LIC Super Saving Plan: 16 वर्षासाठी दरमहा 4,826 वाचवा, 25 वर्षानंतर रुपये 31.50 लाखाची मॅच्युरिटी मिळवा.

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now

LIC Super Saving Plan: भारतातील प्रमुख आणि प्रसिद्ध आयुर्विमा कंपनी (LIC) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट आणि फायदेशीर विमा योजना मार्केटमध्ये आणत असते. भारतातील सर्व ग्राहक विविध पद्धतीच्या योजनांमध्ये मोठ्या विश्वासाने आपले पैसे गुंतवत असतात. अशाच पैकी सुपर सेविंग प्लॅन प्रकारामध्ये अनेक योजना आहेत, त्यापैकीच एक योजनेची माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत. या सुपर सेविंग प्लॅन योजनेकडे तुमचे आर्थिक भविष्य, सुरक्षितता आणि बचत यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून पाहिलं जाते. या आर्टिकल मध्ये LIC Super Saving Plan योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

LIC Super Saving Plan म्हणजे काय?

LIC Super Saving Plan ह्या एक पारंपारिक, नॉन-लिंक्ड, सहभागी अंतर्गत योजना असतात, ज्या तुम्हाला दीर्घकालीन बचत आणि आयुर्विमा संरक्षण प्रदान करत असतात. अशा पद्धतीच्या सुपर सेविंग प्लॅन अंतर्गत योजनेच्या माध्यमातून योजना धारकाला प्रीमियम भरण्याच्या काळात आणि त्यानंतरच्या काळातही लाईफ कव्हर आणि आकर्षक गॅरेंटेड रिटर्न्स मिळवता येतात.

LIC Super Saving Plan
LIC Super Saving Plan

सुपर सेव्हिंग प्लॅनची वैशिष्ट्ये

प्रीमियम पेमेंट: या योजनेमध्ये प्रीमियम भरण्याच्या विविध पर्यायांमुळे तुम्हाला, तुमच्या आर्थिक स्थितीनुसार निवड करता येते. मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, किंवा वार्षिक अशा प्रीमियम भरायच्या पर्यायांचा समावेश आहे.

विमा संरक्षण: या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आयर्विमा विमा संरक्षण मिळते. दुर्घटना किंवा आकस्मिक निधन झाल्यास, तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.

Also Read:-  PMJJBY yojana: ₹436 मध्ये ₹2 लाखांचे जीवन विमा संरक्षण, जाणून घ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कशी आहे.

गॅरेंटेड बोनस: या योजनेत गॅरेंटेड बोनस प्रत्येक वर्षी जाहीर होतो, ज्यामुळे तुमची बचत वाढवण्यास मदत होते.

मॅच्युरिटी बेनिफिट: या योजनेच्या मुदतपूर्तीनंतर तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट मिळते, ज्यामध्ये मूळ रकमेसह गॅरेंटेड बोनसचा समावेश असतो.

कर्ज : योजना सुरु करून तीन वर्षे झाल्यानंतर काही अटींवरती कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध असते.

SUPER SAVING PLAN उदाहरण

सुपर सेव्हिंग प्लॅन प्रकारातील योजने पैकी एक योजना,  ‘एलआयसी जिवन लाभ प्लॅन’ हा आहे, या प्लॅन नुसार, 35 वयाच्या स्त्री किंवा पुरुषाने 25 वर्षे योजनेची मुदत घेतली असता, त्याला या योजनेमध्ये 16 वर्षे प्रीमियम LIC मध्ये जमा करायचा आहे. पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला 4,932 रुपये प्रीमियम असेल. दुसऱ्या वर्षांपासून हाच प्रीमियम 4826 रुपये प्रत्येक महिना भरावा लागेल. हा प्रीमियम एकूण 16 वर्षे साठी असेल. एकूण 25 वर्ष मुदतीपैकी पुढची 9 वर्षे प्रीमियम माफ होतील पण, आपणास मॅच्युरिटी बेनिफिट 25 वर्षानंतरच मिळणार आहे.

मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून योजनाधारकाला योजना सुरू केल्यापासून 25 वर्षानंतर 31,50,000 रुपये एक रकमी  मिळतील, त्यापैकी एकूण 16 वर्षांमध्ये प्रीमियम स्वरूपात भरलेली रक्कम 9,09,265 रुपये असेल आणि 22,40,635 हि एकूण 25 वर्षाचा गॅरेंटेड बोनस रक्कम मिळेल. त्याचबरोबर 12,00,000 रुपयांचे आयर्विमा संरक्षण एकूण 25 वर्षे योजनाधारकाला मिळणार आहे.

LIC Super Saving Plan
LIC Super Saving Plan

सुपर सेव्हिंग प्लॅनचे फायदे

या योजनेद्वारे तुम्ही दीर्घकालीन बचत करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्याच्या गरजांसाठी पैसे जमा होत राहतील, आयकर अधिनियमाच्या 80C अंतर्गत भरलेल्या प्रीमियम वरती आणि 10(10D) अंतर्गत तुम्हाला मिळणाऱ्या मॅच्युरिटी रकमेला टॅक्समध्ये सवलत मिळते. तुमच्या गरजेनुसार विविध पॉलिसी टर्म आणि प्रीमियम पेमेंट पर्याय निवडू शकता. आकस्मिक निधन किंवा गंभीर आजाराच्या स्थितीत तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.

Also Read:-  Dhantares 2024: जाणून घ्या! सोने गुंतवणूक कशी करावी? सोने खरेदीचे 4 प्रभावी पर्याय कोणते आहेत?

सुपर सेव्हिंग प्लॅनसाठी अर्ज कसा करावा?

सुपर सेव्हिंग प्लॅनसाठी अर्ज करणे अतिशय सोपे आहे. LIC च्या जवळच्या शाखेत भेट देऊन त्यांना अधिक माहितीसाठी विचारू शकता किंवा तुमच्या आयर्विमा सल्लागार प्रतिनिधीशी संपर्क करा. किंवा या www.licindia.in लिंक ला क्लिक करा

तुम्ही या सुपर सेव्हिंग प्लॅनच्या माध्यमातून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची सुरक्षितता आणि आर्थिक स्थिरता वाढवू शकता. आजच या योजनेची माहिती घ्या आणि योग्य निर्णय घ्या!

Contact us