्रीमियम परतावा: ₹81,700
- Option E1 – 75 वर्षांनंतर प्रीमियमचा 50% परतावा: ₹57,900
- Option E2 – 75 वर्षांनंतर प्रीमियमचा 100% परतावा: ₹51,000
- Option E3 – 80 वर्षांनंतर प्रीमियमचा 50% परतावा: ₹61,400
- Option E4 – 80 वर्षांनंतर प्रीमियमचा 100% परतावा: ₹57,900
- Option E5 – 76 ते 95 वर्षांच्या दरम्यान दरवर्षी प्रीमियमचा 5% परतावा: ₹60,900
- Option F – आयुष्यभर पेन्शन + संपूर्ण प्रीमियम परतावा: ₹64,900
जर तुम्ही Joint Life पर्याय निवडला (उदा. 50 वर्षांचा प्रमुख आणि 45 वर्षांचा दुसरा सदस्य), तर पर्यायानुसार ₹74,000 ते ₹78,900 इतकी पेन्शन मिळू शकते.
कुठून खरेदी कराल?: तुम्ही ही योजना तुमच्या LIC आयुर्विमा प्रतिनिधी/ LIC एजंट मार्फत खरेदी करू शकता. सर्वप्रथम त्यांच्याशी या योजनेबद्दल सविस्तर चर्चा करा योजना समजावून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या.
गुंतवणूक करण्यापूर्वी विचार
निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला निश्चित उत्पन्न मिळणे हा मोठा दिलासा असतो. LIC Smart Pension Plan ही योजना तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांना उपयोगी ठरू शकते.

तुम्ही गुंतवणुकीपूर्वी स्वतःच्या गरजेनुसार पर्याय निवडा. जर तुम्हाला वार्षिक वाढ हवी असेल, तर 3% किंवा 6% वाढीचा पर्याय निवडा. जर तुमची इच्छा असेल की मृत्यूनंतर कुटुंबाला गुंतवलेली रक्कम परत मिळावी, तर Return of Purchase Price पर्याय निवडा.
LIC Smart Pension Plan benefits
LIC Smart Pension Plan ही योजना अशा लोकांसाठी खास आहे जे सुरक्षित, जोखमीविना आणि आयुष्यभराची खात्रीशीर पेन्शन योजना शोधत आहेत. बँकांच्या मुदतठेवींमध्ये मिळणाऱ्या व्याजापेक्षा ही योजना अधिक स्थिर आणि भविष्यकाळातही सुरक्षित उत्पन्न देऊ शकते.
आजच्या महागाईच्या काळात निवृत्तीचे नियोजन वेळेवर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पुढील काही वर्षे आर्थिकदृष्ट्या आरामशीर आणि निर्धास्त घालवायची आहेत, तर LIC Smart Pension Plan 2025 तुमच्यासाठी एक उत्तम व विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो.
LIC Smart Pension Plan benefits link: https://licindia.in/saral-pension
Table of Contents