Nokia G42 5G फोन: जबरदस्त फीचर्स सह बाजारात दाखल, फस्ट लुक पाहून प्रेमातच पडाल!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group follow Now

Nokia G42 5G: भारतामधे मोबाईल फोनची सुरुवात नोकिया कंपनीने केली आणि  बराच काळ या कंपनीच्या मोबाईल हँडसेट ची मार्केटमध्ये जबरदस्त पकड राहिली होती. स्पर्धेच्या काळामध्ये नोकिया कंपनी काही कारणांमुळे मागे पडत गेली. फिनलँड स्थित असणाऱ्या या कंपनीने पुन्हा नव्याने मोबाईल स्मार्टफोनच्या दुनियेमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला असून नवीन व अत्याधुनिक टेक्नॉलॉजीसह पुन्हा एकदा मार्केटमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आपले नवनवीन मोबाईल हँडसेट रेंज प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये लॉन्च करत आहे. याच Nokia कंपनीने एक नवीन स्मार्ट फोन नुकताच जगभरात लॉन्च केला आहे.

जगभरात मोबाईल क्षेत्र काबीज करण्याच्या प्रयत्ना मध्ये असणाऱ्या या कंपनीने त्यांचा पहिलाच 5G हँडसेट, Nokia G42 5G लाँच केला आहे. या लेखामधे या स्मार्टफोन हँडसेट चे फीचर्स, डिझाईन, ऑपरेटिंग सिस्टिम, कॅमेरा, बॅटरी या सर्व बदल ची सविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती पाहण्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल.

Nokia G42 5G
Nokia G42 5G

HMD Nokia G42 5G Features

Nokia G42 5G मध्ये 5G कनेक्टिव्हिटी सह, 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा, 5 जीबी पर्यंत वर्चुअल मेमरी वाढवण्याची कॅपॅसिटी असणारा हा हँडसेट, बिग स्क्रीन, स्टनिंग फोटोग्राफी आणि तीन दिवस बॅटरी लाइफ साठी स्पेशली बनवलेला आहे. अँड्रॉइड 13 सह ऑपरेटिंग सिस्टीम दिली असताना याची सुरक्षितता ही अतिशय स्ट्रॉंग आहे. अत्याधुनिक AI इमेजिंग सह आश्चर्यकारकपणे स्पष्ट फोटोग्राफी करण्यासाठी ची स्पेशल टेक्नॉलॉजी या हँडसेट मध्ये दिली आहे. 6 GB आणि 8 GB रॅम असणारा हा हँडसेट 128 GB पासून 1 TB रोम पर्यंत वाढवू शकतो. 5000mAh बॅटरी बॅकअप असणार हा हँडसेट बेस्ट लुक साठी साठी प्रसिद्ध होत आहे. सोग्रे, सोपिंक, सोपर्पल या तीन कलर्स मध्ये उपलब्ध असून भारतीय मोबाईल बाजारात याची किंमत 12,500/- पर्यंत आहे.

Designs

अत्याधुनिक प्रिमियम डिझाईन असलेला हा स्मार्टफोन,ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व स्मार्ट अत्यावश्यक वस्तूंचा ॲक्सेस अत्यंत सुलभ सॉफ्टवेअरने दिला आहे. साईज : 6.56 इंच, कव्हर ग्लास:Corning® Gorilla® Glass 3 सह रिझोल्यूशन: HD+ (720×1612) असून बॅक कव्हर 65% रिसायकल प्लास्टिक ने बनवले आहे. वॉटर रजिस्टंट IP52 सह फ्रंटला आणि बॅक ला तीन सेंसर सह हा हँडसेट बनवला आहे. फिंगर प्रिंट सेंसर वोल्युम अप अँड डाऊन बटनावरती दिला आहे दिला आहे. याच फिंगरप्रिंट सेंसर ला सिक्युरिटी सेन्सर सुद्धा आहे.

Camera

रियर कॅमेरा वैशिष्ट्ये: नाईट मोड, डार्क व्हिजन, ट्रायपॉड मोड, एआय पोर्ट्रेट, HDR सह 50MP मोड, वैयक्तिकृत वॉटरमार्क, OZO 3D ऑडिओ रेकॉर्डिंग, मागील कॅमेरा: 50 MP मुख्य AF, 5P, f/1.8 + 2 MP खोली + 2 MP मॅक्रो मागील फ्लॅश एलईडी, फ्रंटला 8MP सुपर सेल्फी कॅमेरा दिला आहे. AI द्वारे दिवसा किंवा रात्री आश्चर्यकारक रित्या फोटोज स्पष्टपणे काढला जातो. बॅक साईडला तीन कॅमेरा द्वारे प्रकाशाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी नवीन AI सिस्टीम काम करते. व्हिडिओ शूट करताना क्लिअर आवाजा सहित AI काम करते. 

Performans

ऑपरेटिंग सिस्टम: Android™ 13 OS सह अपग्रेड: 2 OS अपग्रेड परवानगी यामध्ये आहे. CPU: Snapdragon® 480 + 5G वैशिष्ट्ये: Qualcomm® Kryo™ 460 CPU 2.2 GHz Qualcomm® Adreno™ 619 GPU पर्यंत गती देते, व्हर्च्युअल रॅम पर्याय: 6GB रॅम प्रकारात 5GB, 8GB रॅम प्रकारात 8GB क्लाउड स्टोरेज: Google ड्राइव्ह अंतर्गत संचयन: 128 GB / 256 GB4 मायक्रोएसडी कार्ड समर्थन: 1 टीबी पर्यंत रॅम: 4 जीबी / 8 जीबी / 6 जीबी, हेडफोन जॅक: 3.5 मिमी असल्यामुळे इंटरफेस अगदी सहजरीत्या चालते.

बॅटरी आणि चार्जिंग

या मोबाईल मधे असणारी 5000mAh बॅटरी तीन दिवसाच्या बॅकअप सह येते. 80% चार्जिंग होण्यासाठी चाळीस मिनिटाचा कालावधी लागतो. बॅटरी : 3 दिवसांपर्यंत बॅटरी आयुष्य, चार्जिंग: 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट (QC3.0 आणि PD3.0) वैशिष्ट्ये: 800 पूर्ण चार्जिंग सायकलनंतरही मूळ बॅटरी क्षमतेच्या 80% > राखते वॅटेज: 20 डब्ल्यू

काही वैशिष्ट्ये

फिंगरप्रिंट सेन्सर: साइड पॉवर की, सुरक्षा अद्यतने: 3 वर्षांपर्यंत मासिक सुरक्षा अद्यतने, फेस अनलॉक, Android™ 13 सह, विशिष्ट फोटो, व्हिडिओ आणि क्लिपबोर्ड इतिहासासह ॲप्स कोणत्या माहितीमध्ये प्रवेश करू शकतात आणि कोणती करू शकत नाहीत यावर तुमचे अधिक नियंत्रण आहे. बटणे: व्हॉल्यूम अप/डाउन, फिंगरप्रिंट सेन्सरसह पॉवर बटण, एक्सीलरोमीटर (जी-सेन्सर) सभोवतालचा प्रकाश सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर खूपच चांगल्या पद्धतीने काम करतात. मोबाईल बॉक्समध्ये सिम इजेक्ट पिन, मार्गदर्शक पुस्तिका, स्क्रीन गार्ड, जेली केस, यूएसबी टाइप सी केबल, चार्जर इत्यादी मिळेल. OZO प्लेबॅकद्वारे मोठ्या ऑडिओसह, तुम्ही एकही बीट चुकवणार नाही. लाऊडस्पीकरसाठी ऑडिओ बूस्ट मोड तुम्हाला न आवडणाऱ्या आवाजापेक्षा तुम्हाला हवा असलेला आवाज देतो.

Price

4 GB/128 GB हँडसेट ची किंमत 9,999/- रुपये असून 6 GB / 128 GB ची किंमत 12,499/- रुपये आहे. हा हँडसेट तुम्हाला कोणत्याही मोबाईल शॉप मध्ये मिळेल, तसेच ऑनलाईनही सो पिंक, सो ग्रे, सो पर्पल या तीन कलर्स मध्ये उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला नोकियाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावं लागेल. या लेखांमध्ये Nokia G42 5G मोबाईल हँडसेट बदल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन खरेदीसाठी समोरील https://www.hmd.com/en_in/nokia-g-42 लिंक वरती क्लिक करा

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us